मुगाच्या डाळीचे वडे
साहित्य – पिवळ्या मुगाची डाळ दीड कप, उडीद डाळ अर्धा कप, कांदा, जिरेपूड
दोन चिमूटभर, बेताचे तिखट, थोडीशी कांदा पात, मीठ, तेल.
कृति – डाळी पाण्यात चार तास भिजत ठेवा. थोडासा कांदा अगदी बारीक चिरून ठेवा. कांदापातही अगदी बारीक चिरा. भिजलेली डाळ वाटून काढा. पाणी घालू नये. त्यात तिखट, कांदा पात, जिरेपूड, मीठ, चिरलेला कांदा घालून चांगले कालवून घ्या. त्याचे लहान लहान गोळे बनवा. मंद आचेवर कढईत तेल गरम करा. गरम तेलात गोळे
चांगले खरपूस तळून काढा. गरम असतानाच खा.