सुविचार

मनुष्याच्या मागे फक्त त्याचा चांगुलपणा राहतो, बाकी सर्व नष्ट होते

हातांची स्वच्छता व आहार

हातांची स्वच्छता व आहार
अधिकतर आजारांचे कारण अस्वच्छता
असते, हे आपण जाणतो. पावसाळ्यात
तर याचा धोका अधिक वाटतो. त्यामुळे
काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून घ्या.
पावसाळ्यात बाहेरचे, उघड्यावरचे पदार्थ
खाणे महागात पडू शकते.
त्यामुळे या मौसमात नेहमी घरात
शिजवलेल्या ताज्या, गरम अन्नाचा आस्वाद
घ्या. पचनतंत्र बिघडू नये म्हणून आहारात
भात, दही, ताक, दूध, केळे, जिरं, आलं
किंवा कांदा यांसारख्या पदार्थांचा समावेश
करा.

मिश्र डाळींची भजी

मिश्र डाळींची भजी

साहित्य : मूग, मसूर, उडीद, हरभरा,
तूर इ. सर्व प्रकारच्या डाळी एकूण २५०
ग्रॅम होतील एवढ्या घ्या. थोडीशी कोथिंबीर,
३-४ हिरव्या मिरच्या, खाण्याचा सोडा अर्धा
लहान चमचा, मीठ १ लहान चमचा, मिरची
पूड १ लहान चमचा, कांदे २, आले २ गाठी,
तूप २५० ग्रॅम.
कृति : सर्व डाळी निवडून ४-५
तास आधीच भिजत घाला. त्या व्यवस्थित
भिजल्यानंतर बारीक वाटून घ्या. आले व
कांदा बारीक किसून घ्या.
सारे मसाले वाटलेल्या डाळीत मिसळून
व्यवस्थित फेटून घ्या व गरम तुपात भजी
तळून घ्या व टोमॅटोच्या किंवा कोथिंबीर
पुदिन्याच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

वास्तू

बेडरुमसाठी रंगसंगती
शयनगृहातील भिंतींना हलका गुलाबी
रंग असावा तसेच दरवाजा-खिडयांचे
पडदेदेखील शयतो गुलाबी रंगाचेच असावेत.
कबुतर, लव्ह बर्डस् यांच्या जोड्या शयनगृहात
लावल्याने पती-पत्नीचे परस्परांवरील प्रेम
द्विगुणित होते.

चेहर्‍यावरील डाग

सफरचंदाच्या साली चेहर्‍यावर चोळा.
चेहर्‍यावरील डाग फिके होतात.

हाडे कॅल्शियमने बळकट करण्यासाठी

* हळद घालून गरम केलेल्या दुधात
थोडे मीठ व गूळ घालून लहान मुलांना
पाजल्याने त्यांची सर्दी, कफ यासारखे रोग
बरे होतात. जखम झालेल्या ठिकाणी हळदीची
पुड दाबून धरली असता जखमेतून निघणारे
रक्त बंद होते व जखम लवकर भरून येते.
* लिंबू शरीरातील पाचकरस वाढवते
पालक हाडे कॅल्शियमने बळकट करते.
पालेभाज्यांमध्ये लोह जास्त असते यासाठी
त्यांचा सॅलडमध्ये वापर करावा.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

हसा आणि शतायुषी व्हा!

आशा : ‘अगं, हेलमेट जरी सक्तीचं केलं ना!
तरी हे हेलमेट घेणार नाहीत.’
निशा : ‘का?’
आशा : अगं ते ठेवायला डोकं लागतं.”

दैनिक पंचांग शनिवार, दि. ११ मे २०२४

विनायक चतुर्थी, शके १९४६ क्रोधीनाम
संवत्सर, वैशाख शुलपक्ष, मृग १०|१५
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६
वा. २९ मि.

राशिभविष्य

मेष : काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. आपली बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल.

वृषभ : संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. बेर्पवाईने वागु नका.

मिथुन : कार्यात विलंब झाला तरी यश मिळेल. नोकरदारांनी इतर व्यक्तींची मदत घेऊन कामे करावी.

कर्क : आजचा दिवस चांगला नाही आणि कार्य करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका.

सिंह : कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील.

कन्या : शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेटची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा.

तूळ : व्यापार व्यवसायात आशादायक परिणाम मिळतील. दिवस चांगला जाईल. आर्थिक नुकसानीची शयता आहे. सहकार्‍यांबरोबर वादाची स्थिती टाळा.

वृश्चिक : जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू सुधार होईल. आपला विधायक दृष्टीकोन
इतरांबरोबर समन्वय साधण्यात मदत करतो.

धनु : आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील.

मकर : वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. आरोग्य उत्तम राहील. राजकीय व्यक्तींसाठी स्थिती संतोषदायक राहील.

कुंभ : भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शयता आहे. काळजीपूर्वक कार्य करा. मागील उधारी वसुल होईल. आपल्या क्रोधावर संयम ठेवा.

मीन : स्वाक्षरी करण्यापूर्वी कागदपत्रे वाचून घ्या. आजच्या दिवसाचा उपयोग नातीय्संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

हातांची स्वच्छता व आहार

हातांची स्वच्छता व आहार

अधिकतर आजारांचे कारण अस्वच्छता
असते, हे आपण जाणतो. पावसाळ्यात
तर याचा धोका अधिक वाटतो. त्यामुळे
काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून घ्या.
पावसाळ्यात बाहेरचे, उघड्यावरचे पदार्थ
खाणे महागात पडू शकते.
त्यामुळे या मौसमात नेहमी घरात
शिजवलेल्या ताज्या, गरम अन्नाचा आस्वाद
घ्या. पचनतंत्र बिघडू नये म्हणून आहारात
भात, दही, ताक, दूध, केळे, जिरं, आलं
किंवा कांदा यांसारख्या पदार्थांचा समावेश
करा

घर कसे असावे?

घर कसे असावे?

तुम्ही म्हणाल, राहणार्‍याला आवडेल असे असावे. कोणी म्हणेल सुंदर असावे, कोणी म्हणेल मजबूत असावे; पण चांगले घर कसे असते याचे काही निकष असतात. घरामुळे ऊन, वारा, पाऊस, यापासून संरक्षण होते; ही तर मूलभूत बाब आहे. घरात स्वयंपाक करणे, जेवणे, धुणे व मलमूत्र विसर्जन करणे इत्यादीसाठी सोयी असायला हव्यात. सांसर्गिक रोगांचा प्रसार कमी होईल, अशा प्रकारे घर बांधण्यात यावे. आगीसारख्या आपत्तींपासून रक्षण होण्याची सोय असावी. असे असल्यासच त्या घराला आरोग्यदायी घर असे म्हणता येईल. अशा घरात दोन व्यक्तींना राहायला कमीत कमी ११० चौरस फूट जागा असावी. तीन खोल्यांत ५ लोक, तर पाच खोल्यांत १० लोक राहू शकतील. घराभोवती मोकळी जागा असावी, घरात फरशा वा टाइल्स असाव्या, भिंती मजबूत असाव्या, छत निदान १० फूट उंचीवर असावे, दर व्यक्तीला कमीत कमी ५०० घनफूट इतकी जागा असावी. प्रत्येक खोलीला दोन खिडया असाव्यात. त्या जमिनीपासून तीन फुटाच्या वर नसाव्या. खिडकीचा भाग चटई क्षेत्राच्या १/५ इतका तर दार व खिडया मिळून २/५ इतका असावा. प्रत्येक घराला मलमूत्र विसर्जनासाठी संडास व न्हाणीघराची सोय असावी. पिण्याच्या पाण्याचा पुरेसा पुरवठा असावा. घर आरोग्यपूर्ण असेल तर क्षयरोग, इन्फ्ल्यूएझा, गोवर, घटसर्प, खरूज, कुष्ठरोग, प्लेग इत्यादी रोगांचा प्रसार होत नाही. घरातील व्यक्तींचे आरोग्य नीट राहते. आजच्या काळात घर कसे असावे, हे पैसे किती आहेत यावर अवलंबून असते. ही गोष्ट जरी खरी असली, तरी आहे त्या पैशांत आरोग्याच्या दृष्टीने सुयोग्य असे घर बांधण्याचा प्रयत्न करावा.