नगर – रोटरी लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनी, प्रयास ग्रुप व नम्रता दादी-नानी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने विशाल एयुप्रेशर, सुझोक आणि वायब्रेशन चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा उद्घाटन समारंभ रोटरी लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीच्या अध्यक्ष रो. मिनल बोरा यांच्या हस्ते झाला. हे शिबिर २८ फेब्रुवारी ते
५ मार्च दरम्यान सप्तक सदन, खिस्तगल्ली, अहिल्यानगर येथे भरवण्यात आले असून, सकाळी ८ ते १२ आणि संध्याकाळी ४ ते ८ या वेळेत रुग्णांना सेवा दिली जाणार आहे. शिबिरात राजस्थान, जोधपूर येथील नैसर्गिक उपचार तज्ज्ञ थेरपिस्ट राजेंद्र सारण (ऊ.अ.ढ. ळप अर्ली.) व थेरपिस्ट टी. आर. जाट (ऊ.अ.ढ. ळप अर्ली.) हे सेवा देणार असून, कोणत्याही औषधाविना जुनाट डोकेदुखी, सायटिका, डोळ्यांचे विकार, व्हेरिकोज वेन्स, स्थूलत्व, सांधेदुखी, ब्लडप्रेशर, गॅस, कंबरदुखी, मानसिक तणाव, लकवा, सायनस, बवासीर, हात-पाय बधीर होणे, मधुमेह, सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस यांसारख्या विकारांवर उपचार केले जातील. फक्त २००/- नोंदणी शुल्क भरून रुग्णांना ६ दिवस विनामूल्य उपचार मिळणार असून, प्रत्येक रुग्णाला दररोज २० ते २५ मिनिटे चिकित्सा केली जाईल. रो. मिनल बोरा यांनी सांगितले की, समाजातील सर्वसामान्य नागरिकांना सहज आणि परवडणार्या दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी
रोटरी लब सदैव प्रयत्नशील आहे. या शिबिराचा लाभ घेत नागरिकांनी निरोगी जीवनाचा मार्ग स्वीकारावा.
यावेळी विद्या बडवे, अलका मुंदडा, गीता गिल्डा, प्रतिभा धूत, मंजू मुनोत, आरती लोहाडे, देविका रेळे, अरुणा गोयल, मीनल गंधे, मिनल काळे, सुरेखा भोसले, जयश्री पुरोहित, ज्योती गांधी, हीरा शिरपुरे, लिला अग्रवाल, रेखा फिरोदिया, श्रद्धा
उपाध्ये, सुरेखा जंगम आदी महिला उपस्थित होत्या. या शिबिरात सहभागी होण्यासाठी थेरपिस्ट राजेंद्र सारण (९०२४६ ३५०८९), थेरपिस्ट टी. आर. जाट (९६०२० १७८१५) किंवा रो. मिनल बोरा यांच्याशी संपर्क साधावा.
नागरिकांना याचा लाभ घेण्याचे आवाहन सर्व आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.