बटाट्याचे काप
साहित्य – ३ मध्यम आकाराचे बटाटे, १ कांदा, तांबडे तिखट अर्धा टीस्पून,
चवीप्रमाणे मीठ, फोडणीचे साहित्य, तेल, ओले खोवलेले खोबरे, कोथिंबीर पाव वाटी.
कृती – बटाट्याची साले काढून त्याच्या पातळ काचर्या कराव्या. कांदाही आवडीप्रमाणे
पातळ उभा किंवा बारीक चिरावा. कढईत १ ते २ टेबलस्पून तेल तापवून मोहरी, हिंग
जिरे घालून फोडणी करावी. पाव चमचा हळद घालून लगेचच चिरलेला कांदा परतावा. कांदा
लालसर रंगाचा झाल्यानंतर बटाट्याच्या काचर्या घालून परतावे. एक वाफ आल्यानंतर
तिखट-मीठ घालावे. भाजी मऊ शिजल्यानंतर शेवटी ओले खोबरे व कोथिंबीर घालावी. या
भाजीत एक चमचा साधा मसाला घालूनही भाजी चांगली होते. तांबड्या तिखटाऐवजी
आवडीप्रमाणे हिरवी मिरची बारीक चिरून वापरली तरी छान लागते.