शहाजी रोड येथील श्री कालिका देवी मूर्ती वज्रलेप प्राणप्रतिष्ठा, ९० वा वर्धापन दिननिमित्त शतचंडी यज्ञ सोहळ्याचे आयोजन

0
34

नगर – सोमवंशीय क्षत्रीय कासार समाजाचे आराध्य दैवत श्री कालिका माता मंदिराची स्थापना ९० वर्षांपूर्वी झाली असून, हे
मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. श्री कालिका देवी संस्थान व कालिका महिला युवक मंडळाच्या प्रेरणेने श्री कालिका देवी मूर्ती वज्र, लेप ९० वा वर्धापन दिन, शतचिंडी यज्ञ सोहळा २ ते ६ मार्च पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाने होणार असल्याची माहिती अध्यक्ष संदीप डांगरे यांनी दिली. २ मार्च रोजी सकाळी ९ ते ६ या वेळेत प्रायश्चित्त संकल्प, गणपती पुण्याहवाचंन, पंचांग कर्म व सप्तशती पाठ आरंभ, मंडल व प्रधान पूजन, स्नपन व प्रतिष्ठा विधी, अभिषेक, अग्नी मंथन व स्थापना हवन, सायंपूजन व आरती, ह.भ.प साहिल महाराज पालकर तळेगावकर चाळीसगाव यांचे हरिकीर्तन. ३ मार्च रोजी प्रांत पूजन, अभिषेक पूजन, देवी सहस्र अर्चन, श्री सुक्त हवन, सायंपूजन व आरती, सायंकाळी ७ ते ९ श्री कालिका भजनी मंडळ अहिल्यानगर यांची सुश्राव्य भजन संध्या. ४ मार्च रोजी किशोर शेरवानी यांची माता की चौकी कार्यक्रम. ५ मार्च रोजी प्रधान हवन, कुमारिका पूजन, कुलस्वामिनी आई कालिका मातेच्या चरणी कुंकूमार्चन. ६ मार्च रोजी उत्तरांग हवन, विशेष हवन, बलिदान, पूर्णाहुती, ब्राह्मण पूजन, सायंकाळी ५ ते १० या दरम्यान आईसाहेबांचा पालखी सोहळा, महाआरती व
महाप्रसादाचे आयोजन केले असल्याची माहिती श्री कालिका देवी संस्थान विश्वस्त मंडळ यांच्या वतीने देण्यात आली आहे.
सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजाचे आराध्य दैवत श्री कालिका माता होय, श्री कालिका माता कासार समाजाच्या श्री कालिका देवी मंदीरात कशी स्थापना झाली याचा एक इतिहास आज असलेली श्री कालिका माताची मुर्ती फार पुरातन
आहे. ही मुर्ती नगरच्या नालेगांव भागात एका झाडाखाली मारुतीच्या मंदिरापुढे होती. यामुतींवर तेलाचे किटण मोठ्याप्रमाणावर साठलेले होते. शनिदेवतेची ही मुर्ती समजुन लोक त्यामुर्तीला तेल वहात असत त्यामुळे मुर्तीस किटण
होते. कै.शंकरराव देवळालकर यांना देवीने स्वप्नात दृष्टांत दिला. मला तुमच्याकडे (समाजाकडे) घेवून जाऊन माझी स्थापना करा. त्यानुसार कै.शंकरराव देवळालकर समाजातील प्रमुख व्यक्तींकडे आणि नालेगांवच्या पाटलांकडे गेले. सदरची मुर्ती पाटलांकडुन घेतली आणि त्या मुर्तीचे सत्यरुप पाहण्यासाठी स्वच्छ करण्यास तांबटाकडे दिली. गरमपाणी सोडा यांच्या सहाय्याने या मुर्तीचे किटण काढण्यात आले. मुर्तीचे सुन्दर स्वरुप दिसताच ही मुर्ती आपणाकडे ठेवावी
असा मोह झाला. तात्काळ या तांबटाची तब्येत बिघडली जुलाब वांत्या सुरु झाल्याने या तांबटाने ही मुर्ती कासार समाजाच्या स्वाधीन केली. श्री कालिका मातेच्या मूर्तीची स्थापना इमारतीमध्ये फाल्गुन शुल तृतीया शके १८५७ मंगळवार दि. २५/०२/१९३६ रोजी दुपारी ११ वाजता विधीपूर्वक यथासांग करण्यात आली. यानंतर मंदिरात नवरात्र महोत्सव, मंगळवारी
धार्मिक भजन, चैत्र उटीचा, महिला मंडळाचे सामुदायीक मकर संक्रांत व चैत्री हळदी कुंकु असे कार्याक्रम होतात. कोजागिरी पौर्णिमा कार्यक्रम इ. समारंभ होतात. कासार समाजाचे व नगरवासियांचे श्री कालिका मंदिर हे एक श्रद्धास्थान आहे. सन १९५५ साली श्री नवरात्र महोत्सव साजरा करण्यासाठी यथासांग शास्त्रोक्त धार्मिक पद्धतीचा अवलंब करुन करावा यासाठी श्री कालिका यै नमः ॥ हा सव्वा कोटी नाम जप करुन महोत्सवास सुरुवात करण्यात आली. आणि सन १९५८ पासुन श्री कालिका मातेस दररोज बदलती वाहन करण्यात येऊ लागले. व ही परंपरा आजही चालु असुन धनंजय वेळापुरे वाहन तयार करतात. वाहनांमध्ये गजराज, अश्व, कमळ, नंदी, सिंह, मयुर, दैत्यवध, उंट, गरुड, हंस, दसर्‍याला अश्वरथ व कोजागीरीला हरिण इ. वाहने करतात. तसेच नवरात्र महोत्सव काळात होम, भंडारा, तसेच समाजातील
विविध मान्यवरांचा सत्कार, महिला व मुलांसाठी विविध कलागुणांचे कार्यक्रम घेतले जातात. तसेच आजही फाल्गुन शुल तृतीयेला श्री कालिका देवी मुर्ती प्रतिष्ठापणाचा वर्धापन दिन साजरा केला जातो व कार्तिक पोर्णिमा दिपोत्सव साजरा केला जातो. अशी माहिती श्री कालिका देवी ट्रस्ट स्वस्थानाने दिली.