पर्यावरणाचे रक्षण व आत्मोन्नतीसाठी नगर शहरात ‘सामुदायिक अग्निहोत्र’

अग्निहोत्र जयंतीनिमित्त अग्निहोत्र प्रचारक समिती व दत्तनगर वसाहतीच्या संयुक्त सहकार्याने पाईपलाईन रस्ता सावेडीतील दत्त मंदिर प्रांगणात सामुदायिक अग्निहोत्र करण्यात आले आहे

नगर – अग्निहोत्र जयंतीनिमित्त अग्निहोत्र प्रचारक समिती व दत्तनगर वसाहतीच्या संयुक्त सहकार्याने पाईपलाईन रस्ता सावेडीतील दत्त मंदिर प्रांगणात सामुदायिक अग्निहोत्र करण्यात आले आहे, यामध्ये पन्नास अग्निहोत्र सामुदायिक रित्या
प्रज्वलित करून आहुती देण्यात आली. युगप्रवर्तक माधव पोतदार यांच्याद्वारे १९६३ साली प्रथम अग्निहोत्र महायज्ञाला
प्रारंभ झाला. २२ फेब्रुवारी १९६३ ला हजारो वर्षांपूर्वी लुप्त झालेल्या या मूळ विधीला माधवस्वामीजींनी मनुष्यमात्रच्या
कल्याणासाठी पुनरुज्जीवित केले. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळच्या जवळच असलेल्या बैरागड येथे माधवाश्रम हे
संस्थान आहे. हे संस्थान गेल्या ६० वर्षापासून विश्व कल्याणार्थ केवळ ५ नियमांच्या आधारे निरंतर अग्निहोत्र प्रचार-प्रसाराचे कार्य करत आहे, अशी माहिती अग्निहोत्र प्रचारक सौ. चेतना राजन साळुंके यांनी दिली. त्या पुढे म्हणाल्या, अग्निहोत्राला
सूर्योदय व सूर्यास्ताची केवळ दोन, दोन मिनिटे लागतात. मात्र अग्निहोत्र आपल्या जीवनातील सर्व समस्यांचे एकमेव समाधान
आहे, कारण अग्निहोत्र तुम्हाला थेट निसर्गाशी जोडते. आज प्रदूषणाचा सामना करणे आणि त्यापासून आपले संरक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य बनले आहे. ही प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी आहे. अग्निहोत्र याचे अत्यंत प्रभावी समाधान आहे.
अग्निहोत्र जयंतीनिमित्त अग्निहोत्र प्रचारक समिती यांचे सहकार्याने तत्काळ अग्निहोत्र प्रारंभ करण्यासाठी एक अग्निहोत्र
पात्र, देशी गाईच्या गोवर्‍या, अखंड तांदूळ आणि देशी गाईचे शुद्ध तूप, वेळापत्रक, वेदमंत्र, व २ ग्रंथ असे साहित्य सवलतीच्या दरात उपलब्ध करण्यात आले. नव्याने अग्निहोत्र चालू करू इच्छिणार्‍यांसाठी ही सवलत उपलब्ध
आहे. अधिक माहितीसाठी राजन साळुंके (९४२४६७८५४९, ७०२०८७६०९८) यांच्याशी संपर्क साधावा, असे समितीतर्फे
आवाहन करण्यात आले. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

वंडर किड्स स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन

नगर – वंडर किड्स स्कूल येथे विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी  विविध वैज्ञानिक  संकल्पना प्रभावीपणे सादर केल्या. उद्घाटन डॉ. दमयंती गुंजाळ (स्त्री रोग तज्ञ), लेखिका समिधा
गुंजाळ आणि अविनाश लासेसचे संस्थापक अविनाश जाधव यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक संकल्पना सादर केल्या असून, सर्जनशील प्रकल्प आणि नवकल्पना यांना प्रतिसाद मिळाला. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत विज्ञानाच्या माध्यमातून समाजहिताचे नवे शोध घेण्यास प्रवृत्त केले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक आणि शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाला शाळेच्या संस्थापिका मिसेस वैशाली जाधव, प्राचार्या मोनिका दारवेकर, तसेच संपूर्ण  शिक्षकवृंद उपस्थित होता. विद्यार्थ्यांनी पाणीचे स्रोत(Sources of Water), वनस्पतींचा उपयोग (uses of Plants), सौरमंडळ (Solar System), तसेच प्राण्यांची निवासस्थाने (House of Animals) यांसारख्या रोचक प्रकल्पांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना उपस्थित पालक आणि शिक्षकांनी प्रतिसाद दिला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते, असे मत प्राचार्या मोनिका दारवेकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेच्या संस्थापिका मिसेस वैशाली जाधव यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले. विज्ञानप्रेम वाढवण्यासाठी भविष्यातही अशा प्रदर्शनांचे आयोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाशिवरात्र जागरणाचे नाही तर जागृतीची रात्र

हभप दुतारे महाराज यांचे प्रतिपादन; आयोध्यानगरीत काल्याचे किर्तनाने महाशिवरात्र उत्सवाची सांगता

नगर – भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन प्रार्थना स्वतःचे संरक्षण, चांगले जीवन घडविण्यासाठी नव्हत्या. सर्व प्राचीन प्रार्थना नेहमीच, हे प्रभू मला नष्ट कर म्हणजे मी तुझ्यासारखा होऊ शकेल. अशा होत्या म्हणून शिवरात्री ही ज्या दिवशी असते ती सर्वात काळोखी रात्र आहे. शिव हा संहारक तर दुसरीकडे कृपाळू असा ओळखला जातो. महाशिवरात्र ही शिव शंकराची कृपा ग्रहण करण्यासाठी एक खास रात्र आहे. त्यामुळे महाशिवरात्र तुमच्या आमच्या साठी फक्त जागरणाची रात्र नाही
तर जागृतीची रात्र आहे, असे विवेचन हभप गोरक्षनाथ दुतारे महाराज यांनी काल्याचे कीर्तना मधून केले. सावेडी उपनगरात पाईपलाईन रोडवरील श्रीराम चौकात आयोध्या नगरी येथे श्री महादेव प्रतिष्ठान तर्फे मंदिरात महाशिवरात्र उत्सव साजरा करण्यात आला. उत्सवाची सांगता काला फोडून महाप्रसादाचे वाटप करून करण्यात आली. यावेळी हभप दुतारे महाराज
यांनी शिवरात्रीचे महत्व आध्यात्मिक धार्मिक प्राचीन काळातील महाशिवरात्रीचे वर्णन कीर्तनामधून केले. यावेळी हे भोळ्या शंकरा, तुला आवड बेलाच्या पानाची, मीरा-मोहन यांची गाणी सादर केली. कीर्तनातून महादेवांचे महत्त्व सांगताना त्यांनी वेगवेगळी नावे कशी पडली.त्यांनी जगाच्या कल्याणासाठी स्वतः विष प्राशन केले. समुद्रमंथनातून निघालेले हलाहल प्राशन केले. ते आपल्या कंठात साठविले. त्यामुळे निळकंठ हे नाव पडले अशा खूप कथा आपल्या सर्वांच्या परिचयाच्या आहेत.
असे सांगून काल्याचे महत्व विशद केले. परमार्थात सुख मिळवायचे असेल तर नामस्मरणासारखे साधन नाही. या
नामस्मरणामुळे मनाला मिळणारे समाधान कुठेच मिळत नाही. असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात दिनकरराव
थोरात यांनी महादेव प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या भक्ती भावाने होत असतो. महाशिवरात्रीला परिसरातून शोभायात्रा निघते. शंकर-पार्वती, राधा श्रीकृष्ण, राम-सीता अशा वेशभूषेत छोटी मोठी मुले सहभागी होतात. कार्यक्रमासाठी या भागातील दानशूर व्यक्ती, उद्योजक, रहिवासी सहकार्य करतात. प्रतिष्ठानचे शिवाजीराव लगड, शंतनु पांडव, दिनेश कुलकर्णी, कैलास शेळके, बुरगुल, सर्व कार्यकर्ते परिश्रम घेतात. यामुळे या उत्सवाची शोभा वाढते.
स्थानिक नगरसेवक कायम सहकार्य करत असतात याबद्दल आभार श्री. थोरात यांनी मानले. या काल्याच्या कीर्तनामध्ये हभप गोरक्षनाथ दुतारे यांना तबला वादक हर्षद भावे, संवादिनी वादक गणेश बारगजे, ढोल वादक अजित गुंदेचा, बॅन्जो वादक कुलदीप चव्हाण, पॅड वादक रमेश कार्ले आदींनी साथ दिली

इसळक मधील श्री रामलिंगतिर्थ येथे श्री शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा

ह.भ.प.संदिप महाराज कळसे यांनी केले कथेचे निरूपण

नगर – तालुयातील इसळक येथे प्रभु श्रीरामचंद्र व देवी सिता माता यांच्या पवित्र पदस्पर्शाने पुणीत झालेल्या तसेच श्री समर्थ सद्गुरू योगिराज हरिहर महाराज व श्री संत गाडगे महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत अर्थात श्री
रामलिंगतिर्थ इसळक येथे अखंड शिवनाम महोत्सव तथा ग्रंथराज शिवलिलामृत पारायण व शिवपुराण कथा उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाली. २० फेब्रुवारीपासून हा कार्यक्रम सुरु होऊन त्याची सांगता झाली. या कार्यक्रमाची
दैनंदिनी पहाटे ४ ते ६ काकडा आरती, स.६ ते ८ श्रींचे रूद्राभिषेक पूजन व विष्णुसहस्रनाम, ८ ते १० ग्रंथराज शिवलिलामृत पारायण, सांय ४ ते ५ हरिहर नाम जप, ५ ते ६ हरिपाठ व आरती, रात्री ७ ते ९ शिवपुराण कथा व नंतर महाप्रसाद
अशी होती. शिवपुराण कथेचे निरूपण निंबळक येथील शांत, सुस्वभावी, अभ्यासू व अत्यंत रसाळ वाणी असलेले ह.भ.प.संदिप महाराज कळसे यांनी केले. कथेतील सर्व प्रसंग विषद करताना भावीक भक्तांना अत्यंत साध्या, सरळ व सोप्या भाषेत व अनेक उदाहरणांसह मनुष्य जीवनात शिव शंभू अर्थात श्री महादेवांचे महत्त्व पटवून देत सर्व अबालवृद्ध स्री- पुरूष भावीक भक्तांना गेली ७ दिवस मंत्रमुग्ध केले. ही कथा श्रवण करण्यासाठी पंचक्रोशीतील स्री-पुरूष भाविक-भक्त
दररोज हजर असत. येथील मंदिरांना विद्युत रोषणाई केली होती. मंदिरांच्या समोर व पायर्‍यांवर हजारो तेल वातींच्या दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. महाशिवरात्रीनिमित्त सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत पंचक्रोशीतील भाविक-भक्त दर्शनासाठी दाखल होत होते.  या कार्यक्रमाची सांगता ह.भ.प.मल्लिकार्जुन महाराज सुर्यवंशी यांच्या काल्याच्या किर्तनाने
झाली. येणार्‍या भाविकांसाठी चहा, नाष्टा, दोन वेळेस महाप्रसादाची व्यवस्था गावातीलच दानशूर लोकांनी केलेली होती. हा कार्यक्रम हरिहर महाराज संस्थान ट्रस्ट इसळक यांच्या मार्गदर्शनातून तसेच इसळक-निंबळक मधील तरुण वर्ग, स्वयंसेवक, सरपंच व त्यांचे सहकारी,भक्तगण, विद्यार्थी, भजनी मंडळ, समस्त ग्रामस्थ इसळक-निंबळक यांच्या सहकार्यातून चांगल्या पद्धतीने झाला.

अजिंक्य फिटनेस वर्ल्ड (मिस्टर एशिया) चे खेळाडू देवदत्त गुंडु, रोहन सकट यांचे बॉडी बिल्डींग स्पर्धेत यश

अजिंक्य फिटनेस वर्ल्ड (मि एशिया) चे खेळाडू देवदत्त गुंडु, रोहन सकट यांनी बॉडी बिल्डींग स्पर्धेत यश मिळविले.

नगर – अहिल्यानगर येथील स्टेशनरोडवरील  अजिंय फिटनेस वर्ल्ड (मिस्टर एशिया) चे कोच व खेळाडू देवदत्त प्रविण गुंडु याने सुरत (गुजरात) येथे नुकत्याच झालेल्या ओपन एशिया पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२५ या स्पर्धेमध्ये १०० किलो
वजन गटात उत्कृष्ट खेळ करत रौप्य पदक तसेच इतर गटात ३ ब्रांझ पदक पटकाविले. या स्पर्धेत अशिया खंडातील ४० देशातील खेळाडुंचा सहभाग होता. या यशामुळे देवदत्त प्रविण गुंडु याची मे किंवा जुन २०२५ महिन्यात थायलंड येथे संपन्न होणार्‍या आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली असुन तो भारताच्या टीमचे प्रतिनिधित्व करेल. तसेच याच फिटनेस वर्ल्डचा खेळाडू रोहन सकट याने राहूरी येथे झालेल्या राज्यस्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेत ६५ किलो वयोगटात दुसरा क्रमांक पटकावित मानाचा करंडक पटकावला. या दोघांनी विविध पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचा सत्कार अजिंय फिटनेस वर्ल्ड (मि एशिया) यांच्या वतीने संचालक अभिजित गायकवाड व लबचे मुख्य मार्गदर्शक
योगिराज पडोळे यांच्या हस्ते करण्यात येऊन पुढील कार्या साठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी संचालक सुरेश गायकवाड, अजित व प्रशांत गायकवाड, कोच गुलशनसिंग, गणेश साबळे, दिपक दांडगे, रॉबिन भालेराव,
शारुन कांबळे, महिला कोच सुजाता पिले आदी उपस्थित होते. या दोन्हीही खेळाडुंनी याप्रसंगी बोलताना
अजिंय फिटनेस वर्ल्ड मधील आंतरराष्ट्रीय दर्जाची-मशिनरी, उत्कृष्ट मार्गदर्शक, प्रसन्न वातावरण याचे कौतुक केले व या स्पर्धेमध्ये यश मिळविणे यामुळेच शय झाल्याचे त्यांनी सांगितले. संचालक अभिजित गायकवाड यांनी आभार मानले.

शहाजी रोड येथील श्री कालिका देवी मूर्ती वज्रलेप प्राणप्रतिष्ठा, ९० वा वर्धापन दिननिमित्त शतचंडी यज्ञ सोहळ्याचे आयोजन

नगर – सोमवंशीय क्षत्रीय कासार समाजाचे आराध्य दैवत श्री कालिका माता मंदिराची स्थापना ९० वर्षांपूर्वी झाली असून, हे
मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. श्री कालिका देवी संस्थान व कालिका महिला युवक मंडळाच्या प्रेरणेने श्री कालिका देवी मूर्ती वज्र, लेप ९० वा वर्धापन दिन, शतचिंडी यज्ञ सोहळा २ ते ६ मार्च पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाने होणार असल्याची माहिती अध्यक्ष संदीप डांगरे यांनी दिली. २ मार्च रोजी सकाळी ९ ते ६ या वेळेत प्रायश्चित्त संकल्प, गणपती पुण्याहवाचंन, पंचांग कर्म व सप्तशती पाठ आरंभ, मंडल व प्रधान पूजन, स्नपन व प्रतिष्ठा विधी, अभिषेक, अग्नी मंथन व स्थापना हवन, सायंपूजन व आरती, ह.भ.प साहिल महाराज पालकर तळेगावकर चाळीसगाव यांचे हरिकीर्तन. ३ मार्च रोजी प्रांत पूजन, अभिषेक पूजन, देवी सहस्र अर्चन, श्री सुक्त हवन, सायंपूजन व आरती, सायंकाळी ७ ते ९ श्री कालिका भजनी मंडळ अहिल्यानगर यांची सुश्राव्य भजन संध्या. ४ मार्च रोजी किशोर शेरवानी यांची माता की चौकी कार्यक्रम. ५ मार्च रोजी प्रधान हवन, कुमारिका पूजन, कुलस्वामिनी आई कालिका मातेच्या चरणी कुंकूमार्चन. ६ मार्च रोजी उत्तरांग हवन, विशेष हवन, बलिदान, पूर्णाहुती, ब्राह्मण पूजन, सायंकाळी ५ ते १० या दरम्यान आईसाहेबांचा पालखी सोहळा, महाआरती व
महाप्रसादाचे आयोजन केले असल्याची माहिती श्री कालिका देवी संस्थान विश्वस्त मंडळ यांच्या वतीने देण्यात आली आहे.
सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजाचे आराध्य दैवत श्री कालिका माता होय, श्री कालिका माता कासार समाजाच्या श्री कालिका देवी मंदीरात कशी स्थापना झाली याचा एक इतिहास आज असलेली श्री कालिका माताची मुर्ती फार पुरातन
आहे. ही मुर्ती नगरच्या नालेगांव भागात एका झाडाखाली मारुतीच्या मंदिरापुढे होती. यामुतींवर तेलाचे किटण मोठ्याप्रमाणावर साठलेले होते. शनिदेवतेची ही मुर्ती समजुन लोक त्यामुर्तीला तेल वहात असत त्यामुळे मुर्तीस किटण
होते. कै.शंकरराव देवळालकर यांना देवीने स्वप्नात दृष्टांत दिला. मला तुमच्याकडे (समाजाकडे) घेवून जाऊन माझी स्थापना करा. त्यानुसार कै.शंकरराव देवळालकर समाजातील प्रमुख व्यक्तींकडे आणि नालेगांवच्या पाटलांकडे गेले. सदरची मुर्ती पाटलांकडुन घेतली आणि त्या मुर्तीचे सत्यरुप पाहण्यासाठी स्वच्छ करण्यास तांबटाकडे दिली. गरमपाणी सोडा यांच्या सहाय्याने या मुर्तीचे किटण काढण्यात आले. मुर्तीचे सुन्दर स्वरुप दिसताच ही मुर्ती आपणाकडे ठेवावी
असा मोह झाला. तात्काळ या तांबटाची तब्येत बिघडली जुलाब वांत्या सुरु झाल्याने या तांबटाने ही मुर्ती कासार समाजाच्या स्वाधीन केली. श्री कालिका मातेच्या मूर्तीची स्थापना इमारतीमध्ये फाल्गुन शुल तृतीया शके १८५७ मंगळवार दि. २५/०२/१९३६ रोजी दुपारी ११ वाजता विधीपूर्वक यथासांग करण्यात आली. यानंतर मंदिरात नवरात्र महोत्सव, मंगळवारी
धार्मिक भजन, चैत्र उटीचा, महिला मंडळाचे सामुदायीक मकर संक्रांत व चैत्री हळदी कुंकु असे कार्याक्रम होतात. कोजागिरी पौर्णिमा कार्यक्रम इ. समारंभ होतात. कासार समाजाचे व नगरवासियांचे श्री कालिका मंदिर हे एक श्रद्धास्थान आहे. सन १९५५ साली श्री नवरात्र महोत्सव साजरा करण्यासाठी यथासांग शास्त्रोक्त धार्मिक पद्धतीचा अवलंब करुन करावा यासाठी श्री कालिका यै नमः ॥ हा सव्वा कोटी नाम जप करुन महोत्सवास सुरुवात करण्यात आली. आणि सन १९५८ पासुन श्री कालिका मातेस दररोज बदलती वाहन करण्यात येऊ लागले. व ही परंपरा आजही चालु असुन धनंजय वेळापुरे वाहन तयार करतात. वाहनांमध्ये गजराज, अश्व, कमळ, नंदी, सिंह, मयुर, दैत्यवध, उंट, गरुड, हंस, दसर्‍याला अश्वरथ व कोजागीरीला हरिण इ. वाहने करतात. तसेच नवरात्र महोत्सव काळात होम, भंडारा, तसेच समाजातील
विविध मान्यवरांचा सत्कार, महिला व मुलांसाठी विविध कलागुणांचे कार्यक्रम घेतले जातात. तसेच आजही फाल्गुन शुल तृतीयेला श्री कालिका देवी मुर्ती प्रतिष्ठापणाचा वर्धापन दिन साजरा केला जातो व कार्तिक पोर्णिमा दिपोत्सव साजरा केला जातो. अशी माहिती श्री कालिका देवी ट्रस्ट स्वस्थानाने दिली.

पीएसआय गणेश चोभे यांना वेटलिफ्टींगमध्ये सुवर्णपदक

नगर – ३५ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टींग क्रीडा प्रकारात १०० किलो वजनी गटात पीएसआय गणेश चोभे यांना सुवर्णपदक मिळाले. ३५ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५ ठाणे येथे १९ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत
पार पडली. वेटलिफ्टींग क्रीडा प्रकारामध्ये १०० किलो वजन गटात चोभे यांनी सुवर्णपदक मिळविले. यापूव २०२४ मध्ये ३४ वी क्रीडा स्पर्धा नाशिक येथे पार पडलेल्या स्पर्धेतही वेटलिफ्टींगमध्ये सुवर्णपदक मिळविले होते. २०२३ मध्ये जळगाव येथे कार्यरत असतांना विशेष शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाविद्यालयीन जीवनात विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन त्यांनी अनेक पदके मिळविली आहेत. सध्या नाशिक पोलीस आयुक्तालय येथे ते कार्यरत आहे.

‘रोटरी लब ऑफ प्रियदर्शनी’तर्फे एयुप्रेशर चिकित्सा शिबिरास प्रारंभ

नगर – रोटरी लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनी, प्रयास ग्रुप व नम्रता दादी-नानी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने विशाल एयुप्रेशर, सुझोक आणि वायब्रेशन चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा उद्घाटन समारंभ रोटरी लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीच्या अध्यक्ष रो. मिनल बोरा यांच्या हस्ते झाला. हे शिबिर २८ फेब्रुवारी ते
५ मार्च दरम्यान सप्तक सदन, खिस्तगल्ली, अहिल्यानगर येथे भरवण्यात आले असून, सकाळी ८ ते १२ आणि संध्याकाळी ४ ते ८ या वेळेत रुग्णांना सेवा दिली जाणार आहे. शिबिरात राजस्थान, जोधपूर येथील नैसर्गिक उपचार तज्ज्ञ थेरपिस्ट राजेंद्र सारण (ऊ.अ.ढ. ळप अर्ली.) व थेरपिस्ट टी. आर. जाट (ऊ.अ.ढ. ळप अर्ली.) हे सेवा देणार असून, कोणत्याही औषधाविना जुनाट डोकेदुखी, सायटिका, डोळ्यांचे विकार, व्हेरिकोज वेन्स, स्थूलत्व, सांधेदुखी, ब्लडप्रेशर, गॅस, कंबरदुखी, मानसिक तणाव, लकवा, सायनस, बवासीर, हात-पाय बधीर होणे, मधुमेह, सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस यांसारख्या विकारांवर उपचार केले जातील. फक्त २००/- नोंदणी शुल्क भरून रुग्णांना ६ दिवस विनामूल्य उपचार मिळणार असून, प्रत्येक रुग्णाला दररोज २० ते २५ मिनिटे चिकित्सा केली जाईल. रो. मिनल बोरा यांनी सांगितले की, समाजातील सर्वसामान्य नागरिकांना सहज आणि परवडणार्‍या दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी
रोटरी लब सदैव प्रयत्नशील आहे. या शिबिराचा लाभ घेत नागरिकांनी निरोगी जीवनाचा मार्ग स्वीकारावा.
यावेळी विद्या बडवे, अलका मुंदडा, गीता गिल्डा, प्रतिभा धूत, मंजू मुनोत, आरती लोहाडे, देविका रेळे, अरुणा गोयल, मीनल गंधे, मिनल काळे, सुरेखा भोसले, जयश्री पुरोहित, ज्योती गांधी, हीरा शिरपुरे, लिला अग्रवाल, रेखा फिरोदिया, श्रद्धा
उपाध्ये, सुरेखा जंगम आदी महिला उपस्थित होत्या. या शिबिरात सहभागी होण्यासाठी थेरपिस्ट राजेंद्र सारण (९०२४६ ३५०८९), थेरपिस्ट टी. आर. जाट (९६०२० १७८१५) किंवा रो. मिनल बोरा यांच्याशी संपर्क साधावा.
नागरिकांना याचा लाभ घेण्याचे आवाहन सर्व आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.

अंत्योदय योजनेतील धारकांना लाभ मिळण्यासाठी गोरगरीब व सर्वसामान्यांना इष्टांक वाढवून मिळावा

निखिल वारे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

नगर – शासनातर्फे अहिल्यानगर मधील गोरगरीब, सामान्य नागरिकांसाठी अंत्योदय योजना सुरू झाली. त्याचा लाभ सर्वांना
मिळत होता. मात्र गेल्या काही महिन्यापासून नवीन लाभार्थी नोंदणीचे काम बंद आहे. अधिक माहिती घेता असे समजले की
अहिल्यानगरचा इष्टांक पूर्ण झालेला आहे. नवीन लाभ धारकांना लाभ मिळवण्यासाठी नोंदणीसाठी वारंवार चकरा मारून देखील नोंदणी होत नाही. रेशन कार्ड ऑनलाइन करण्यासाठी अडचणी येतात. यासाठी आ.संग्राम जगताप यांचा देखील शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. तरी राधाकृष्ण विखे पाटील यांनी पालकमंत्री या नात्याने या विषयात लक्ष घालून पाठपुरावा करावा, जिल्ह्याचा इष्टांक वाढवून द्यावा, अशी मागणी श्री.वारे यांनी केली. अहिल्यानगरचा इष्टांक पूर्ण झालेला असुन जिल्हाधिकारी यांनी देखील शासनाकडे पत्रव्यवहार केलेला आहे. अद्यापपर्यंत शासनाकडून इष्टांक वाढवून आलेला  नाही. असे श्री.वारे यांनी  सांगितले. वाढवून मिळवावा. या विभागाशी, संबंधित मंत्री, अधिकार्‍यांशी बोलून योग्य तो मार्ग
आपण काढावा, असे श्री. वारे म्हणाले

वाहनांच्या चोर्‍या व चेन स्नॅचिंग करणारा सराईत आरोपी जेरबंद

३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नगर – नगर शहर परिसरात वाहनांच्या चोर्‍या तसेच चेन स्नॅचिंग करणारा सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने
पकडला असून त्याच्या कडून १० ग्रॅमची सोन्याची चेन, एक चोरीची रिक्षा व एक मोपेड असा ३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सोन्या उर्फ सुरज शिवाजी शिंदे (वय ३०, रा.टिळक रोड, कानडे प्रेशर पंपाजवळ, अहिल्यानगर) असे या आरोपीचे नाव आहे. तपासात तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.  शहर परिसरात चेन
स्नॅचिंगच्या घटना वाढत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक २७ फेब्रुवारी रोजी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत
चेन स्नॅचिंग करणार्‍या आरोपींचा शोध घेत असताना पथकाला माहिती मिळाली की, केडगाव येथून लिंक रोडने अहिल्यानगर शहराकडे एक इसम चोरीची रिक्षा विक्री करण्यासाठी येणार आहे. पथकाने मिळालेल्या
माहितीवरून कल्याण रोडला सापळा रचुन संशयीत आरोपी सोन्या उर्फ सुरज शिवाजी शिंदे याला ताब्यात
घेतले. त्याच्या ताब्यातील रिक्षाबाबत विचारपूस केली असता त्याने सदरची रिक्षा ही पुणे येथून चोरून
आणल्याची माहिती दिली. तसेच, आठ ते दहा महिन्यांपूर्वी नगर-पुणे रोडवर स्वीट होम येथून एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढून नेल्याचे व दोन महिन्यापूर्वी केंडगाव येथून एक मोपेड दुचाकी योगेश संजय रक्ते (रा. एमआयडीसी,
अहिल्यानगर (पसार) याच्या मदतीने चोरी करून ती श्रीसिध्दीविनायक ट्रेडर्स समोरील काटवनात लपवून ठेवल्याची
माहिती दिली. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे. कोतवाली पोलिस ठाण्यातील दोन व चाकण पोलीस
ठाण्यातील एक असे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. चेन चेन स्नॅचिंग बाबत संगीता पुंडलीक मोरे (रा. आदिशक्ती बंगलो, दातरंगे मळा) यांनी २४ एप्रिल २०२४ रोजी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिलेली होती. तो गुन्हा या आरोपीने केल्याचे समोर आले आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास
पथकातील उपनिरीक्षक अनंत सालगुडे, व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, गणेश धोत्रे, शाहीद शेख, रविंद्र घुंगासे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, आकाश काळे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, किशोर शिरसाठ, बाळासाहेब खेडकर, अमृत आढाव, भगवान थोरात व महादेव भांड यांच्या पथकाने केली आहे.