दैनिक पंचांग शनिवार, दि. १८ मे २०२४

शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर, वैशाख शुलपक्ष, उत्तरा २४|२३
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६ वा. २९ मि.

मेष :  आपण आपल्या इच्छेनुसार कार्य करण्याचे प्रयत्न करता त्यावेळी त्रास होण्याची
शयता आहे. गुंतवणूकीतून लाभ होण्याची शयता. सामाजिक कामात सक्रिय भागीदारी.

वृषभ : वाहने व उपकरणे जपून चालवा. आजचा दिवस थोडा कंटाळवाणा
आहे. अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्‍यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील.

मिथुन : कार्यालयीन सहकार्यांची मदत राहिल. वडीलधार्‍यांचे मार्गदर्शन मिळेल.
नियंत्रण ठेवा. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. तब्येत सांभाळा. आर्थिक लाभ.

कर्क : कार्याचा ताण आणि नवीन जबाबदार्‍या आपल्यासाठी ताण आणि काळजीचे
कारण बनू शकतात. आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानि होऊ शकते.

सिंह : कालच्या इतका आजच्या दिवस आनंदी जाणार नाही. आर्थिक स्थितीमध्ये
हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या प्रयत्नांमुळे व्यापारात वृद्धि होईल.

कन्या : आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी सतावेल. आपल्या प्रयत्नाने
उन्नति कराल. धनलाभ होईल.

तूळ  :वरिष्ठांची मर्जी राहील. नवीन कामांना चालना मिळेल. आपल्या यशाचा मूळ
मंत्र कोणत्याच कामाला अशय न समजणे आहे. मित्रांचा सहयोग मिळेल.

वृश्चिक : जास्त कार्यभार आपल्या मानसिक व्यग्रतेचे आणि ताणाचे कारण बनेल.
आपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांची भेट घ्याल. वेळेच महत्व समजा. घरात मंगल कार्य होतील.

धनु : नव्या योजना आणि प्रोजेट्स आपण आज कार्यान्वित करताल. मागील
उधारी वसूल होईल. कामाला वाव मिळेल. आपले निर्णय, विचार दुसर्‍यांवर थोपू नका.

मकर : दिवस आनंदात जाईल. लाभाच्या संधी. नवीन ओळखी संभवतात. आपल्या
बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शयता. कर्मक्षेत्रात गूढ अनुसंधाना संबंधी विशेष योग.

कुंभ : कराल पण घरगुती मुद्दे आपले लक्ष विचलीत करतील. चांगली संधी मिळेल.
मनस्थिती चांगली राहिल. इतरांना आपले विचार पटवून देण्यात आपण यशस्वी व्हाल.

मीन : सहकर्मी आपल्याबरोबर असतील. बौद्धिक योजना आरंभ करू शकाल. आपल्या
कामांची समाजात चर्चा होईल. संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग. मनात नवीन
कल्पना सुचतील.

                                                                  संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

सुविचार

 

कल्याण करणे हे पुण्यकर्म आहे व दुसर्‍यांना दुःख देणे हे पापकर्म आहे;

असे अठरा पुराणांचे सार आहे. – वेदव्यास

हसा आणि शतायुषी व्हा!

 

आई : चिंटु लवकर आंघोळ करुन घे.
नाही तर शाळा बुडेल.
चिंटु : आई बादलीभर पाण्यात शाळा
कशी काय बुडेल ग?
आईने बादलीतच बुडवून बुडवून हाणला

 

कपडे नवे दिसण्यासाठी


कपडे नवे दिसण्यासाठी
* किचनमध्ये वापरावयाचे छोटे-छोटे
सुती कपडे कुकरमध्ये पाण्यासोबत वॉशिंग
सोडा टाकून उकळले तर त्यात नव्यासारखी
चमक येते.
* चहा किंवा पाण्याच्या थर्मासमध्ये
वास येत असेल तर त्यामध्ये थोडेसे व्हिनेगर
टाकून गरम पाणी ओतावे. थोड्या वेळाने
साबणाच्या पाण्याने धुवावे.
                                                       संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

वास्तू

 

रोज पाण्यात थोडे खडे मीठ टाकून
त्याने घरातली लादी पुसा. या योगे संपूर्ण
घराची दृष्ट काढल्यासारखे होईल.

 

नारळाचे तेल नैसर्गिक प्रकारे सनटैन

 

* नारळाचे तेल नैसर्गिक प्रकारे सनटैन
दूर करतो. उन्हात बाहेर निघण्यापूर्वी २०-२५
मिनिटे पहिले चेहरा, हात-पायावर लावावे.
* टी स्पून टमाटर रस त्यात २ थेंब
लिंबू रस आणि टी स्पून गुलाबजल मिसळावे.
याला चेहर्‍यावर लावावे. हे नैसर्गिक सनस्क्रीन
लोशन आहे. यामुळे सनटैनपण कमी होतो.
चेहरा उजळता

दुष्ट लांडगा

दुष्ट लांडगा

एकदा एका लांडग्याने कपटाने कळपातला एक बोकड पळवून नेला. त्याला मारून अधाशीपणे त्याचे मांस खाऊ लागला असता घाईघाईत मांसातले एक हाडूक लांडग्याच्या नरड्यात अडकले. त्याने हाडूक काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याला ते जमले नाही. त्यामुळे त्याचा जीव कासावीस होऊ लागला. श्वास कोंडू लागला आणि दिसेल त्या प्राण्याला आपल्या नरड्यातील हाडूक काढण्याची विनवणी करू लागला. काहींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. काही मनात म्हणाले, “एकटा शिकार खातो. कधी एक घास दुसर्‍याला देणार नाही. बरी अद्दल घडली” तर काहींनी हाडूक काढण्याचा प्रयत्न केला असता हाडूक आणखी जास्तच रुतून बसले. आता आपण वाचत नाही, असे लांडग्याला वाटू लागले. इतयात तेथे बगळा आला. त्याला पाहताच लांडगा म्हणाला, “बरे झाले बाबा, देवासारखा धावून आलास. एवढे माझ्या नरड्यात अडकलेले हाडूक काढ, नाहीतर मी आता काही जगत नाही.” बगळ्याला लांडग्याची दया आली. त्याने आपली लांब चोच लांडग्याच्या नरड्यात घालून अडकलेले हाडूक अलगद बाहेर काढून लांडग्याचा प्राण वाचवला असता लांडगा आपल्याला त्याचा जीव वाचवण्याबद्दल काही तरी बक्षीस देईल म्हणून बगळा तेथेच थांबला. बगळा बक्षिसासाठी थांबल्याचे लांडग्याने ओळखताच लांडगा त्याला खवळून म्हणाला, “बक्षिसाची आशा सोड. तू हाडूक काढताना तुझी मान माझ्या तोंडात दिली होतीस तरी मी तुला खाल्ले नाही, हेच बक्षीस समज आणि चालू लाग.” बिचारा बगळा भितीने लगोलग दूर पळाला.”

तात्पर्य :  दुष्ट प्रवृत्तीचे लोक उपकार विसरून अपकारच करायला मागे पुढे पाहत नाहीत.

कावीळ – ब विरोधी लस कोणी घ्यावी?

कावीळ – ब विरोधी लस कोणी घ्यावी?

मध्यंतरी कावीळ- ब प्रतिबंधक लसीकरणाच्या शिबिरांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले. त्यामुळे अनेकांनी त्या लसी घेतल्या. पण खरेच सर्वांनी त्या लसी घेण्याची गरज होती का? कावीळीत डोळे, त्वचा, लघवी पिवळी होतात. भारतात विषाणूंमुळे होणारी कावीळ अर्थात शास्त्रीय भाषेत यकृतदाह मुख्यत्वे आढळून येतो. ‘अ’ प्रकारची कावीळ दूषित पाणी-अन्नातून पसरते. ‘ब’ प्रकारची कावीळ दूषित रक्त, तसेच शरीरातील वीर्य, योनीस्राव आदी स्रावांपासून पसरते. साहजिकच ‘अ’ प्रकारची कावीळ कोणालाही होऊ शकते; पण ‘ब’ प्रकारची कावीळ मात्र रक्त व शरीरातील इतर स्रावांशी संपर्क येऊ शकणार्‍या व्यक्तींनाच होऊ शकते. यात वैद्यकीय विद्यार्थी, परिचारिका, रुग्णालयात काम करणारे कर्मचारी, प्रयोगशाळेत काम करणारे तंत्रज्ञ, समलिंगी संबंध ठेवणारे पुरुष, शिरेवाटे मादक पदार्थ घेणारी व्यक्ती, वारंवार रक्त घ्याव्या लागणार्‍या व्यक्ती तसेच वेश्या आदींचा समावेश होतो. साहजिकच या व्यक्तींनी कावीळ ‘ब’ विरोधी लस घ्यायलाच हवी. या लसीचा डोस प्रौढ व्यक्तींसाठी १ मिली, तर मुलांसाठी ०.५ मिली इतका आहे. महिन्याच्या अंतराने पहिले दोन डोस व नंतर सहा महिन्यांनी तिसरा डोस घ्यावा लागतो. यामुळे ५ वर्षे संरक्षण मिळते. सर्वसामान्यपणे सगळ्यांना पाणी वा अन्नाद्वारे पसरणारी कावीळ ‘अ’ होण्याचा धोका जास्त असतो. या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठीही लस उपलब्ध आहे. मात्र एका लसीने एकाच प्रकारच्या कावीळीचा प्रतिबंध होतो. त्यामुळे ज्याला कावीळ ‘ब’ होण्याचा धोका आहे, त्यानेच त्या लसीवर पैसे खर्च करावे हेच योग्य होईल.

व्यायाम करणे केव्हा टाळावे

व्यायाम करणे केव्हा टाळावे


आपण नियमीत व्यायाम करणे आरोग्यासाठी चांगले आहे यात वादच नाही परंतु काही
अपरिहार्य कारणांनी व्यायाम न करणेच योग्य असते. उदा. आपण आजारी असाल तेव्हा, नशा
केलेली असेल तेव्हा, भूक, झोप आदी कारणांमुळे शरीरात अशतपणा असेल तेव्हा, भोजन
केल्यानंतर ५ तास होण्यापुर्वी, अतिशय भूक किंवा तहान लागलेल्या स्थितीत, मन संतप्त
असेल तेव्हा, स्त्रियांनी मासिक पाळी सुरू असताना. आदी कारणे असतील तर व्यायाम न
करणेच चांगले.

दैनिक पंचांग गुरुवार, दि. १६ मे २०२४

शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर, वैशाख शुलपक्ष, मघा १८|१४
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६ वा. २९ मि.

राशिभविष्य

मेष : मानसन्मानाच्या क्षेत्रात वाढ होईल. कामात एखाद्याचे सहकार्य प्रगतीचे कारण बनेल. त्यामुळे घरांत उत्साहाचे वातावरण होईल. येणारा काळ भूतकाळातील आनंद पुन्हा आणेल.

वृषभ : आर्थिक विषयांमध्ये थोड्या अडचणी येऊ शकतात. करीयर संदर्भातील नवी संधी मिळण्याची शयता. जिभेला
सुखावणारा दिवस असेल.

मिथुन :  ठरविलेले काम पूर्ण  करण्यासाठी काही प्रसंग प्रेरणादायी ठरतील. यथायोग्य विचार करून कार्य करा. मनोरंजनावर खर्च होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार व्यवसायात प्रगती होईल. खाद्या ओळखीच्या
व्यक्तीबरोबर आपले सामंजस्य वाढेल.

कर्क : निष्कारण प्रश्नांचा त्रास राहील. आरोग्याची काळजी घ्या. व्यापार व्यवसायात
वेळ साधारण राहील. देवाण-घेवाण टाळा. शीघ्र अनुकूल परिस्थिती होईल. कौटुंबिक
वातावरण उत्तम राहील. स्त्री पक्षाकडून सहयोग मिळेल.

सिंह : आजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. एखाद्या प्रोजेटसाठी किंवा महत्त्वाच्या कार्यासाठी आपले प्रयत्न वाढविण्याची वेळ आली आहे.

कन्या :  अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ आहे. ज्यांच्याबरोबर आपणास वेळ
घालवणे आवडते त्यांना वेळ द्या. आपल्या कार्यक्षेत्रातील एखाद्या कल्पक सर्जनशील कार्यात प्रगति होईल.

तूळ :ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. आर्थिक बाबतीत उन्नती होईल. आपल्या आत्मविश्वासाचे, जोखीम घेण्याच्या
वृत्तीचे प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी नवीन मार्ग काढण्याच्या आपल्या गुणांचे वरिष्ठांकडून कौतुक होईल.

वृश्चिक : सार्वजनिक जीवन बहुमूल्य राहील. आपणास एखाद्या योजनेसाठी इतरांचे सहकार्य हवे असेल तर तसे सांगण्यास मागे पुढे पाहू नका. व्यापार-व्यवसायात देवाण घेवाण टाळा. बेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते.

धनु : हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू शकतो. कोणाला संताप येईल कोणी दुखावले जाईल असे कही बोलू नका. मनावर संयम ठेवा.मनसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील.

मकर : आपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. मित्रांचे सहकार्य मिळेल. कामात किंचित अडचणी येतील पण धैर्यशील राहिल्याने कार्ये पूर्ण होतील. उल्हासाचा अनुभव येईल.

कुंभ: आपणास गरज असेल तेव्हा कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. घराच्या विषयांमध्ये वेळ उत्तम. कार्यात सहकार्यांचा
सहयोग मिळेल. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. मीटिंगच्या माध्यमातून शिकवण्याची किंवा शिकण्याची संधी मिळण्याची शयता आहे.

मीन : आपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत
ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. मित्र आनंद देतील. महत्त्वाचा कार्यक्रम होण्याची शयता आहे.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर