पावसाळ्यात हे करा वर्ज्य

पावसाळ्यात हे करा वर्ज्य

पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते. त्यामुळे तेलकट, तळकट पदार्थ खाऊ नयेत. पावसाळ्यात
भात खाल्ल्याने अंगावर सूज येण्यासोबतच पोट फुगते. त्यामुळे भात प्रमाणात खावा. मिठामुळे
पोट फुगते आणि भूक जास्त लागते. त्यामुळे या दिवसामध्ये मीठही कमीच खावे.
पचनास जड असणार्‍या फ्लॉवर, कोबीसारख्या भाज्या खाऊ नयेत. दह्यामुळे कफ होतो.
शीतपेयांमध्ये शरीरातल्या खनिजांचे प्रमाण कमी होऊन पचनक्रियेवर परिणाम होतो.

दैनिक पंचांग मंगळवार, दि. २३ एप्रिल २०२४

हनुमान जयंती, वैशाख स्नानारंभ, शके
१९४६ क्रोधीनामसंवत्सर, चैत्र शुलपक्ष, चित्रा २२|३२
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६ वा. २९ मि.

राशिभविष्य

मेष : स्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. आरोग्य उत्तम राहील. शत्रूंवर प्रभाव वाढेल.

वृषभ : कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका.

मिथुन : इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. आज आपणास जास्त खर्च करावा लागू शकतो.

कर्क : एखाद्या महत्वाच्या प्रोजेटमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शयता आहे. हसत खेळत दिवस जाईल. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल.

सिंह : आर्थिक स्थिती संमिश्र राहील. कुटुंबातही वेळ चांगला जाईल. सामाजिक कामात सावधगिरी बाळगा. एखादे नवे नाते आपल्यावर प्रभाव पाडेल. प्रवासाचे योग संभवतात.

कन्या : देवाण-घेवाणीबाबत काळजीपूर्वक व्यवहार करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहावे. महत्त्वाची जबाबदारी मिळेल. खर्च वाढेल.

तूळ : नोकरदारांनी कामात लक्ष द्यावे. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. स्थिती अनुकूल राहील. इतरांना सहकार्य केल्याने वाद कमी होतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल.

वृश्चिक : वरिष्ठ लोकांचे कामात सहकार्य मिळेल. अधिकारी आपणास सहकार्य करतील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. स्वतः ला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल.

धनु : दिवस उत्तम राहील. महत्वाच्या कार्यात यश मिळेल. आरोग्याचा त्रास होईल. व्यापार-व्यवसायात जोखमीचे कार्य टाळा. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. व्यस्त राहाल. यंत्रे व वाहने जपून चालवा.

मकर : वडिलधार्‍यांचे सहकार्य मिळेल. महत्वाच्या कामात सावधगिरी बाळगा. जोखमीच्या कार्यात पैसा गुंतवू नका. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. उत्साहजनक वार्ता मिळतील. लेखन कार्यात प्रगती होईल.

कुंभ : आरोग्य देखील चांगले राहील. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे. नोकरदार कामात व्यस्त राहातील. वाहने
जपून चालवावीत. विरोधक पराभूत होतील. स्त्री पक्षाचा आधार राहील.

मीन : प्रेमात स्थिती अनुकूल राहील. आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. अधिकार्‍यांशी वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. आरोग्य देखील चांगले राहील. अधिकार क्षेत्र वाढेल.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

दैनिक पंचांग बुधवार, दि. २४ एप्रिल २०२४

शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर, चैत्र कृष्णपक्ष, स्वाती २४|४१
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६ वा. २९ मि.

 

राशिभविष्य : 

मेष : शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार मिळेल. कामात सावधगिरी बाळगा.
आर्थिक प्रकरणांमध्ये काळजीपूर्वक कार्ये करा. मानसन्मानाच्या क्षेत्रात वाढ होईल.

वृषभ : महत्वपूर्ण कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील. पत्र मिळेल.
आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. आपली सर्व
कामे योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी आज गंभीर विचार करू शकता.

मिथुन : नोकरदार व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील. राजकीय कार्ये पूर्ण होतील.
कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे
राहील.

कर्क : कलाक्षेत्रातील व्यक्तींच्या कामात स्थिती सुखद राहील. नवीन करार होतील.
आरोग्य उत्तम राहील. मनोरंजनावर खर्च होईल. त्यामुळे घरांत उत्साहाचे वातावरण होईल.

सिंह : वेळेकडे लक्ष ठेवा. कार्यात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. कार्यक्षेत्रात
मानसिक ताण होण्याची शयता आहे. आनंदाचे वातावरण असल्यामुळे कार्य सुरळीत
होतील.

कन्या :  महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल. मनातल्या इच्छा पूर्ण होतील.
उत्साहजनक बातम्या मिळतील. कामात एखाद्याचे सहकार्य प्रगतीचे कारण बनेल.

तूळ :  कौटुंबिक वातावरण आनंद आणेल. आर्थिक विषयांमध्ये आपल्या प्रयत्नांमुळे
आपणास यश मिळेल. ज्येष्ठ अधिकार्‍यांकडू नआपणास समर्थन मिळेल. महत्त्वाच्या कामांमध्ये
सावधगिरी बाळगा.

वृश्चिक :  कौशल्याच्या क्षेत्रात यश मिळण्याची शयता निर्माण होऊ शकते.
नवे वाहन मिळण्याची शयता आहे. मित्रांचा लाभ मिळेल. मानसन्मान होईल. आर्थिक
विषयांमध्ये थोड्या अडचणी येऊ शकतात.

धनु : आपल्यासाठी अनुकूल वेळ आहे व महत्त्वाच्या कार्यांमध्ये यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. आपण नव्या नोकरीसाठी संधी शोधू शकता किंवा नवी नोकरी सुरु करण्यासाठी संमतीच्या योजना बनवू शकता. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा.

मकर : करियरबद्दल आपण हट्ट धरू शकता. कठोर परिश्रम केल्यानंतर यश मिळेल.
व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. आज आपल्या स्वतःच्या तर्कांना बळ मिळू शकेल.
मित्रांचा पाठिंबा राहील.

कुंभ :   महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी दिवस चांगला नाही. उत्साहवर्धक बातमी मिळाल्याने
आनंद होईल. इच्छित कार्ये योग्य वेळी होतील. शत्रूंवर प्रभाव वाढेल. करीयरसंदर्भातील नवी
संधी मिळण्याची शयता.

मीन :  खरेदीसाठी उत्तम वेळ. आज रात्री संवेदनशील बनवण्याकडे आपला
कल वाढू शकतो. आपल्या कुटुंबात बर्‍याच काळापासून चालणारा एखादा वादाचा विषय
आपणास अस्वस्थ करेल.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

सुविचार

जर परिश्रमातून उपयुक्त असे काही निष्पन्न झाले नाही; तर ते नैतिक पतनास कारणीभूत होतात. – जॉन रस्किन.

हसा आणि शतायुषी व्हा!

पती – तुम मेरी फिल्म में काम करोगी|
पत्नी – हाँ करूँगी पर सीन या है |
पती – तुम्हें धीरे-धीरे पानी में जाना होगा |
पत्नी – ठीक है पर फिल्म का नाम या है |
पती – गयी भैस पानी में |

लाल तिखट चांगले राहावे याकरता

लाल तिखट चांगले राहावे याकरता
त्यात हिंगाचे खडे घालावेत.
संकलक: अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

शिकेकाईच्या शेंगा


५० ग्रॅम रीठे, ५० ग्रॅम सुके आवळे व ५० ग्रॅम शिकेकाईच्या शेंगा एकत्र कुटून घ्या.
त्यात दोन लिटर पाणी मिसळून अर्धा तास मंद जाळावर उकळावे. थंड झाल्यावर एका
बाटलीत भरून ठेवावे. आठवड्यातून तीन वेळा या मिश्रणाने केस धुवावेत.

वास्तू

वाईट स्वप्ने पडत असतील तर जर घराच्या एखाद्या बेडरूममध्ये झोपणार्‍या व्यक्तींना वाईट स्वप्ने पडत असतील
वा झोप नीट लागत नसेल, तर त्यामागे त्या रुममध्ये असलेली अदृश्य नकारात्मक ऊर्जा हे कारण असू शकते. यावर उपाय म्हणून या रुमच्या चारी कोपर्‍यांमध्ये काचेच्या प्लेटमध्ये १००-२०० ग्रॅम खडे मीठ ठेवा व ते दर आठवड्याने बदला. यामुळे त्या रुममधील नकारात्मक ऊर्जा कमी होईल.

थंडाईचे सरबत

थंडाईचे सरबत


साहित्य – बदाम १५० ग्रॅम, खसखस १२५ ग्रॅम, पाणी १ लिटर, सायट्रीक अ‍ॅसिड ५
ग्रॅम, वेलदोडे १० ग्रॅम, मिरे ३० ग्रॅम, काकडी, टरबूज, कलिंगड इ.च्या बिया एकूण ५० ग्रॅम,
गुलाबपाणी २०० मि. लि., केवडा जल १०० मि. लि., गुलाब पाकळ्या ५० ग्रॅम, पोटॅशियम
मेटा बाय सल्फेट २ ग्रॅम, साखर ३ किलो.

कृति – बदाम, कलिंगड, टरबूज, काकडी इ. च्या बिया रात्री वेगवेगळ्या भांड्यात
भिजत घाला. दुसर्‍या दिवशी बदामाच्या साली उतरवून ते बारीक वाटून घ्या. आता सर्व
मसाले, बिया, गुलाब पाकळ्या एकत्र वाटून घ्या. साखरेचा एकतारी पाक बनवून सायट्रीक
अ‍ॅसिड व बदामाचे वाटण व मसाल्याचे मिश्रण मिसळा. १० ते १५ मिनिटे उकळा. जाळा
वरून उतरवून घ्या. मिश्रण थंड झाल्यानंतर इसेन्स, गुलाबपाणी व पोटॅशियम मेटाबाय
सल्फेट मिसळून बाटलीत भरून ठेवा.

बोका आणि उंदीर

बोका आणि उंदीर

एका बिळात एक उंदीर राहत असतो तो एकदा आजारी पडला. दिवसभर तो बिळातच पडून राहू लागला. बरेच दिवस झाले उंदीर बाहेर आला नाही, हे पाहून बोकोबा त्याची विचारपूस करण्यासाठी त्याच्याकडे आला आणि बिळाबाहेर बसत खोटा कळवळा दाखवीत मानभावीपणे म्हणाला, “काय उंदरोबा, आजारी पडला की काय? आता कशी आहे तुझी प्रकृती? बाबा, काय औषधपाणी लागलं. सवरलं, तर मला सांग. मी लागतील ती औषधं तुला आणून देईन. शेजार्‍याने शेजार्‍याच्या उपयोगी पडणे, हाच खरा शेजारधर्म. संकटकाळात, आजारपणात एकमेकांना साहाय्य करणं, यासारखा सदगुण शोधून सापडणार नाही. “तेंव्हा उंदरोबा, जरा बाहेर या, म्हणजे तुमची प्रकृती कशी आहे, हे मला समजेल. म्हणजे मी वैदुबुवांना तुमच्या प्रकृतीचे वर्णन करून सांगताच ते तुमच्या आजारावर रामबाण औषध देतील. ते घेताच तुम्ही खडखडीत बरे होऊन उड्या मारू लागाल.” बोकोबाचे हे संभाषण उंदीर आत बसूनच ऐकत होता. तो बाहेर न येता आतूनच म्हणाला, “वा मित्रा, शेजारी असावा तर तुझ्यासारखा! किती कळवळ्याने बोललास! मित्रा, शेजारधर्माला जागून माझी जी विचारपूस केलीस, त्याबद्दल मी आभारी आहे. पण आता इथून एकदाचा निघून गेलास, म्हणजे मी लवकर बरा होईन आणि हो, पुन्हा इकडे येण्याची तसदी घेऊ नकोस.” तात्पर्य ः कारण नसताना एकाएकी जेव्हा आपले शत्रू आपल्याविषयी प्रेम दाखवू लागतात, तेव्हा खुशाल समजावे, यात त्याचा काहीतरी कावा असावा.