सिझेरीयन म्हणजे काय?
“सिझेरीयन झाले शेवटी”, “सिझेरीयनशिवाय गत्यंतर नाही, असे डॉटर म्हणाले” अशी वाये मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये वारंवार ऐकू येतात. बाळंतपणासाठी गेलेली स्त्री सात-आठ दिवस बिछान्यावर पडून असते. नंतर टाके काढल्यानंतर तिला घरी जाऊ देतात. एकूण सिझेरीयन व बाळंतपण यांचा संबंध आहे, हे आपल्या लक्षात आले असेल. ९५% प्रसूती नैसर्गिकरित्या होतात. म्हणजेच मातेच्या योनीमार्गातून बाळ बाहेर येते. काही वेळा मात्र योनीमार्गातून बाळ बाहेर येणे शय नसते. बाळाचे डोके मोठे असते वा मातेच्या कमरेच्या हाडांच्या ज्या पोकळीतून बाळ बाहेर येते ती पोकळी खूप लहान असते. कधी माता बाळंतपणाच्या कळा घेऊ शकत नाही. कधी तिचे पूर्व सिझेरियन झालेले असते. या सर्व कारणांमुळे योनीमार्गातून मुलाचा नैसर्गिकरित्या जन्म न होता ते पोटातून काढावे लागते. प्रथम ओटीपोटीवर छेद घेऊन नंतर गर्भाशयाचा छेद घेतल्यानंतर काही क्षणांतच बाळ बाहेर काढले जाते. एकदा मूल बाहेर आले की, मग त्याची काळजी नैसर्गिकरित्या जन्माला आलेल्या मुलाप्रमाणेच घेतली जाते. आजकाल सिझेरीयनचे प्रमाण वाढत चाललेले दिसते. डॉटरी व्यवसायातील धंदेवाईकपणा, हे याचे एक कारण असले तरी, वेदना सहज न करण्याकडे असलेला आधुनिक स्त्रियांचा कल, पूर्वीसारखी घरगुती कामे (बसून कपडे धुणे, सारवणे आणि बरीच इतर शारीरिक कष्टाची कामे) करावी न लागल्याने कमी होऊ लागलेली गर्भाशयाच्या स्नायूंची शक्ती ही कारणे देखील दुर्लक्षण्याजोगी नाहीत. त्यामुळे बर्याचदा स्त्रिया स्वतः होऊनच सिझेरीयन करायची विनंती डॉटरांना करतात. वेदनेशिवाय, कळांशिवाय मातृत्व ही कल्पनाच करणे योग्य नाही. सिझेरीयनचे दुष्परिणामही होऊ शकतात. ही शस्त्रक्रिया असल्याने भूल देण्यातील धोके, शस्त्रक्रियेत होणारे उपद्रव, जंतु संसर्गाची भीती असतेच. शिवाय साध्या बाळंतपणापेक्षा खर्चही ५-६ पट अधिक येतो. बाळाला दूध पाजणेही ४-६ तास (स्त्री शुद्धीवर येईपर्यंत) उशीरा सुरू होते. तसेच एकदा सिझेरीयन झाले की, बरेचदा पुढच्या बाळाच्या वेळीही सिझेरीयनच करावे लागते. या सर्व बाबी लक्षात घेता मातांनी सहनशीलता दाखवून सिझेरीयन टाळता येईल तेवढे टाळण्याचा प्रयत्न करावा.