नगर – वादरहित विश्वस्त संस्था निर्माण होण्यासाठी विश्वस्तांमध्ये कायद्याविषयी जनजागृती होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, अहिल्यानगर आणि श्री ज्ञानेश्वर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट, सावेडी यांच्या संयुक्त विद्यमाने माऊली सभागृह, झोपडी कॅन्टीन, सावेडी, अहिल्यानगर येथे २८/२/२०२५ रोजी आयोजित विश्वस्तांच्या कार्यशाळेत प्रमुख अतिथि व मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहिल्यानगर जिल्हा धर्मादाय उपायुक्त सौ. उषा पाटील होत्या. पुढे बोलताना पद्मश्री पोपटराव पवार ते म्हणाले की, अहिल्यानगर हा विविध प्रमुख देवस्थान तसेच राळेगण सिद्धी, हिवरे बाजार इ. सारख्या आदर्श गावांनी तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या सामाजिक कार्यकर्त्यांनी युक्त असा जिल्हा आहे. देशाला आदर्शदायी अशी व्यक्तिमत्व या जिल्ह्यामध्ये आहेत. विविध सामाजिक चळवळी देखील येथे आहेत. या सर्वांचा आदर्श घेऊन काम करणारे विश्वस्त आपल्याला दिसून येतात, दिवसेंदिवस नवनवीन संस्था, ट्रस्ट नोंदणी होत आहेत, परंतु पुढील कायदेशीर बाबीची माहिती नसल्यामुळे आणि महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० व संस्था नोंदणी अधिनियम १८६० या बाबतीत पुरेशी जनजागृती नसल्यामुळे विश्वस्तांना खूप अडचणींना सामोरे जावे लागते, प्रसंगी दंडात्मक कारवाई तसेच संस्था नोंदणी
रद्द होण्याची नामुष्की देखील ओढवली जाते, यामुळे अशा प्रकारच्या कार्यशाळा वारंवार आयोजित होऊन विश्वस्तांमध्ये
कायदेविषयक साक्षरता निर्माण होणे खूप आवश्यक आहे. तसेच, वेळोवेळी कायदेशीर बाबीची पूर्तता झाली आणि विश्वस्त व्यवस्थेचे व्यवस्थापन पारदर्शक सुरू राहिले म्हणजेच विश्वस्त कायद्याविषयक जागरूक असले तर पुढील वाद टळतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली व आपले अनुभव उपस्थितांसमोर विषद केले. या कायद्याबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे आलेल्या अडचणी देखील त्यांनी सांगितल्यामुळे कायदा माहिती असणे किती आवश्यक आहे, याचे गांभीर्य सर्वांना समजले तसेच सदरच्या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत तसेच एकच अधिकारी असताना जिल्ह्याच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडल्याबद्दल धर्मादाय उपायुक्त सौ. उषा पाटील यांच्या कामाचे देखील त्यांनी कौतुक केले.
अध्यक्षीय भाषणामध्ये सौ. उषा पाटील यांनी विश्वस्तांनी कायदा माहिती करून घेतल्यास व आपणच तयार करून घेतलेली
घटना, नियम व नियमावली समजून घेऊन त्याप्रमाणे न्यासाचे व्यवस्थापन पाहिल्यास व आवश्यक त्या कागदपत्रासह योग्य
प्रकारे प्रकरण दाखल केल्यास अधिकार्यांना देखील प्रकरण लवकर निकाली काढण्यास मदत होते व विश्वस्तांना देखील
कार्यालयात जास्त वेळ चकरा माराव्या लागत नाहीत, सदरील कार्यशाळेमुळे विश्वस्तांना योग्य ती माहिती मिळून पुढील
काम सोपे व सुरळीत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यशाळेत सहाय्यक धर्मादाय आयुक्त व्ही. डी. शेंडे यांनी संस्था नोंदणी बाबत मार्गदर्शन. पब्लिक ट्रस्ट प्रॅटिशनर असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गौरव मिरीकर यांनी कलम २२ (बदल अर्ज) यावर मार्गदर्शन केले. न्यायिक प्रकरणांच्या कोर्ट फी स्टॅम्प बाबत कार्यालयाच्या अधीक्षक श्रीमती व्ही. पी. सुरकूटला यांनी माहिती दिली. कार्यालयाचे निरीक्षक यू. एम. ढोले यांनी हिशोब पत्रके दाखल करावयाच्या कार्यपद्धती व त्यासंबंधातील इतर माहिती दिली. अॅड. विजय मुनोत यांनी कलम ४१ बाबत सविस्तर माहिती दिली. स्नेहालयचे गिरीश कुलकर्णी यांनी शासनाचे विविध धोरण आणि संस्थांनी करावयाची पूर्तता यासह सामाजिक क्षेत्रातील अनुभव विश्वस्तासमोर मांडले. प्रास्ताविक धर्मादाय उपायुक्त सौ. यू. एस. पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन भार्गव भारदे आणि अॅड. शीतल रनशूर यांनी केले. या कार्यक्रमामध्ये सौ. यू. एस. पाटील यांनी दोन अधिकार्यांच्या जागा रिक्त असतांना कार्यालयाची जबाबदारी
व्यवस्थित पार पडत ६५९ नवीन नोंदणी, ८४ वादाचे प्रकरण, ११८९ विनावादाचे प्रकरण अशी एकूण १९२२ प्रकरण एकाच सन २०२४ सालामध्ये निकाली काढलेली असून विविध देवस्थानच्या विश्वस्तांच्या निवडी देखील पारदर्शकपणे केलेल्या असल्याने पब्लिक ट्रस्ट प्रॅटिशनर असोसिएशनच्या वतीने पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी अॅड. वाबळे राजेंद्र, योगेश मांडोत, संतोष गायकवाड, नदीम सय्यद, वैभव साबळे, गवळी, जायभाय, काळे अर्जुन, दिपनाईक, नजन ई. वकील हजर होते सदरील कार्यक्रमासाठी अहिल्यानगरमधून विविध संस्थांचे प्रतिनिधि विश्वस्त उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयातील कर्मचारी व पब्लिक ट्रस्ट प्रॅटिशनर असोसिएशनचे सर्व वकील मंडळींनी कष्ट घेतले.
वादरहित विश्वस्त संस्था निर्माण होण्यासाठी विश्वस्तांमध्ये कायद्याविषयी जनजागृती आवश्यक : पद्मश्री पोपटराव पवार
नाशिकमध्ये २ मार्च रोजी जागतिक बौद्ध धम्म परिषद
जल्ह्यातील बौध्द भिख्कू, उपासक आणि उपासिका होणार सहभागी, रिपाईच्या पदाधिकार्यांना सहभागी होण्याचे आवाहन
नगर – जगाला युद्ध नको, बुद्ध हवा! हा संदेश घेऊन महाराष्ट्रातील नाशिक मध्ये २ मार्च रोजी जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे गोल्फ लब मैदान येथे
रविवारी सायंकाळी चार वाजता या धम्म परिषदेला प्रारंभ होणार आहे. या परिषदेसाठी भारतासह वेगवेगळ्या देशातील
बौध्द भिख्कू उपस्थित राहणार आहेत. या जागतिक बौद्ध धम्म परिषदेसाठी नगर जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) सर्व पदाधिकारी यांना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी केले आहे.
धम्म परिषदेला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दादा भुसे, माजी मंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्याय राज्यमंत्री
संजय शिरसाट, मंत्री गिरीश महाजन, आरपीआयचे राज्य अध्यक्ष राजा सरोदे, सरचिटणीस गौतम
सोनवणे, कार्याध्यक्ष बाबूराव कदम, मुंबई प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ कासारे आदींसह अनेक
खासदार, आमदार आणि रिपब्लिकन पक्षाचे राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या धम्म परिषदेचे स्वागताध्यक्ष पद आरपीआयचे नाशिक जिल्हाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश
लोंढे भूषवीत आहे. या जागतिक बौद्ध महापरिषदेसाठी महाराष्ट्रातील सर्व बौद्ध उपासक, उपासिका आणि
भगवान बुद्धांच्या विचारांचा आदर करणारा समुदाय उपस्थित असणार आहे. बौद्ध धम्म परिषदेसाठी
नगर जिल्ह्यातून प्रत्येक तालुयातून आणि गावागावातून बौद्ध उपासक, उपासिका आणि
कार्यकर्ते सहभागी होण्यासाठी नियोजन करण्यात
आले असल्याचे म्हंटले आहे.
या परिषदेसाठी नगर जिल्ह्यातील रिपब्लिकन
पक्षाचे राज्य उपाध्यक्ष तथा संपर्कप्रमुख श्रीकांत
भालेराव, राज्य उपाध्यक्ष विजय वाघचौरे, जिल्हा
कार्याध्यक्ष लॉरेन्स स्वामी, जिल्हा सरचिटणीस
विजय भांबळ, जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे,
संजय कांबळे यांच्यासह जिल्हा कार्यकारणी व
जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष आणि कार्यकर्ते
उपस्थित राहणार आह
राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांना देशोधडीला लावणार्या शासन निर्णयाविरोधात शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन
नगर – महाराष्ट्र सरकारने १५ मार्च २०२४ शासन निर्णय संच
मान्यता संदर्भांत पारित केला. तो शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांना
अन्यायकारक आहे. या संदर्भात संच मान्यता निकष कसे असावेत
याविषयी १८ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शालेय शिक्षण
मंत्री यांना अभ्यासपूर्ण पत्र आमदार ज. मो. अभ्यंकर दिले होते.
या संच मान्यतेमुळे अनुदानित मराठी शाळा व इतर माध्यमाच्या
शाळांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांना देशोधडीला लावणारा
हा शासन निर्णय रद्द करून सुधारित संच मान्यता शासन निर्णय
काढावा या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे निवेदन
देण्यात आले होते. तरी हा निर्णय रद्द न झाल्याने राज्यातील
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट प्रणित महारष्ट्र राज्य शिक्षक
सेना, अहिल्यानगरच्यावतीने जिल्हा परिषद येथील माध्यमिक
शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. यावेळी
जिल्हाध्यक्ष प्रा.अंबादास शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष रावसाहेब म्हस्के,
सचिव उद्धवराव सोनवणे, शहर जिल्हाध्यक्ष पारुनाथ ढोकळे, मंगेश
पालवे, सत्यनाथ शेळके, महेश कुलकर्णी, विनायक आहेर, रामनाथ कर्डिले,
लक्ष्मण सुर्यवंशी, अजिंयदेव गायकवाड, नंदकुमार जाधव, अर्जुन आढाव,
रविंद्र हरिशचंद्रे, नंदकुमार डालिंबकर, राजू पवार, शिवाजी आवारे, योगेश शेटे,
पांढरीनाथ थोरे, चंद्रकांत जोर्वेकर, विलास कोतकर, गणेश पोटभरे आदींसह
जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.
या जाचक संच मान्यता शासन निर्णयाविरोधात राज्यभर जिल्ह्या
जिल्ह्यातून आंदोलन करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना
अध्यक्ष आमदार ज. मो. अभ्यंकर दिले होते. त्यानुसार शिवसेना
(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट प्रणित महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना,
अहिल्यानगरच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले. तसेच
यावेळी सरकारच्या या निर्णयाविरोधात घोषणा देण्यात आले. या
आंदोलनास शिक्षकांची जिल्हास्तरीय समन्वय समितीने पाठिंबा दिला.
याप्रसंगी आप्पासाहेब शिंदे, सुनिल पंडीत, महेंद्र हिंगे, बाबासाहेब
बोडखे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.अंबादास शिंदे
म्हणाले की, शासन शिक्षकांच्या विरोधात वेगवेगळे निर्णय घेवुन शिक्षक
व शिक्षकेतर कर्मचार्यांवर अन्याय करत आहेत. या अन्यायाच्या
विरोधात शिक्षक सेना नेहमीच आवाज उठवीत आली आहे. शिक्षक व
शिक्षकेतर कर्मचार्यांच्या भविष्यासाठी शिक्षक सेना नेहमीच प्रयत्नशिल
राहते. त्यामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांवर कुठलाही अन्याय होऊ
देणार नाही, असे सांगितले.
आपली मातृभाषा मनापासून जपा
अमोल बागुल यांचे प्रतिपादन
नगर – आपली मातृभाषा मनापासून जपा, असे उद्गार अमोल बागुल यांनी काढले. महात्मा फुले एज्युकेशन
सोसायटीच्या सखाराम मेहेत्रे प्राथमिक विद्यालय आणि केशवराव गाडीलकर हायस्कूल मध्ये मराठी भाषा गौरव
दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती पुरस्कार विजेते अमोल
सुभाष सुनंदा बागुल हे होते. अमोल बागुल यांनी मराठी भाषेचे महत्व हसत खेळत, गप्पा गोष्टींमधून
विद्यार्थ्यांना समजून सांगितले. मातृ म्हणजेच आई आणि आईची भाषा ही कधीही विसरायची नसते. लहान मूल जसं पहिल्यापासून काही शिकत तसेच मराठी भाषेचे देखील आहे. मराठी भाषेला आपण कधीही विसरू नये तिचा
नेहमी आदर करावा. त्यांनी मुलांच्या मुखातून शब्द कसा निर्माण होतो याविषयी सांगितले आणि
आई विषयी कविता सादर केली. तसेच आपल्या सुमधुर बासरी वादनाने मुलांची मन जिंकली.
यावेळी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक अनिल गायकवाड उपस्थित
होते. सूत्रसंचालन सौ. जयश्री देशपांडे यांनी केले. श्रीमती मनीषा बोर्ड यांनी आभार मानले.
अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचा खेळाडू भानुदास चंद यांची ‘फिफा इंडिया टॅलेंट हंट’साठी निवड
राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी; महाराष्ट्रातील तीन खेळाडूंचा समावेश
नगर – अहमदनगर जिल्हा फुटबॉल
असोसिएशनचा खेळाडू भानुदास चंद यांची
एआयएफएफ-फिफा इंडिया टॅलेंट हंट साठी
निवड झाली आहे. महाराष्ट्रातून फक्त तीन खेळाडूंची निवड झाली असून,
त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातून भानुदास चंद याचा समावेश आहे. त्याची
झालेली निवड ही जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानास्पद आणि फुटबॉलसाठी
यशाचा मोठा टप्पा असल्याचे असोसिएशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले
आहे.
भानुदास १ मार्च रोजी भुवनेश्वरला या ट्रायल्ससाठी रवाना होत आहे,
जिथे तो देशभरातील उत्कृष्ट युवा खेळाडूंशी स्पर्धा करणार आहे. तो आठरे पाटील
पब्लिक स्कूलचा विद्यार्थी असून, शाळा प्रशिक्षक संदीप दरंदले यांच्या मार्गदर्शनाखाली
त्याचे फुटबॉल कौशल्य विकसित झाले आहे. तसेच शालेय अध्यक्ष डॉ. अनिल आठरे
यांच्याकडून त्याला खेळासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. त्याची निवड प्रथम फिरोदिया
शिवाजीयन्स आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत झाली, जिथे त्याने आंतर जिल्हा फुटबॉल
स्पर्धेसाठी प्रतिनिधित्व केले.
या स्पर्धेत त्याला एडीएफएच्या सी लायसन्स प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण मिळाले,
ज्यामुळे त्याचा खेळात आनखी सुधारणा झाली. यानंतर त्याने अहिल्यनगरच्या
संघाकडून आंतरजिल्हा स्पर्धेत खेळताना अप्रतिम कामगिरी केली, ज्यामुळे संघाने
१५ वर्षा आतील आंतर जिल्हा उपांत्य फेरीत
प्रवेश मिळवला. ही कामगिरी सहसा मोठ्या
महानगरांतील संघच करू शकतात, त्यामुळे
भानुदासने नगर जिल्ह्याच्या फुटबॉल क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला
आहे.
आंतरजिल्हा शिबिरात, त्याला एडीएफएचे सचिव तसेच माजी राष्ट्रीय
व पुणे विद्यापीठाचे खेळाडू रौनप फर्नांडिस यांनी मार्गदर्शन केले. तसेच
राजू पाटोळे, जेव्हिअर स्वामी, व्हिटर जोसेफ, वैभव मनोदिया, खालिद
सय्यद, ऋषिपालसिंह परमार आणि प्रदीप जाधव यांनी त्याला प्रेरणा आणि
प्रशिक्षकांचे पाठबळ दिले.
अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन सतत युवा खेळाडूंना उत्तम संधी
मिळवून देण्यासाठी नियमित फुटबॉल स्पर्धा आणि प्रशिक्षण शिबिरे आयोजित करत
आहे. भानुदास चंद हा राष्ट्रीय स्तरावर यशस्वी होईल आणि फिफाच्या विशेष प्रशिक्षण
कार्यक्रमात स्थान मिळवेल, अशी अपेक्षा जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने
व्यक्त करण्यात आली आहे. जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया
आणि वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर यांनी भानुदासच्या सुरक्षित प्रवासाची संपूर्ण
जबाबदारी घेतली असून, त्याला या फिफा इंडिया टॅलेंट हंट साठी आवश्यक ती
सर्व मदत उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आह
नगर सीए शाखेतर्फे सोलार सिस्टम व अभ्यासिकेचे उद्घाटन
नगर – सीएच्या नगर शाखेने विद्यार्थ्यांच्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी आणि शाश्वततेला प्रोत्साहन देण्यासाठी एक
उल्लेखनीय पाऊल उचलले आहे, ज्यामध्ये अत्याधुनिक सुविधांसह एक प्रगत वाचन कक्ष आणि त्यांच्या
परिसरात सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे. सीए विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण वातावरण प्रदान
करण्यासाठी डिझाइन केलेले प्रगत वाचन कक्ष, आयकर गुरु सीए डॉ. गिरीश आहुजा यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आरामदायी आसनव्यवस्था, वातानुकूलन, समर्पित अभ्यास कक्ष, पॉवर बॅकअप आणि डिजिटल संसाधन केंद्राने सुसज्ज,
ही सुविधा विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासात सर्वो त्तम शय सुविधांसह मदत करण्याचा उद्देश ठेवते.
सीए डॉ. आहुजा यांनी भविष्यातील चार्टर्ड अकाउंटंट्स घडवण्यासाठी सुसज्ज अभ्यास जागेच्या भूमिकेवर भर
दिला. शाखेने ऊर्जा कार्यक्षमता आणि पर्यावरणीय जबाबदारीच्या दिशेने एक पाऊल असलेल्या सौर ऊर्जा
प्रकल्पाचे उद्घाटन देखील केले. नगर शाखेच्या माजी अध्यक्षांनी उद्घाटन केले. सौर पॅनेल बसवल्याने वीज
खर्चात लक्षणीय घट होईल आणि हरित ऊर्जा उपायांचा अवलंब करण्याच्या दृष्टिकोनाला बळकटी मिळेल.
सीए नगर शाखेचे अध्यक्ष सीए सनित मुथा यांनी मान्यवरांचे, माजी अध्यक्षांचे आणि सदस्यांचे त्यांच्या अढळ
पाठिंब्याबद्दल आभार मानले. त्यांनी अधोरेखित केले की अॅडव्हान्स्ड रीडिंग रूम असणे हे त्यांचे स्वप्न होते जे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे अभ्यासाचे वातावरण प्रदान करेल, तर सौर ऊर्जा प्रकल्प शाश्वतता आणि खर्च कार्यक्षमतेच्या
वचनबद्धतेशी सुसंगत आहे. यावेळी व्यवस्थापकीय समिती पदाधिकारी सीए प्रसाद पुराणिक
(उपाध्यक्ष), सीए अभयकुमार कटारिया (सचिव), सीए महेश तिवारी (खजिनदार), सीए
ज्ञानेश्वर काळे व सीए पवनकुमार दरक (माजी अध्यक्ष) तसेच माजी अध्यक्ष सीए मोहन बरमेचा, सीए संजय
देशमुख, सीए अजय मुथा, सीए मिलिंद जांगडा, सीए सुशिल जैन, सीए प्रसाद भंडारी, सीए कुलकर्णी ज्ञानेश,
सीए (डॉ.) परेश बोरा, सीए किरण भंडारी, सीए संदीप देसरडा तसेच सीए, विद्यार्थी उपस्थित होते.
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर केडगावात रंगली दिंडी प्रदक्षिणा
दिंडीत अवतरले नागा साधू, शंकर-पार्वती; भगवान शंकराचा जयघोष, टाळ-मृदूंगचा निनाद आणि भक्तीमय वातावरणात भाविकांचा सहभाग
नगर – महाशिवरात्री निमित्ताने केडगाव मध्ये विश्वेश्वर प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या
पार्श्वभूमीवर २७ फेब्रुवारी रोजी हर हर महादेवचा गजर करुन दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली. या मिरवणुकीत
अबालवृध्दांसह भाविक व महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. हातात भगवे ध्वज, टाळ-मृदूंगचा निनाद,
भगवान शिवाच्या स्तुतीसाठी भजन आणि धार्मिक घोषणांच्या गजरात, भक्तीमय
वातावरणात दिंडी प्रदक्षिणा रंगली होती. नागा साधू, शंकर-पार्वतीच्या वेशभूषेतील चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष
वेधले. या दिंडीचे केडगाव पंचक्रोशीतील भाविकांनी ठिकठिकाणी स्वागत केले.
दिंडी मार्गावर महिलांनी आकर्षक रांगोळी रेखाटून, सडा टाकला होता. दिंडीतील
भगवान शिवाच्या रथावर फुले उधळण्यात आली. भगवान शंकराच्या जयघोषाने
परिसर निनादला. मुली व मुलांनी वारकर्यांची पारंपारिक वेशभूषा परिधान केली होती. हातात टाळ घेऊन
विद्यार्थ्यांनी जय हरी विठ्ठलाचा घोष केला. दिंडी पाहण्यासाठी केडगाव ग्रामस्थांनी गर्दी केली होती. तर मुलींसह महिलांनी
फुगड्यांचा फेर धरला होता. केडगावच्या उदयनराजे नगर येथे श्री विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी शिवलिलामृत पारायण आणि तपपुर्ती सोहळा सुरु आहे. या निमित्ताने दिंडी
प्रदक्षिणा काढण्यात आली. या दिंडीत शकुंतला पवार, शितल सातपुते, दीपा भांबरे, शितल आजबे, शुभांगी घोडके,
वैष्णवी भुक्कन, मेघा सातपुते, प्रमिला गीते, उर्मिला ढाकणे, शितल खेडकर, धांडे मावशी, विश्वेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष
गणेश सातपुते, सचिन बडे, सागर सातपुते, महेश वाळके, भूषण गुंड, योगेश कुमठेकर, नितीन आजबे, महेश
घोडके, आंधळे मेजर, पवार सर, मच्छिंद्र भांबरे, जगन्नाथ आंधळे, गोरक्षनाथ कोकाटे, कुंडलिक कोल्हे, भाऊसाहेब
कोल्हे, कैलास भुक्कन, विशाल सकट, शिवा मोडवे, अमित रासकर, कैलास नागरगोजे, दीपक बडे, मयूर भोसले,
गोरख कोतकर आदींसह मराठानगर, वैष्णवनगर, शिवाजीनगर, भूषणनगर, एकनाथनगर, उदयनराजेनगर आदींसह
परिसरातील भाविक उपस्थित होते. मिरवणुकीच्या समाप्तीनंतर भगवान शंकराची आरती करुन प्रसादाचे वाटप
करण्यात आले.
विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांबरोबरच पालकांचा सहभाग महत्त्वाचा
दादाभाऊ कळमकर यांचे प्रतिपादन; लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात, बालविवाह प्रतिबंध व स्त्री जन्माच्या स्वागतासाठी नाटिकेतून प्रबोधन
नगर – विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांबरोबरच
पालकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. महिला पालक
विद्यार्थ्यांना चांगले वळण लावू शकतात. गुणवंत विद्यार्थी
घडविण्याचे काम रयत शिक्षण संस्थेत केले जात आहे.
पालक-शिक्षकांनी सातत्याने लक्ष दिल्यास विद्यार्थ्यांचे
उज्वल भवितव्य घडणार आहे. स्नेहसंमेलनातून
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून भविष्यातील
कलाकार घडणार असल्याचा विश्वास दादाभाऊ
कळमकर यांनी व्यक्त केला.
रयत शिक्षण संस्थेच्या कापड बाजार येथील
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. बालविवाह
प्रतिबंध, स्त्री जन्माचे स्वागत आदी सामाजिक विषयांवर
विद्यार्थ्यांनी स्वतः रेकॉर्ड केलेले नाटकीचे सादरीकरण
केले. सांस्कृतिक कार्यक्रमातून स्त्री शक्तीचे दर्शन
घडविले. गरबा नृत्य, आदिवासी नृत्य आणि महाराष्ट्रासह
दक्षिण भारतातील पारंपारिक गीतांवर नृत्याचे सादरीकरण
करुन उपस्थितांची मने जिंकली.
लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झालेल्या
स्नेहसंमेलनाचे उद्घाटन कर्मवीर भाऊराव व लक्ष्मीबाई
भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करुन
दीपप्रज्वलनाने करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेचे
मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर यांच्या
अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी जनरल बॉडी
सदस्य ज्ञानदेवराव पांडुळे, अर्जुनराव पोकळे, सल्लागार
समिती सदस्य माजी प्राचार्य विश्वासराव काळे, माजी
प्राचार्य कैलासराव मोहिते, श्यामराव व्यवहारे, विष्णुपंत
म्हस्के, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके,
माध्यमिकच्या मुख्याध्यापिका छायाताई काकडे आदींसह
शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी
उपस्थित होते.
प्रास्ताविकात मुख्याध्यापिका छायाताई काकडे
यांनी शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षणासह विद्यार्थ्यांच्या
कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात
येत आहे. याशिवाय कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात
विद्यार्थ्यांना चालना देण्याचे काम केले जात असल्याचे
त्यांनी स्पष्ट केले.
अर्जुनराव पोकळे यांनी विद्यार्थ्यांचे कलागुण
ओळखून त्या दिशेने पालकांनी प्रोत्साहन द्यावे. शिक्षक-
पालकांनी विद्यार्थ्यांचे कलागुण ओळखणे, हे आजच्या
काळाची गरज निर्माण झाली असल्याचे सांगितले. रयत
शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग मध्ये आदर्श विद्यार्थी
पुरस्काराचा मान मिळवणारा शाळेचा इयत्ता दहावी मधील
विद्यार्थी अद्वैत विवेक गहाणडुले व या शैक्षणिक वर्षाची
आदर्श विद्यार्थिनी श्रेया सुजित गोटे यांचा पाहुण्यांच्या
हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
गणेश वंदनेने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात
झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी हिंदी-मराठी गीतांवर नृत्याचे
सादरीकरण करुन कार्यक्रमाचा आनंद लुटला. विविध
गाण्यांतून मराठी सणांचे दर्शन घडविण्यात आले. लुंगी
डान्स…, पुष्पा पुष्पा…, मल्हारी… पिंगा ग पोरी पिंगा
या गीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. आदिवासी
गीतावर युवक-युवतींनी बेभानपणे नृत्य सादर केले.
लाडकी बहिण योजना! या नाटिकेतून विद्यार्थ्यांनी
संपूर्ण सभागृहाला खळखळून हसविले. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन प्रदीप पालवे व स्मिता पिसाळ यांनी केले.
आभार ज्ञानदेव पांडुळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी
करण्यासाठी प्रभाकर थोरात, सुनीता लांडगे, अमित
धामणे, मंगेश कारखिले, उमेश विलायते, राजेंद्र देवकर,
श्रीमती नागपुरे, सानप, खेंडके यांचे सहकार्य लाभले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इमारतीवर बाबुर्डी घुमटच्या नावाचा उल्लेख करण्यात यावा
साहित्यिक सुभाष सोनवणे यांचे प्रतिपादन; शिशू संगोपन संस्थेत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा
नगर – अतंरमनामध्ये चैतन्य, आनंद आणि शांती निर्माण करणारी जगातील एकमेव भाषा म्हणजे आपली माय मराठी
भाषा होय. मराठी भाषेला मोठी परंपरा आहे, आपल्या संतांनी, लेखकांनी मराठी भाषेला समृद्ध केले आहे. अनेक दर्जेदार
लिखाण मराठी भाषेत उपलब्ध आहे. प्रत्येकाला अभिमान वाटवा, अशीही आपली मराठी भाषा आहे, मराठी भाषा अनेक
संत, साहित्यिक, प्रतिभावंतांनी आपल्या लेखणीतून, मराठी भाषेला समृद्ध केले आहे, ही साहित्याची समृद्धी जनसामन्यांपर्यंत पोहचवून ‘मराठी भाषेला’ आणखी समृद्ध करण्याची आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन साहित्यिक तथा कवी सुभाष सोनवणे यांनी केले. शिशू संगोपन संस्थेच्या सविता रमेश फिरोदिया प्रशाला येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कवी वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे
पुजन करण्यात आले. यावेळी साहित्यिक सुभाष सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी
साहित्य परिषदेचे अध्यक्ष किशोर मरकड, संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुंदेचा, उपाध्यक्ष दशरथ खोसे, सचिव
र. धो. कासवा, सहसचिव राजेश झालानी, खजिनदार अॅड.विजयकुमार मुनोत, माजी प्राचार्य विश्वास काळे,
सिनेट सदस्य शिवाजी साबळे, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक, मनसुखलाल पिपाडा, सचिन
डागा, केंद्र प्रमुख पोपटराव धामणे, बन्सी नन्नवरे, विनोद कटारीया, कांचन गावडे, माध्य.मुख्याध्यपक दत्तात्रय
कसबे, प्राथमिक मुख्याध्यापिका योगिता गांधी आदी उपस्थित होते.
यावेळी किशोर मरकड म्हणाले की, मराठी ही
आपली मायबोली आहे, त्यामुळे आपल्या व्यवहारात
मराठीचा वापर झाला पाहिजे. प्रत्येकाला आपल्या भाषेचा
अभिमान असतो, तसाच अभिमान मराठी माणसानेही
बाळगला पाहिजे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त
मराठीचा स्विकार करण्याचा निर्धार प्रत्येकाने करावा,
असे आवाहन यावेळी केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष
दिलीप गुंदेचा म्हणाले की,
आजच्या मोबाईल इंटरनेटच्या
जगात वाचंकाची संख्या कमी
होत आहे. परंतु साहित्य वाचनाने
व्यक्तीच्या जीवनात अमुलाग्र
बदल होतो. त्यासाठी नियमित
वाचन केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी
करिअरच्या दृष्टीने मराठी
पुस्तकांचे जास्तीत जास्त वाचन
करावे, असे सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी आणि
शिक्षकांनी मराठी भाषा दिनानिमित्त मराठीतून भाषणे
सादर केली. प्रास्तविकात संस्थेचे उपाध्यक्ष दशरथ
खोसे म्हणाले की, कविवर्य कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या
बोली भाषेला एक वेगळा साहित्य प्रकार म्हणून प्रस्थापित
करण्यासाठी मोठे योगदान दिले. मराठी ही शिकण्याची
भाषा व्हावी यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. विद्यार्थ्यांना
या गोष्टींची माहिती व्हावी, यासाठी संस्थेच्यावतीने
आम्ही साहित्यिक क्षेत्रातील विविध मान्यवर बोलवून
त्यांचे मौलिक विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम
करत आहोत.
सुत्रसंचालन निलेश आंबेकर यांनी केले. यावेळी
जयश्री कोदे आणि विद्यार्थ्यांनी मराठी कविता आणि
गिते सादर करुन सर्वांची मने जिंकली.
चैतन्य, आनंद आणि शांती निर्माण करणारी जगातील एकमेव भाषा म्हणजे माय मराठी
साहित्यिक सुभाष सोनवणे यांचे प्रतिपादन; शिशू संगोपन संस्थेत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा
नगर – अतंरमनामध्ये
चैतन्य, आनंद आणि शांती
निर्माण करणारी जगातील एकमेव
भाषा म्हणजे आपली माय मराठी
भाषा होय. मराठी भाषेला मोठी
परंपरा आहे, आपल्या संतांनी,
लेखकांनी मराठी भाषेला समृद्ध
केले आहे. अनेक दर्जेदार
लिखाण मराठी भाषेत उपलब्ध
आहे. प्रत्येकाला अभिमान
वाटवा, अशीही आपली मराठी
भाषा आहे, मराठी भाषा अनेक
संत, साहित्यिक, प्रतिभावंतांनी
आपल्या लेखणीतून, मराठी भाषेला समृद्ध केले आहे,
ही साहित्याची समृद्धी जनसामन्यांपर्यंत पोहचवून ‘मराठी
भाषेला’ आणखी समृद्ध करण्याची आपली जबाबदारी
आहे, असे प्रतिपादन साहित्यिक तथा कवी सुभाष
सोनवणे यांनी केले.
शिशू संगोपन संस्थेच्या सविता रमेश फिरोदिया
प्रशाला येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा
करण्यात आला. याप्रसंगी कवी वि. वा. शिरवाडकर
(कुसुमाग्रज) यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे
पुजन करण्यात आले. यावेळी साहित्यिक सुभाष
सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी
साहित्य परिषदेचे अध्यक्ष किशोर मरकड, संस्थेचे
अध्यक्ष दिलीप गुंदेचा, उपाध्यक्ष दशरथ खोसे, सचिव
र. धो. कासवा, सहसचिव राजेश झालानी, खजिनदार
अॅड.विजयकुमार मुनोत, माजी प्राचार्य विश्वास काळे,
सिनेट सदस्य शिवाजी साबळे, हिंद सेवा मंडळाचे
अध्यक्ष शिरीष मोडक, मनसुखलाल पिपाडा, सचिन
डागा, केंद्र प्रमुख पोपटराव धामणे, बन्सी नन्नवरे, विनोद
कटारीया, कांचन गावडे, माध्य.मुख्याध्यपक दत्तात्रय
कसबे, प्राथमिक मुख्याध्यापिका योगिता गांधी आदी
उपस्थित होते.
यावेळी किशोर मरकड म्हणाले की, मराठी ही
आपली मायबोली आहे, त्यामुळे आपल्या व्यवहारात
मराठीचा वापर झाला पाहिजे. प्रत्येकाला आपल्या भाषेचा
अभिमान असतो, तसाच अभिमान मराठी माणसानेही
बाळगला पाहिजे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त
मराठीचा स्विकार करण्याचा निर्धार प्रत्येकाने करावा,
असे आवाहन यावेळी केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष
दिलीप गुंदेचा म्हणाले की,
आजच्या मोबाईल इंटरनेटच्या
जगात वाचंकाची संख्या कमी
होत आहे. परंतु साहित्य वाचनाने
व्यक्तीच्या जीवनात अमुलाग्र
बदल होतो. त्यासाठी नियमित
वाचन केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी
करिअरच्या दृष्टीने मराठी
पुस्तकांचे जास्तीत जास्त वाचन
करावे, असे सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी आणि
शिक्षकांनी मराठी भाषा दिनानिमित्त मराठीतून भाषणे
सादर केली. प्रास्तविकात संस्थेचे उपाध्यक्ष दशरथ
खोसे म्हणाले की, कविवर्य कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या
बोली भाषेला एक वेगळा साहित्य प्रकार म्हणून प्रस्थापित
करण्यासाठी मोठे योगदान दिले. मराठी ही शिकण्याची
भाषा व्हावी यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. विद्यार्थ्यांना
या गोष्टींची माहिती व्हावी, यासाठी संस्थेच्यावतीने
आम्ही साहित्यिक क्षेत्रातील विविध मान्यवर बोलवून
त्यांचे मौलिक विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम
करत आहोत.
सुत्रसंचालन निलेश आंबेकर यांनी केले. यावेळी
जयश्री कोदे आणि विद्यार्थ्यांनी मराठी कविता आणि
गिते सादर करुन सर्वांची मने जिंकली.















