हभप दुतारे महाराज यांचे प्रतिपादन; आयोध्यानगरीत काल्याचे किर्तनाने महाशिवरात्र उत्सवाची सांगता
नगर – भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन प्रार्थना स्वतःचे संरक्षण, चांगले जीवन घडविण्यासाठी नव्हत्या. सर्व प्राचीन प्रार्थना नेहमीच, हे प्रभू मला नष्ट कर म्हणजे मी तुझ्यासारखा होऊ शकेल. अशा होत्या म्हणून शिवरात्री ही ज्या दिवशी असते ती सर्वात काळोखी रात्र आहे. शिव हा संहारक तर दुसरीकडे कृपाळू असा ओळखला जातो. महाशिवरात्र ही शिव शंकराची कृपा ग्रहण करण्यासाठी एक खास रात्र आहे. त्यामुळे महाशिवरात्र तुमच्या आमच्या साठी फक्त जागरणाची रात्र नाही
तर जागृतीची रात्र आहे, असे विवेचन हभप गोरक्षनाथ दुतारे महाराज यांनी काल्याचे कीर्तना मधून केले. सावेडी उपनगरात पाईपलाईन रोडवरील श्रीराम चौकात आयोध्या नगरी येथे श्री महादेव प्रतिष्ठान तर्फे मंदिरात महाशिवरात्र उत्सव साजरा करण्यात आला. उत्सवाची सांगता काला फोडून महाप्रसादाचे वाटप करून करण्यात आली. यावेळी हभप दुतारे महाराज
यांनी शिवरात्रीचे महत्व आध्यात्मिक धार्मिक प्राचीन काळातील महाशिवरात्रीचे वर्णन कीर्तनामधून केले. यावेळी हे भोळ्या शंकरा, तुला आवड बेलाच्या पानाची, मीरा-मोहन यांची गाणी सादर केली. कीर्तनातून महादेवांचे महत्त्व सांगताना त्यांनी वेगवेगळी नावे कशी पडली.त्यांनी जगाच्या कल्याणासाठी स्वतः विष प्राशन केले. समुद्रमंथनातून निघालेले हलाहल प्राशन केले. ते आपल्या कंठात साठविले. त्यामुळे निळकंठ हे नाव पडले अशा खूप कथा आपल्या सर्वांच्या परिचयाच्या आहेत.
असे सांगून काल्याचे महत्व विशद केले. परमार्थात सुख मिळवायचे असेल तर नामस्मरणासारखे साधन नाही. या
नामस्मरणामुळे मनाला मिळणारे समाधान कुठेच मिळत नाही. असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात दिनकरराव
थोरात यांनी महादेव प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या भक्ती भावाने होत असतो. महाशिवरात्रीला परिसरातून शोभायात्रा निघते. शंकर-पार्वती, राधा श्रीकृष्ण, राम-सीता अशा वेशभूषेत छोटी मोठी मुले सहभागी होतात. कार्यक्रमासाठी या भागातील दानशूर व्यक्ती, उद्योजक, रहिवासी सहकार्य करतात. प्रतिष्ठानचे शिवाजीराव लगड, शंतनु पांडव, दिनेश कुलकर्णी, कैलास शेळके, बुरगुल, सर्व कार्यकर्ते परिश्रम घेतात. यामुळे या उत्सवाची शोभा वाढते.
स्थानिक नगरसेवक कायम सहकार्य करत असतात याबद्दल आभार श्री. थोरात यांनी मानले. या काल्याच्या कीर्तनामध्ये हभप गोरक्षनाथ दुतारे यांना तबला वादक हर्षद भावे, संवादिनी वादक गणेश बारगजे, ढोल वादक अजित गुंदेचा, बॅन्जो वादक कुलदीप चव्हाण, पॅड वादक रमेश कार्ले आदींनी साथ दिली