केस का गळतात?
केस गळण्याच्या समस्यांमधे केस विरळ
होणे ते पूर्ण टक्कल पडणे यांचा समावेश
असतो. केस अनेक कारणांमुळे गळू शकतात.
वैद्यकीयदृष्ट्या, केस गळणे हे अनेक श्रेणींमध्ये
विभागता येते, त्यामध्ये दीर्घकाळ चाललेला
आजार, मोठी शस्त्रक्रिया किंवा गंभीर संक्रमण
यांसारख्या प्रमुख शारीरिक तणावानंतर दोन
ते तीन महिन्यांत केस गळणे ही सामान्य
स्थिती आहे. संप्रेरकांच्या पातळीत अचानक
बदल होणे, विशेषतः महिलांमध्ये प्रसुतीनंतर
असा बदल होण्याने केस गळतात. मध्यम
प्रमाणात केस गळतात परंतु मोठ्या प्रमाणात
चट्टे पडणे हे दुर्मिळ आहे. ठराविक औषधांच्या
दुष्परिणामांमुळे केस गळू शकतात आणि
अचानक केस गळून संपूर्ण डोके प्रभावित होऊ
शकत