सुडौल बांध्यासाठी

सुडौल बांध्यासाठी
वजनाबाबत जागरूक स्त्रीने पुढील सुलभ
व्यायाम-प्रकार नियमितपणे व आग्रहाने करून
पहावेत म्हणजे तिला वजन नियंत्रण करणे,
घटविणे जमू शकते. शरीर चुस्त होऊन त्यात
तरतरी यावी यासाठी पाय ताठ करून व ते
जुळवून उभे रहावे. कथ्थक नृत्यात दोन्ही हात
जमिनीस आडवे व समांतर ठेवतात, तसे ठेवा.
मग डावा गुडघा हातांच्या दिशेने वर उचलत
न्या. उजवा पाय ताठच ठेवा मग उजवा गुडघा
असाच वर उचला व डावा पाय स्थिर ठेवा.
आलटून पालटून ७५ वेळा करा. नियमितपणे
दोरीवरी उड्या मारा. दर आठवड्यास एका
दमात मारल्या जाणार्‍या उड्यांची संख्या
वाढवत न्या. पोट कमी व्हावे यासाठी सोपा
उपाय म्हणजे बसताना, उठताना, लिहीत वा
चालत असताना पोट आत ओढा.

सुविचार

परोपकार करणारे संतपुरुष फळाची अपेक्षा कधी ठेवत नाहीत. : संत तुलसीदास

रगडा ऑन टोस्ट

रगडा ऑन टोस्ट

साहित्य : २ कप पांढरे वाटाणे,
१/४ चमचा खायचा सोडा, १ चमचा बारीक
चिरलेला कांदा, २ चमचे टोमॅटो, १ चमचा
हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट, चिरलेली
कोथिंबीर, चाट मसाला १ चमचा, १ मोठी
वेलची, २ लवंगा, दालचिनी १/२ इंचीचा
तुकडा, मीठ चवीप्रमाणे, १ चमचा लिंबाचा
रस, ८ ब्रेडचे स्लाईस.
कृती : वाटाण्यांना रात्रभर भिजत
ठेवावे. कुकरमध्ये पाणी, लवंग, दालचिनी,
मोठी वेलची आणि १/२ चमचा मीठ टाकून
गळेपर्यंत शिजवून घ्यावे. नंतर उकळलेल्या
वाटाण्यांमधून लवंगा, दालचिनी आणि मोठी
वेलची वेगळी काढून घ्यावी.
त्यात कांदे, टोमॅटो, हिरव्या मिरच्या,
कोथिंबीर, चाट मसाला, मीठ इत्यादी सामग्री
टाकून मिश्रण एकजीव करावे. रगडा (भाजी)
तयार आहे. आता टोस्टरमध्ये ब्रेड भाजून
त्यावर थोडीसी भाजी आणि कोथिंबीर घालून
सर्व्ह करावे.

केस गळणे थांबविण्यासाठी

केस गळणे थांबविण्यासाठी
* केस तसेच सौंदर्यवर्धनासाठी
नारळाचे पाणी अतिशय उपयुक्त आहे. केस
धुण्यापूर्वी साधारण एक तास आधी नारळाचे
पाणी केसांना आणि टाळूला चोळून लावावे.
यामुळे केस मुलायम तर होतातच शिवाय
केसांच्या मुळांचे पोषण होऊन केस गळण्याचे
प्रमाण कमी होते व केसांची वाढ व्हायला
लागते.
* रात्री चेहर्‍यावर कच्च्या बटाट्याची
फोड चोळावी. सकाळी धुवावे. चेहरा स्वच्छ
होतो.

वास्तू

* बाथरूममध्ये बाथटब पूर्व, उत्तर
किंवा ईशान्य दिशेस असावा.
* शौचालयातील नळ पूर्व किंवा उत्तर
दिशेस असावा

शेंगदाणे भाजण्यापूर्वी

शेंगदाणे भाजण्यापूर्वी शेंगदाण्यांना पाणी
लावून ते चोळावे त्यानंतर वीस मिनिटांनी ते
भाजण्यास घ्यावे म्हणजे शेंगदाण्याची साले
पटकन सुटतील.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

हसा आणि शतायुषी व्हा!

आई : बेटा तु केस का कापत नाही ?
मुलगा : फॅशन आहे आई.
आई : गाढवा तुझ्या ताईला पाहून गेलेल्या पाहुण्यांचा निरोप
आलाय लहान मुलगी पसंत आहे म्हणून. आता जा
नांदायला

दैनिक पंचांग शुक्रवार, दि. १० मे २०२४

अक्षय्य तृतीया, श्री बसवेश्वर जयंती,
श्री परशुराम जयंती, शके १९४६ क्रोधीनाम
संवत्सर, वैशाख शुलपक्ष, रोहिणी १०|४७
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६
वा. २९ मि.

राशिभविष्य

मेष : काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. आपल्या एखाद्या जवळच्या मित्राला संताप येईल, असे कही बोलू नका. अधिक व्यग्र राहील. आपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल.

वृषभ : संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. बेर्पवाईने वागु नका. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. वेळेचा सदुपयोग केल्याने लाभ मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील.

मिथुन : कार्यात विलंब झाला तरी यश मिळेल. नोकरदारांनी इतर व्यक्तींची मदत घेऊन कामे करावी. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा. व्यापार-व्यवसायात देवाण-घेवाण टाळा.

कर्क : आजचा दिवस चांगला नाही आणि कार्य करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. ध्येय साध्य करण्यात पूर्ण यश मिळेल. महत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. मुले त्रास देऊ शकतात.

सिंह : कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील.
अनुकूल ते सहकार्य मिळेल. कामात व्यस्तता अधिक असल्याने आरोग्यावर विपरीत प्रभाव पडू शकतो. आरोग्याची काळजी घ्या. वाहने काळजीपूर्वक चालवा.

कन्या : शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेटची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा.

तूळ : व्यापार व्यवसायात आशादायक परिणाम मिळतील. दिवस चांगला जाईल. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या.

वृश्चिक : जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू सुधार होईल. धर्म, आध्यात्मात रूचि वाढेल. अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहील. कार्यक्षेत्राचा विकास आणि विस्तार होईल. वाहने जपून चालवा.

धनु : आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. व्यापार-व्यवसायात देवाणय्घेवाण टाळा. कोणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका. काळजीपूर्वक काम करा.

मकर : वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. भागीदारीतून विशेष लाभ. उपजीविकेच्या स्त्रोतातून लाभ होईल, लोकप्रियतेत वृद्धि होईल.

कुंभ : भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शयता आहे. काळजीपूर्वक कार्य करा. मागील उधारी वसुल होईल. अध्ययनात
छान यश. अर्थप्राप्तिचा योग. परिश्रमाने कामाचे शुम परिणाम येतील.

मीन : स्वाक्षरी करण्यापूर्वी कागदपत्रे वाचून घ्या. आजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

सुविचार

जर जगाने तुम्हाला चांगले म्हणावेसे वाटत असेल, तर तुम्ही स्वतःला चांगले म्हणू नका.

आले खा स्वस्थ राहा

आले खा स्वस्थ राहा
आले खाल्ल्याने करपट ढेकर येणे, खोकला, दमा, ताप, मळमळ, उलटी सर्दी आदी
आजार कायमस्वरुपी नष्ट होतात. त्याचबरोबर आपण चहामध्ये टाकूनही आल्याचे सेवन करू
शकतो. आले हे अत्यंत आरोग्यदायी आहे. वारंवार अ‍ॅसिडीटीचा त्रास असणार्‍यांनाही आले
उपयुत आहे.