दैनिक पंचांग गुरुवार, दि. १६ मे २०२४

0
80

शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर, वैशाख शुलपक्ष, मघा १८|१४
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६ वा. २९ मि.

राशिभविष्य

मेष : मानसन्मानाच्या क्षेत्रात वाढ होईल. कामात एखाद्याचे सहकार्य प्रगतीचे कारण बनेल. त्यामुळे घरांत उत्साहाचे वातावरण होईल. येणारा काळ भूतकाळातील आनंद पुन्हा आणेल.

वृषभ : आर्थिक विषयांमध्ये थोड्या अडचणी येऊ शकतात. करीयर संदर्भातील नवी संधी मिळण्याची शयता. जिभेला
सुखावणारा दिवस असेल.

मिथुन :  ठरविलेले काम पूर्ण  करण्यासाठी काही प्रसंग प्रेरणादायी ठरतील. यथायोग्य विचार करून कार्य करा. मनोरंजनावर खर्च होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार व्यवसायात प्रगती होईल. खाद्या ओळखीच्या
व्यक्तीबरोबर आपले सामंजस्य वाढेल.

कर्क : निष्कारण प्रश्नांचा त्रास राहील. आरोग्याची काळजी घ्या. व्यापार व्यवसायात
वेळ साधारण राहील. देवाण-घेवाण टाळा. शीघ्र अनुकूल परिस्थिती होईल. कौटुंबिक
वातावरण उत्तम राहील. स्त्री पक्षाकडून सहयोग मिळेल.

सिंह : आजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. एखाद्या प्रोजेटसाठी किंवा महत्त्वाच्या कार्यासाठी आपले प्रयत्न वाढविण्याची वेळ आली आहे.

कन्या :  अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ आहे. ज्यांच्याबरोबर आपणास वेळ
घालवणे आवडते त्यांना वेळ द्या. आपल्या कार्यक्षेत्रातील एखाद्या कल्पक सर्जनशील कार्यात प्रगति होईल.

तूळ :ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. आर्थिक बाबतीत उन्नती होईल. आपल्या आत्मविश्वासाचे, जोखीम घेण्याच्या
वृत्तीचे प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी नवीन मार्ग काढण्याच्या आपल्या गुणांचे वरिष्ठांकडून कौतुक होईल.

वृश्चिक : सार्वजनिक जीवन बहुमूल्य राहील. आपणास एखाद्या योजनेसाठी इतरांचे सहकार्य हवे असेल तर तसे सांगण्यास मागे पुढे पाहू नका. व्यापार-व्यवसायात देवाण घेवाण टाळा. बेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते.

धनु : हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू शकतो. कोणाला संताप येईल कोणी दुखावले जाईल असे कही बोलू नका. मनावर संयम ठेवा.मनसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील.

मकर : आपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. मित्रांचे सहकार्य मिळेल. कामात किंचित अडचणी येतील पण धैर्यशील राहिल्याने कार्ये पूर्ण होतील. उल्हासाचा अनुभव येईल.

कुंभ: आपणास गरज असेल तेव्हा कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. घराच्या विषयांमध्ये वेळ उत्तम. कार्यात सहकार्यांचा
सहयोग मिळेल. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. मीटिंगच्या माध्यमातून शिकवण्याची किंवा शिकण्याची संधी मिळण्याची शयता आहे.

मीन : आपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत
ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. मित्र आनंद देतील. महत्त्वाचा कार्यक्रम होण्याची शयता आहे.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर