मिश्र डाळींची भजी

0
60

मिश्र डाळींची भजी


साहित्य – मूग, मसूर, उडीद, हरभरा, तूर इ. सर्व प्रकारच्या डाळी एकूण २५०
ग्रॅम होतील एवढ्या घ्या. थोडीशी कोथिंबीर, ३-४ हिरव्या मिरच्या, खाण्याचा सोडा अर्धा
लहान चमचा, मीठ १ लहान चमचा, मिरची पूड १ लहान चमचा, कांदे २, आले २ गाठी,
तूप २५० ग्रॅम.

कृति – सर्व डाळी निवडून ४-५ तास आधीच भिजत घाला. त्या व्यवस्थित
भिजल्यानंतर बारीक वाटून घ्या. आले व कांदा बारीक किसून घ्या. सारे मसाले वाटलेल्या
डाळीत मिसळून व्यवस्थित फेटून घ्या व गरम तुपात भजी तळून घ्या व टोमॅटोच्या किंवा
कोथिंबीर-पुदिन्याच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.