धुरामुळे गुदमरल्यासारखे का होते?
धुरात माणूस गुदमरतो. याचे कारण काय ते आता पाहू. आपण हवा श्वासावाटे आत घेतो. त्यात ऑसिजन (२०.९३ टक्के), कार्बन डायऑसाइड (०.०३ टक्के), नायट्रोजन (७८.१ टक्के) तसेच अत्यल्प प्रमाणात निऑन, अॅर्गान, क्रिप्टॉन, झेनॉन व हेलीयम हे वायू असतात. याखेरीज पाण्याची वाफ, अमोनिया तसेच धूळ, जिवाणू, वनस्पतीजन्य कचरा असे तरंगणारे पदार्थही असतात. धुरामध्ये कार्बन डायऑसाइड असतो. हवेतील त्याचे प्रमाण वाढल्याने व ऑसिजनचे प्रमाण कमी झाल्याने गुदमरल्यासारखे वाटत असेल असा पूर्वी समज होता. प्रत्यक्षात मात्र ऑसिजनचे प्रमाण १८ टयांपर्यंत कमी झाले वा कार्बन डायऑसाइडचे प्रमाण ५ टयांपर्यंत वाढले, तरी आपल्याला फारसा त्रास होत नाही; असे शास्त्रीय निरीक्षणाद्वारे सिद्ध झाले आहे. धुरामध्ये माणसाला गुदमरल्यासारखे वाटते, अस्वस्थ वाटते. याचे कारण म्हणजे तापमानात होणारी वाढ. तापमानातील वाढीमुळेच माणसाचा मृत्यूही ओढवू शकतो. कलकत्त्यामध्ये एका तुरुंगात १८ु१४ु१० फुटाच्या खोलीत १४६ कैदी होते. खोलीला वायूवीजनासाठी पुरेशा अशा दोन लहान खिडया होत्या. ऑसिजन, कार्बन डॉयऑसाइड यांचे प्रमाण सामान्य राहूनही त्यातील फक्त २३ जण जिवंत राहिले. कारण त्या खोलीतील तापमान व आर्द्रतेत खूपच वाढ झाली होती. अर्थात धुरामुळे हवेतील कार्बन डायऑसाइडचे प्रमाण ५ टयांच्या वर गेले, तर त्यामुळेही गुदमरल्यासारखे होते.