पर्यावरणाचे रक्षण व आत्मोन्नतीसाठी नगर शहरात ‘सामुदायिक अग्निहोत्र’

0
75

अग्निहोत्र जयंतीनिमित्त अग्निहोत्र प्रचारक समिती व दत्तनगर वसाहतीच्या संयुक्त सहकार्याने पाईपलाईन रस्ता सावेडीतील दत्त मंदिर प्रांगणात सामुदायिक अग्निहोत्र करण्यात आले आहे

नगर – अग्निहोत्र जयंतीनिमित्त अग्निहोत्र प्रचारक समिती व दत्तनगर वसाहतीच्या संयुक्त सहकार्याने पाईपलाईन रस्ता सावेडीतील दत्त मंदिर प्रांगणात सामुदायिक अग्निहोत्र करण्यात आले आहे, यामध्ये पन्नास अग्निहोत्र सामुदायिक रित्या
प्रज्वलित करून आहुती देण्यात आली. युगप्रवर्तक माधव पोतदार यांच्याद्वारे १९६३ साली प्रथम अग्निहोत्र महायज्ञाला
प्रारंभ झाला. २२ फेब्रुवारी १९६३ ला हजारो वर्षांपूर्वी लुप्त झालेल्या या मूळ विधीला माधवस्वामीजींनी मनुष्यमात्रच्या
कल्याणासाठी पुनरुज्जीवित केले. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळच्या जवळच असलेल्या बैरागड येथे माधवाश्रम हे
संस्थान आहे. हे संस्थान गेल्या ६० वर्षापासून विश्व कल्याणार्थ केवळ ५ नियमांच्या आधारे निरंतर अग्निहोत्र प्रचार-प्रसाराचे कार्य करत आहे, अशी माहिती अग्निहोत्र प्रचारक सौ. चेतना राजन साळुंके यांनी दिली. त्या पुढे म्हणाल्या, अग्निहोत्राला
सूर्योदय व सूर्यास्ताची केवळ दोन, दोन मिनिटे लागतात. मात्र अग्निहोत्र आपल्या जीवनातील सर्व समस्यांचे एकमेव समाधान
आहे, कारण अग्निहोत्र तुम्हाला थेट निसर्गाशी जोडते. आज प्रदूषणाचा सामना करणे आणि त्यापासून आपले संरक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य बनले आहे. ही प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी आहे. अग्निहोत्र याचे अत्यंत प्रभावी समाधान आहे.
अग्निहोत्र जयंतीनिमित्त अग्निहोत्र प्रचारक समिती यांचे सहकार्याने तत्काळ अग्निहोत्र प्रारंभ करण्यासाठी एक अग्निहोत्र
पात्र, देशी गाईच्या गोवर्‍या, अखंड तांदूळ आणि देशी गाईचे शुद्ध तूप, वेळापत्रक, वेदमंत्र, व २ ग्रंथ असे साहित्य सवलतीच्या दरात उपलब्ध करण्यात आले. नव्याने अग्निहोत्र चालू करू इच्छिणार्‍यांसाठी ही सवलत उपलब्ध
आहे. अधिक माहितीसाठी राजन साळुंके (९४२४६७८५४९, ७०२०८७६०९८) यांच्याशी संपर्क साधावा, असे समितीतर्फे
आवाहन करण्यात आले. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.