फिरनी

फिरनी

साहित्य : दूध ५०० मि.ली., तांदळाचे
रवाळ पीठ ५० गॅ्रम, खाण्याचा पिवळा रंग
काही थेंब, केशर अर्धा टी स्पून, वेलची पूड १
टी स्पून, बदामाचे काप २ टी स्पून, पिस्त्यांचे
काप १ टी स्पून, साखर ५० ग्रॅम, केवडा
इसेन्स ८-१० थेंब.
कृति : तांदळाचे पीठ दुधात घालून
उकळा व सतत ढवळत राहा. मंद जाळावर
शिजवा. जेव्हा तांदूळ व्यवस्थित शिजतील
तेव्हा साखर मिसळून जाळावरून खाली
उतरवा.
नंतर त्यात वेलची पूड, केशर, केवडा
मिसळा आणि बदामाच्या व पिस्त्याच्या
कापांनी सजवून सर्व्ह करा.

वास्तू

पाण्याचा साठा कोठे असावा
कुठे बोअरिंग करावे, हँडपंप कुठे
बसवायचा, अंडरग्राऊंड टाकी बांधायची
असेल तर योग्य जागा म्हणजे उत्तर वा पूर्व
दिशा निवडावी. याउलट ओव्हरहेड टाकी
मात्र दक्षिण वा पश्चिम बाजूसच असावी.
बांधकाम करताना टाकी लावायची असेल तर
टाकीची शास्त्रोत पूजा-अर्चा करावी.

मजबूत दातांसाठी

बाभळीच्या आंतील सालीच्या काढ्याच्या
गुळण्या केल्याने दात मजबूत होतात.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

दात येताना बाळ रडत असेल तर

दात येताना बाळ रडत असेल तर २
चमचे जाड बडीशेप कपभर पाण्यात उकळा
व ती गाळून ते पाणी एक-एक चमचा
दिवसातून ४ वेळा पाजा. बाळाला दात येताना
त्रास होणार नाही.

हसा आणि शतायुषी व्हा!

गुरुजी : चिंंटु सांग बरं जास्त नशा कशात आहे?
चिंटु : पुस्तकात
गुरुजी : कसं काय?
चिंटु : उघडलं की झोप येत

दैनिक पंचांग गुरुवार, दि. ९ मे २०२४

—, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर,
वैशाख शुलपक्ष, कृत्तिका ११|५५
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६
वा. २९ मि.

राशिभविष्य

मेष : आजचा दिवस आपणास पैसे मिळवण्याच्या आणि व्यापाराच्या नव्या संधी देईल. परंतु, घाई करणे वादाला कारण ठरू शकते. व्यापार-व्यवसायात स्थिती अनुकूल राहील.

वृषभ : आज रात्री विश्रांती घ्या. घर बदलण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. शत्रू प्रभावहीन ठरतील. कौटुंबिक वातावरण सुखद राहील. आरोग्याच्या दृष्टीने काळ अनुकूल आहे.

मिथुन : आजचा दिवस आपल्यासाठी नवीन सुरुवात करणे किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय निर्धारित करण्यात सहायक ठरेल. आर्थिक प्रयत्नांमध्ये स्थिती अनुकूल राहील.

कर्क : आपल्या जीवनातील इच्छित वस्तूवर लक्ष द्या. कौटुंबिक प्रकरणांमध्ये कोणत्याही प्रकारचे विवाद टाळा. वैवाहिक
सुख वाढेल.

सिंह : नोकरदार व्यक्तींनी कार्यात सहयोग घेऊन चालावे. कौटुंबिक प्रश्नांचे निराकरण होईल.

कन्या : प्रसिद्धी मिळेल. अडकलेली कार्ये योग्य वेळी होतील. नोकरदार व व्यापारी बंधूंना लाभ मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ चांगला जाईल.

तूळ : नेहमीपेक्षा अधिक चांगले काही घडण्यासाठी आपणास आपल्या कामात एकाग्रता वाढवण्याची आवश्यकता आहे.

वृश्चिक : व्यापार-व्यवसायात स्थिती नरम-गरम राहील. आरोग्य उत्तम राहील व एखाद्या जुन्या मित्राशी भेट होण्याची शयता आहे.

धनु : एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष देऊ नका.

मकर : वाहने व उपकरणे जपून चालवा नाहीतर नुकसान होण्याची संभावना आहे. आनंदाची बातमी मिळेल.

कुंभ : व्यापार-व्यवसायात स्थिती संमिश्र राहील. चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल.

मीन : एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात सुख मिळेल.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

पांढरा ढोकळा

पांढरा ढोकळा

साहित्य : उडीदडाळ दीड कप,
तांदळाचा रवा ४ कप, दाटसर आंबट ताक
अडीच कप, हिरव्या मिरच्या ५, आले कीस
अर्धा लहान चमचा, ओले खोबरे कीस
दोन चमचे, चिरलेली कोथिंबीर दोन चमचे,
खाण्याचा सोडा दोन चिमूट, मीठ, तेल.
कृति : उडीद डाळ रात्रीच भिजत
घाला. सकाळी उपसून त्यात मिरची घालून
वाटून घ्या. त्यातच तांदूळ, रवा, ताक व थोडे
कोमट पाणी घालून मिश्रण कालवा. त्यावर
झाकण ठेवून ४ तास तसेच ठेवा. नंतर या
मिश्रणात सोडा घालून ते आले पेस्ट, मीठ
यात मिसळून चांगले कालवून घ्या. एका
ताटास तेलाचा हात फिरवून त्यावर वरील
मिश्रण सारखे, पातळ पसरून नेहमीप्रमाणे
बारा-पंधरा मिनिटे वाफवून निवल्यावर
त्याच्या वड्या पाडा. मग त्यावर नारळ कीस
व चिरलेली कोथिंबीर पसरून घाला.

गोंगाटामुळे काय दुष्परिणाम होतात?

गोंगाटामुळे काय दुष्परिणाम होतात?

गोंगाटामुळे परीक्षेच्या काळात अभ्यासात लक्ष लागत नाही, मन एकाग्र होत नाही; हे तुम्ही नक्कीच अनुभवले असेल. कारण वैयक्तिक वा सार्वजनिक आनंदाच्या कोणत्याही प्रसंगी मोठ्या आवाजात लाउडस्पीकरवर गाणी लावून गोंधळ घालायचा प्रकार आपल्याकडे आहे. भले मग कोणाचे कान बहिरे का होईनात! चुकीच्या वेळी, चुकीच्या जागी, चुकीचा आवाज म्हणजेच गोंगाट होय. आवाजाची तीव्रता डेसीबल या एककात मोजतात. माणूस ८५ डेसीबल इतया तीव्रतेपर्यंतचा आवाज सहन करू शकतो. तसेच २० ते २०,००० हटर्झ एवढ्या वारंवारतेचा आवाजच तो ऐकू शकतो. गोंगाटाचे अनेक दुष्परिणाम होतात. यात कानात आवाज होणे, दडे बसणे, थकवा येणे तसेच बहिरेपणा यांचा समावेश होतो. गोंगाटामुळे संवाद साधण्यात अडथळा येतो. चिडचिडेपणा येतो. काम करण्याची व्यक्तीची क्षमता कमी होते. याखेरीज गोंगाटात रक्तदाब वाढतो, नाडीचे ठोके वाढतात, श्वसनाचा दर वाढतो; तसेच घाम येण्याच्या प्रमाणातही वाढ होते. अशा प्रकारे गोंगाटामुळे अनेक दुष्परिणाम होतात. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी आवाज जेथे निर्माण होतो तेथेच त्यावर नियंत्रण ठेवणे, ध्वनिरोधक साधनांचा वापर, व्यक्तीचे कानातील बोळ्यांसारख्या साधनांनी आवाजापासून रक्षण करणे इत्यादी उपाय करता येतात.

सुविचार

दुर्जनांशी चांगुलपणाने वागणे म्हणजे सज्जन लोकांबरोबर वाईटपणाने वागल्यासारखे आहे.

केस का गळतात?

केस का गळतात?

केस गळण्याच्या समस्यांमधे केस विरळ
होणे ते पूर्ण टक्कल पडणे यांचा समावेश
असतो. केस अनेक कारणांमुळे गळू शकतात.
वैद्यकीयदृष्ट्या, केस गळणे हे अनेक श्रेणींमध्ये
विभागता येते, त्यामध्ये दीर्घकाळ चाललेला
आजार, मोठी शस्त्रक्रिया किंवा गंभीर संक्रमण
यांसारख्या प्रमुख शारीरिक तणावानंतर दोन
ते तीन महिन्यांत केस गळणे ही सामान्य
स्थिती आहे. संप्रेरकांच्या पातळीत अचानक
बदल होणे, विशेषतः महिलांमध्ये प्रसुतीनंतर
असा बदल होण्याने केस गळतात. मध्यम
प्रमाणात केस गळतात परंतु मोठ्या प्रमाणात
चट्टे पडणे हे दुर्मिळ आहे. ठराविक औषधांच्या
दुष्परिणामांमुळे केस गळू शकतात आणि
अचानक केस गळून संपूर्ण डोके प्रभावित होऊ
शकत