३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
नगर – नगर शहर परिसरात वाहनांच्या चोर्या तसेच चेन स्नॅचिंग करणारा सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने
पकडला असून त्याच्या कडून १० ग्रॅमची सोन्याची चेन, एक चोरीची रिक्षा व एक मोपेड असा ३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सोन्या उर्फ सुरज शिवाजी शिंदे (वय ३०, रा.टिळक रोड, कानडे प्रेशर पंपाजवळ, अहिल्यानगर) असे या आरोपीचे नाव आहे. तपासात तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. शहर परिसरात चेन
स्नॅचिंगच्या घटना वाढत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक २७ फेब्रुवारी रोजी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत
चेन स्नॅचिंग करणार्या आरोपींचा शोध घेत असताना पथकाला माहिती मिळाली की, केडगाव येथून लिंक रोडने अहिल्यानगर शहराकडे एक इसम चोरीची रिक्षा विक्री करण्यासाठी येणार आहे. पथकाने मिळालेल्या
माहितीवरून कल्याण रोडला सापळा रचुन संशयीत आरोपी सोन्या उर्फ सुरज शिवाजी शिंदे याला ताब्यात
घेतले. त्याच्या ताब्यातील रिक्षाबाबत विचारपूस केली असता त्याने सदरची रिक्षा ही पुणे येथून चोरून
आणल्याची माहिती दिली. तसेच, आठ ते दहा महिन्यांपूर्वी नगर-पुणे रोडवर स्वीट होम येथून एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढून नेल्याचे व दोन महिन्यापूर्वी केंडगाव येथून एक मोपेड दुचाकी योगेश संजय रक्ते (रा. एमआयडीसी,
अहिल्यानगर (पसार) याच्या मदतीने चोरी करून ती श्रीसिध्दीविनायक ट्रेडर्स समोरील काटवनात लपवून ठेवल्याची
माहिती दिली. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे. कोतवाली पोलिस ठाण्यातील दोन व चाकण पोलीस
ठाण्यातील एक असे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. चेन चेन स्नॅचिंग बाबत संगीता पुंडलीक मोरे (रा. आदिशक्ती बंगलो, दातरंगे मळा) यांनी २४ एप्रिल २०२४ रोजी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिलेली होती. तो गुन्हा या आरोपीने केल्याचे समोर आले आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास
पथकातील उपनिरीक्षक अनंत सालगुडे, व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, गणेश धोत्रे, शाहीद शेख, रविंद्र घुंगासे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, आकाश काळे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, किशोर शिरसाठ, बाळासाहेब खेडकर, अमृत आढाव, भगवान थोरात व महादेव भांड यांच्या पथकाने केली आहे.