मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
17

टोळीचा गर्व

झाडाच्या ढोलीत एक म्हातारे घुबड विश्रांती घेत असता फिरत-फिरत एक टोळ तेथे आला. त्याने आपल्या भसाड्या आवाजात गायला सुरूवात केली. बराच वेळ झाला तरी तो आपले बेसूर गायन थांबविण्याचे चिन्ह दिसेना. त्याच्या गायनाने घुबडाची झोपमोड होऊन त्याचे डोके ठणकू लागले. तेव्हा घुबड टोळाला विनंती करीत म्हणाले, “मित्रा आता तू येथून निघ. तुझ्या या पिरपिरीने मला वैताग आणलाय.” त्यावर टोळ गुर्मीतच म्हणाला, “ए चोरट्या, गप्प बैस. दिवसभर लपून बसतोस. रात्री सर्वजण झोपले, की कुठे तरी चोरी करून पोट भरतोस. तुला शरम कशी वाटत नाही? अशा प्रकारे त्याचा धिक्कार करीत टोळ त्याला शिव्या घालू लागला. त्यावर घुबड म्हणाले, “बाबा रे, माझे ऐक, नाही तर मागाहून पस्तावशील,” तरीही टोळाने आपला हेका न सोडता पुन्हा गायला सुरूवात केली. तेव्हा घुबड मनात म्हणाले,” आता याची खोड मोडलीच पाहिजे.” मग उघडपणे टोळाला म्हणाले,” अरे टोळभाऊ, माझे चुकलेच. खरे तर तू किती सुंदर गातोस ! तुझा गळा किती चांगला! ती कोकिळसुद्धा तुझ्यापुढे गाण्याचे धाडस करणार नाही. अरे, मी विसरलोच बघ. माझ्याजवळ एक अमृताची कुपी आहे. गाऊन-गाऊन तुझा घसा कोरडा पडला असेल, ये मित्रा, मी तुला थोडे अमृत प्यायला देतो. म्हणजे सुकलेल्या तुझ्या घशातून आणखी मंजूळ स्वर बाहेर पडतील.” टोळालाही ते खरेच वाटले. अमृत मिळण्याचे आशेने ते घुबडाजवळ जाताच घुबडाने त्याला पंज्यात पकडून खाऊन टाकले. तात्पर्य ः आपली कुवत किती आहे हे प्रथम ध्यानी घ्यावे.