पाककला

0
21

पांढरा ढोकळा

साहित्य : उडीदडाळ दीड कप,
तांदळाचा रवा ४ कप, दाटसर आंबट ताक
अडीच कप, हिरव्या मिरच्या ५, आले कीस
अर्धा लहान चमचा, ओले खोबरे कीस
दोन चमचे, चिरलेली कोथिंबीर दोन चमचे,
खाण्याचा सोडा दोन चिमूट, मीठ, तेल.
कृति : उडीद डाळ रात्रीच भिजत
घाला. सकाळी उपसून त्यात मिरची घालून
वाटून घ्या. त्यातच तांदूळ, रवा, ताक व थोडे
कोमट पाणी घालून मिश्रण कालवा. त्यावर
झाकण ठेवून ४ तास तसेच ठेवा. नंतर या
मिश्रणात सोडा घालून ते आले पेस्ट, मीठ
यात मिसळून चांगले कालवून घ्या. एका
ताटास तेलाचा हात फिरवून त्यावर वरील
मिश्रण सारखे, पातळ पसरून नेहमीप्रमाणे
बारा-पंधरा मिनिटे वाफवून निवल्यावर
त्याच्या वड्या पाडा. मग त्यावर नारळ कीस
व चिरलेली कोथिंबीर पसरून घाला.