उजळ चेर्‍यासाठी

उजळ चेर्‍यासाठी
उडीद डाळीची पावडर बनवून त्यात
थोडेसे गुलाबपाणी, ग्लिसरीन व बदाम रोगन
मिसळून चेहर्‍यावर लावावे. यामुळे चेहरा
उजळतो.

पेढे उरल्यास

पेढे उरल्यास कुस्करून दुधात घालून
बासुंदी करावी.
बल्ब पेटवण्यापूर्वी (लाईट लावण्यापूर्वी)
त्यावर अत्तर किंवा कोलोनचे एखादा थेंब
टाकल्यास रुममध्ये सुगंध पसरेल; परंतु ते
कधीही तापलेल्या बल्बवर टाकू नये.

वास्तू

पूर्व ही ‘सूर्योदयाची दिशा’ होय. ही
फार मोठी प्रतिष्ठा या दिशेच्या वाट्याला
आली आहे. या दिशेला ‘विजयाची दिशा’
असेही म्हटले जाते. ही दिशा शक्ती व
सामर्थ्य प्राप्त करून देणारी दिशा आहे, अशी
वास्तुशास्त्राची धारणा आहे. या दिशेहून
येणारी सकाळची कोवळी सूर्यकिरणे अंगावर
घेतल्यामुळे अनेक आजारधुपारांपासून
मुक्ती मिळते. ज्ञानोदयासाठी योगी,
विद्यार्थी,विद्वान तोंड पूर्वेकडे करून झोपण्याचा
नियम कटाक्षाने पाळतात. मानसिक विकार
झालेल्या रुग्णाला पूर्व दिशेकडे तोंड करून
झोपवल्याने त्याची मानसिक स्थिती झपाट्याने
सुधारते.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

हसा आणि शतायुषी व्हा!

पिंट्या : जर मी या नारळाच्या झाडावर चढलो तर मला
इंजिनिअरींग कॉलेजच्या
मुली दिसतील का रे?
गण्या : हो… दिसतील की
पिंट्या : आणि हात जर सुटला तर
गण्या : तर मेडीकल कॉलेजच्या पण दिसतील.

दैनिक पंचांग बुधवार, दि. ८ मे २०२४

गुरू पश्चिम लोप, शके १९४६ क्रोधीनाम
संवत्सर, चैत्र कृष्णपक्ष, भरणी १३|३४
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६
वा. २९ मि.

राशिभविष्य

मेष : वैवाहिक जीवनात स्थिती अनुकूल राहील. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल. शत्रू पराभूत होतील. सावधगिरी बाळगा.

वृषभ : अडचणी येण्याची शयता आहे. काळजीपूर्वक कार्य करा. मोठ्यांचा आधार मिळाल्याने कार्य पूर्ण होतील.

मिथुन : मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मातृपक्षाकडून सहयोग मिळेल. व्यवसायात स्थिती सुखद राहील.

कर्क : मित्रांची मदत मिळेल. आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील. व्यापार-व्यवसायात परिस्थिती मध्यम राहील. कोणत्याही प्रकारचे जोखिम टाळा.

सिंह : घरात किंवा पैशांमध्ये वाढ झाल्याने आपणास आनंद मिळेल. आपला निष्काळजी दृष्टीकोन चांगला ठरणार नाही.

कन्या : व्यापारात आपणास कमी प्राप्ती होईल पण नुकसान मोठे होईल. जर आपणास एका कार्यात अवनती होईल.

तूळ : आपल्या आत्मविश्वासाचा स्तर वाढविण्याचा प्रयत्न करा. धार्मिक भावना वाढेल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल सहकार्यांबरोबर प्रतिष्ठा वाढेल.

वृश्चिक : अधिक श्रम करावे लागतील. व्यापार-व्यवसाय व आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. भविष्यात मानय्सन्मानात वाढ होईल.

धनु : शत्रू पक्षापासून सावध राहा. आनंदाची बातमी मिळेल. सौंदर्यावर धन व्यय होईल. मनोरंजनाच्या विषयांमध्ये वेळ खर्च
होईल.

मकर : पत्नीपासून सुख मिळेल. सामाजिक क्षेत्रांमध्ये अजून काही विशेष कार्ये होणार नाही. अनुकूल स्थिती मिळेल.

कुंभ : एखादी व्यक्ती निष्कारण आपल्याला त्रास देईल. गृह भूमीसंबंधी विषयांमध्ये लाभ मिळेल. खरेदी-विक्रीत लाभ
मिळण्याची स्थिती बनेल.

मीन : व्यवसायासाठी उत्तम वेळ. नवीन कामात यश मिळेल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. शत्रू प्रभावहीन पडतील. आरोग्य उत्तम राहील.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

थंडीच्या दिवसांत आपण का कुडकुडतो?

थंडीच्या दिवसांत आपण का कुडकुडतो?

थंडीचे दिवस, सकाळची शाळा, अशावेळेस उठणे जीवावर येते. नाईलाजाने उठून कुडकुडत आपण शाळेत जातो. थंडी असल्यावरच का कुडकुडतो? उन्हाळ्यात का नाही? कुडकुडणे ही आपल्या शरीराची थंडीपासून संरक्षण करण्यासाठीची क्रिया आहे. आपण कुडकुडतो म्हणजे आपले स्नायू थरथरत असतात. आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित राखणे आवश्यक असते. फार उष्णता वा फार थंडी यामुळे शरीरातील अवयवांना हानी पोहोचू शकते. यामुळेच बेडकासारखे थंड रक्ताचे प्राणी अशा काळात हायबरनेशनमध्ये जातात व स्वतःला खोल पुरून घेतात. या थंड रक्ताच्या प्राण्यांना शरीराच्या तापमानाचे नियंत्रण करता येत नाही, म्हणून ते असे करतात; परंतु मानव हा गरम रक्ताचा प्राणी आहे. शरीराच्या तापमानाचे नियंत्रण वातावरणातील बदलाप्रमाणे तो करू शकतो.

त्यामुळेच उष्णता वाढली की घाम येऊन व थंडी वाढली की कुडकुडण्याच्या क्रियेने शरीराचे संरक्षण केले जाते. कुडकुडणे म्हणजे स्नायूच्या थरथरण्याच्या हालचालीने स्नायूंतून उर्जा निर्माण केली जाते व तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो. काही वेळा तापातही व्यक्तीचे हातपाय थडथड उडतात. हिवतापामध्ये रोगजंतूमुळे मेंदूच्या तापमान नियंत्रण केंद्राचे कार्य बिघडते. याचा परिणाम म्हणून ताप असतानाही कुडकुडण्याच्या क्रियेतून शरीरातील उष्णता वाढवण्याचा प्रयत्न केला जातो!

बहुपयोगी नारळ

बहुपयोगी नारळ
सौंदर्याच्या दृष्टीकोनातून नारळाचे तेल फार उपयुक्त आहे. नारळाचा खोवलेला कीस,
नारळाचे पाणी, दुध, तेल इतकेच काय तर नारळाची कवटी सुद्धा सौंदर्यवृद्धीसाठी फार
महत्त्वाची आहे. नारळामध्ये विविध प्रकारचे एन्झाइम्स असतात. यात प्रामुख्याने इन्व्हेस्टीन,
ऑसिडेज् आणि उटॅलेज यांचा समावेश असतो. तसेच ओल्या नारळात तेल, प्रथिने आणि
इतर इनोग्यानिक तत्व असतात. नारळाच्या पाण्याची एक अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे स्त्री
गर्भार राहिल्या नंतर आठवड्यातून दोन-तीन वेळा नारळाचे पाणी नियमित पिल्यास बाळाची
कांती सुधारते आणि बाळाचा रंग उजळतो, ओले आणि सुके खोबरे शांती देणारे, कामशक्ती
वाढवणारे, पोट साफ होण्यास मदत करणारे, तसेच बद्धकोष्ठाचा नाश हि होतो. त्वचेचे आरोग्य
त्यामुळे सुधारते.

सुविचार

शरीर परोपकारी लावावे | बहुतांच्या कार्यास यावे | उणे पडो नेदावे | कोणि एकाचे : समर्थ रामदास

आलू दम दहीवडा

आलू दम दहीवडा

साहित्य : २५० ग्रॅम छोटे गोल बटाटे,
अर्धा पेला कांदा, आले-लसूण पेस्ट, २-३
मिरच्या, २-३ तमालपत्र, एक छोटा तुकडा
दालचिनी, २ मसाल्याचे वेलदोडे, एक छोटा
चमचा धने, अर्धा छोटा चमचा साखर, सव्वा
छोटा चमचा हळद, सव्वा छोटा चमचा मीठ.
दहीवड्यासाठी साहित्य ः एक पेला
उडीदडाळ, एक मोठा चमचा आले व हिरव्या
मिरचीचे वाटण, चिमूटभर हिंग, चिमूटभर
जिरे, सव्वा छोटा चमचा मीठ, तळण्यासाठी
तेल, एक मोठा चमचा बारीक चिरलेली
कोथिंबीर, दोन पेले घुसळलेले दही, भाजकी
जिरेपूड, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, शेव.
कृति : मिठाच्या पाण्यात बटाटे उकडून
थंड करून सोलून काट्याने टोचून ठेवा.
तेल तापवा. त्यात लाल मिरच्या, तमालपत्र,
वेलदोडे, जिरे, दालचिनी, धने टाकून फोडणी
तयार करा. त्याच तेलात कांदा टाकून गुलाबी
होईपर्यंत परता. साखर, मीठ, हळद टाकून
परता. बटाटे ते मिश्रण व्यवस्थित परता.
दीड-दोन पेले पाणी टाकून दाट होईपर्यंत
शिजवा.
दहीवड्यासाठी रात्री डाळ भिजत घाला.
सकाळी त्यात हिंग, मीठ, हिरव्या मिरच्या,
आल्याची पेस्ट टाकून वाटून घ्या. तेल
तापवून गोल वडे बनवून तळून पाण्यात
भिजवा. हाताने दाबून पाणी काढा व बाजूला
ठेवा. अर्धा लहान चमचा तेल गरम करून
त्यात जिरे टाकून तडकवा व त्याची दह्याला
फोडणी द्या. वडे दह्यात टाका.

मुलायम केसांसाठी

मुलायम केसांसाठी
* चार लहान चमके खोबरेल तेलात
कापराच्या दोन वड्या मिसळा, हे मिश्रण
रात्री केसांना लावून ठेवा व सकाळी शाम्पूने
धुवा. केस स्वच्छ, मुलायम व कोंडाविरहित
होतील.
* मधात तुळस वाटून मिसळून चेहर्‍याला
लावल्यास मुरमे व डाग दूर होतात. हे एक
फेअरनेस क्रिमचे काम करते.