स्त्री : हेल्लो, कोण बोलताय?
बंडू : मी बंडू बोलतोय…सर आहेत का???
स्त्री : सर वारले आहेत…पण तू किती वेळा फोन करुन हेच
विचारतोस?
बंडू : ऐकायला बरे वाटते ओ…
दैनिक पंचांग शनिवार, दि. १ जुन २०२४
गुरु पूर्व दर्शन, शके १९४६ क्रोधीनाम
संवत्सर, वैशाख कृष्णपक्ष, उ.भा.२७|१६
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६
वा. ३२ मि.
राशिभविष्य
मेष : आपल्या संपर्कात येणार्या लोकांच्या वर्तनामुळे आ01पणास संताप येण्याची शयता आहे. हसत खेळत वेळ खर्च होईल.
वृषभ : योग्य उद्योगात गुंतवणूक केल्यास शेवटी आर्थिक नफा मिळेल. गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांनी आपणास यश
आणि आनंद मिळेल.
मिथुन : आपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्या रीतीने कार्य करण्यास आपली मदत करेल.
कर्क : काम व इच्छित योजनेला अमलात आणण्याचे प्रयत्न करा. योजनांमध्ये केलेला बदल इतर कामे करण्यासाठी प्रवृत्त करेल.
सिंह : आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या. व्यापार व्यवसाय सहज राहील. प्रिय व्यक्तीबरोबर संवाद होईल.
कन्या : आपल्या आवडीच्या नातलगांना भेटा आणि स्वतःबद्दल त्यांची प्रतिक्रिया मिळवा.
तूळ : ज्या व्यक्तीकडे फुकट घालवण्यासाठी वेळ आहे त्याचे ऐकण्याचा प्रयत्न करा आणि आपला सल्ला त्याला द्या.
वृश्चिक : आपल्या आवडीच्या नातलगांना भेटा आणि स्वतःबद्दल त्यांची प्रतिक्रिया मिळवा. सुख-शांतीचे वातावरण राहील.
धनु : आपण आपल्या घराच्या वाढीबाबत काही योजना बनवू शकता. आवश्यक कार्य देखील पूर्ण होतील. मित्रांचा अनुकूल सहयोग
मकर : बळात वाढ होईल. आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाच्या कामांसाठी श्रम करावे लागेल. आर्थिक विषयांमध्ये सावगिरी बाळगा.
कुंभ : आज आपल्या आयुष्यात आपल्या नातलागांची व मित्रांची चांगली भूमिका रहाणे शय आहे.
मीन : आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर
माणसाला एकूण किती शब्द माहिती असतात?
माणसाला एकूण किती शब्द माहिती असतात?
एखाद्या भाषेत एकूण किती शब्द असतात? या प्रश्नाचं उत्तर शोधताना ज्या अडचणी जाणवतात त्याहूनही अधिक अडचणी या प्रश्नाचं उत्तर देताना जाणवतात. कारण शब्द आणि शब्दसंग्रह या संज्ञांची व्याख्या आपण कशी करतो, यावर या प्रश्नाचं उत्तर अवलंबून आहे. शिवाय माणसाची जीवनशैली, त्याचा व्यवसाय, त्याचं सामाजिक वातावरण वगैरे अनेक बाबींवरही या प्रश्नाचं उत्तर अवलंबून आहे. खेड्यातल्या व्यक्तीला केवळ शहरातच ज्यांचा संबंध येतो अशा अनेक शब्दांची माहिती असण्याची आवश्यकताच नसते. त्याच्या उलटही असतं. पाल, गावकूस, तिठा, पाणवठा वगैरे बाबींची माहिती शहरी माणसाला असण्याची शयता तशी कमीच. तीच बाब व्यवसायाची. पोस्टात काम करणार्या व्यक्तींना काही खास शब्दांची माहिती आवश्यक असते. बटवडा, बंटगी वगैरे शब्दांचा वापर करण्याची पाळी इतरांवर क्वचितच येते. त्यामुळे असे शब्द इतरांच्या शब्दसंग्रहात असण्याची आवश्यकताच नसते. आपल्या मर्यादित वर्तुळात वावरणार्या व्यक्तीला तसं करून चालत नाही. शिवाय बोली भाषा आणि लेखी भाषा असा फरक आहेच. बोली भाषेतल्या कित्येक शब्दांना शब्दकोशांमध्येही स्थान मिळत नाही; पण व्यक्तीच्या शब्दसंग्रहात त्यांचा समावेश असतो. कॉलेज तरुणांच्या भाषेत कंडा किंवा सही या शब्दांना वेगळाच अर्थ आहे. तो अर्थ इतर प्रौढांनाही माहिती असेलच असं नाही. ते शब्द इतरांच्या संग्रहात जसे असतात, तसेच त्या तरुणांच्या संग्रहातही असतात. मात्र, त्याचे दोन संपूर्णतया निरनिराळे अर्थ त्यांच्या ओळखीचे असतात. मग त्या तरुणांच्या बाबतीत संग्रहाची व्याप्ती दुप्पट-तिप्पट आहे, असं समजायचं काय? यामुळेच शब्दसंग्रहाच्या व्याप्तीबाबत वैज्ञानिकांमध्येही एकमत नाही. काही वर्षांपूर्वी अमेरिकेत १६ वर्षांच्या मुलाच्या संग्रहात १० ते १२ हजार शब्द असतात, तर कॉलेज पदवीधराचा शब्दसंग्रह त्याच्या दुप्पट मोठा म्हणजेच २० ते २५ हजार शब्दांचा असतो, असं सांगितलं जाई. ते कितपत खरं आहे, याचा पडताळा घेण्यासाठी डेव्हिड क्रिस्टल यांनी एक प्रयोग केला. त्यांनी शब्दकोशातली अधलीमधली पानं निवडून ती कॉलेज विद्यार्थ्यांना वाचायला दिली. त्यातले किती शब्द त्यांना माहिती आहेत, याची बेरीज करायला सांगितली गेली. त्यावरून त्यांना ६० ते ७५ हजार शब्द माहिती असतात, असा निष्कर्ष क्रिस्टल यांनी काढला; पण हे झाले केवळ शब्दकोशातले मूळ शब्द. त्यांचे निरनिराळे भावार्थ, प्रत्यय लावून केलेली त्यांची रूपं, विशेषणं, क्रियाविशेषणं इत्यादींचा समावेश केल्यास ही संख्या याहूनही जास्त असावी, असा संशय व्यक्त केला गेला आहे. त्याची शहानिशा करण्यासाठी दुसरा एक प्रयोग केला गेला. त्यात दहा लाख शब्द असलेली एक साहित्यकृती निवडून त्यात शब्दकोशात येतील, असे किती मूळ शब्द आहेत, यांची गणती केली गेली. ती संख्या फक्त ३८ हजार झाली. त्यामुळे क्रिस्टल यांचा अंदाज बरोबर असावा, असा निर्वाळा आता दिला गेला आहे.
केसांसाठी उपयुत कढीपत्त्याचा पाला
केसांसाठी उपयुत कढीपत्त्याचा पाला
कढीपत्त्याचा एक गुच्छा घेऊन त्याला स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे आणि सूर्य प्रकाशात
त्या पानांना वाळवून घ्यावे, जेव्हा हे पान वाळून तयार होतील मग याची पूड करून घ्यावी.
आता २०० एम.एल. नारळाचे किंवा ऑलिव्ह ऑईलमध्ये किमान ४ ते ५ चमचे कढी पानांची
पूड मिस करून उकळत ठेवावे. दोन मिनिटांनंतर गॅस बंद करावा. तेलाला गाळून एखाद्या
एअर टाइट बाटलीत भरून ठेवा. झोपण्याअगोदर रोज रात्री हे तेल लावायला पाहिजे. जर हे
तेल थोडे गरम करून लावले तर त्याचे परिणाम लवकरच दिसून येतील. दुसर्या दिवशी सकाळी
डोयाला फक्त नॅचरल ऑपू लावून धुवावे. या ट्रीटमेंटला तुम्ही रोज किंवा एक दिवसाआड करू
शकता. तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल.
सफरचंदाचा हलवा
सफरचंदाचा हलवा
साहित्य : दोन मोठी कडक गोल्डन
सफरचंद, अर्धा लिटर दूध, एक वाटी साखर
(कमी-जास्त आवडीनुसार), अर्धी वाटी
खवा (खव्याऐवजी जास्त दूध चालेल), एक
चमचा किंवा त्यापेक्षा कमी लिंबूरस, आवडत
असल्यास एक चमचा गुलाबपाणी, दोन चमचे
गुलकंद, खायचा केशरी रंग, बदाम, दोन चमचे
साजूक तूप.
कृति : सफरचंदाची साल व मधला
कडक भाग, तसंच बिया काढून सफरचंद
किसावं. किसाला लगेच लिंबाचा रस लावावा.
म्हणजे कीस काळा पडणार नाही. कुकरमध्ये
कीस वाफवून घ्यावा. यातलं पाणी वाया
जाणार नाही याची काळजी घ्यावी.
दुधामध्ये साखर घालून दूध उकळावं
व आटवावं. कोमट झाल्यावर त्यात खवा
कुस्करून घालावा. गुलकंद, रंग, गुलाब
इसेन्स (गुलाबपाणी) व चिमूटभर मीठ घालून
शेवटी सफरचंदाचा कीस घालावा. दुधात
घालण्याआधी कीस तूप घालून जरा गरम
करावा. हा कीस दुधामध्ये घालून मिश्रण पाच
मिनिटं गरम करावं.
देण्याआधी बदाम सोलून त्याचे तुकडे
घालावेत. वरून वर्ख लावल्यास अधिक
आकर्षक दिसतं. अशाच पद्धतीनं अननस वा
केळ्याचा हलवा करता येतो.
वास्तू
घरात शांतता राहण्यासाठी
* रोज जेवणापूर्वी वास्तू पुरुषासाठी
वेगळा नैवेद्य आठवणीने दाखवावा.
* घरात जास्तीत जास्त शांतता
ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच घर आणि
घराचा परिसर स्वच्छ व नीटनेटका ठेवावा.
* रोज घरात रामरक्षा आणि हनुमान
स्तोत्र मोठ्याने म्हणावे.
* धार्मिक, पवित्र ग्रंथ बेडखाली,
लॉफ्टवर, डायनिंग टेबलावर ठेवू नका.






