दैनिक पंचांग गुरुवार, दि. ९ मे २०२४

0
31

—, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर,
वैशाख शुलपक्ष, कृत्तिका ११|५५
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६
वा. २९ मि.

राशिभविष्य

मेष : आजचा दिवस आपणास पैसे मिळवण्याच्या आणि व्यापाराच्या नव्या संधी देईल. परंतु, घाई करणे वादाला कारण ठरू शकते. व्यापार-व्यवसायात स्थिती अनुकूल राहील.

वृषभ : आज रात्री विश्रांती घ्या. घर बदलण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. शत्रू प्रभावहीन ठरतील. कौटुंबिक वातावरण सुखद राहील. आरोग्याच्या दृष्टीने काळ अनुकूल आहे.

मिथुन : आजचा दिवस आपल्यासाठी नवीन सुरुवात करणे किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय निर्धारित करण्यात सहायक ठरेल. आर्थिक प्रयत्नांमध्ये स्थिती अनुकूल राहील.

कर्क : आपल्या जीवनातील इच्छित वस्तूवर लक्ष द्या. कौटुंबिक प्रकरणांमध्ये कोणत्याही प्रकारचे विवाद टाळा. वैवाहिक
सुख वाढेल.

सिंह : नोकरदार व्यक्तींनी कार्यात सहयोग घेऊन चालावे. कौटुंबिक प्रश्नांचे निराकरण होईल.

कन्या : प्रसिद्धी मिळेल. अडकलेली कार्ये योग्य वेळी होतील. नोकरदार व व्यापारी बंधूंना लाभ मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ चांगला जाईल.

तूळ : नेहमीपेक्षा अधिक चांगले काही घडण्यासाठी आपणास आपल्या कामात एकाग्रता वाढवण्याची आवश्यकता आहे.

वृश्चिक : व्यापार-व्यवसायात स्थिती नरम-गरम राहील. आरोग्य उत्तम राहील व एखाद्या जुन्या मित्राशी भेट होण्याची शयता आहे.

धनु : एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष देऊ नका.

मकर : वाहने व उपकरणे जपून चालवा नाहीतर नुकसान होण्याची संभावना आहे. आनंदाची बातमी मिळेल.

कुंभ : व्यापार-व्यवसायात स्थिती संमिश्र राहील. चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल.

मीन : एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात सुख मिळेल.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर