भात आरोग्यासाठी उपयुत

0
26

भात आरोग्यासाठी उपयुत


तांदूळामध्ये फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असल्याने तो आरोग्यासाठी चांगला
असतो असेही काही संशोधनातून समोर आले आहे. भाताबरोबर आपण भाजी, आमटी खात
असल्याने भातातून थेट शरीरावर होणारे परिणाम होत नाहीत. अनेकदा आहारतज्ज्ञही भात खा
पण तो प्रमाणात खा असे सांगतात. त्यामुळे भात पूर्ण बंद करणे हा लठ्ठपणा किंवा रक्तातील
साखर कमी करण्याचा उपाय नव्हे असे या अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यामुळे भात आरोग्यासाठी
चांगला नसतो हे विधान वादग्रस्त आहे असे म्हणता येईल.