दैनिक पंचांग शुक्रवार, दि. ३१ मे २०२४

—, शके १९४६ क्रोधीनाम
संवत्सर, वैशाख कृष्णपक्ष, शततारा ०६|१४
पू.भा.२८|४८
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६
वा. ३२ मि.

राशिभविष्य

मेष : अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. इतरांवर चुकीचा प्रभाव पडू शकतो. सामाजिक मान सन्मान वाढेल.

वृषभ : कौटुंबिक विषयांमध्ये आपणास समर्थन मिळेल पण एखाद्याला जामीन देणे टाळा. महत्वपूर्ण कार्यात यश मिळेल. पोरकटपणा करणे टाळा. संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग.

मिथुन : आर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवा. वातावरण उत्साहवर्धक राहील. व्यापारिक लाभ आणि सुख-समृद्धि वाढेल.

कर्क : व्यवसायात प्रगती कराल. स्थिती अनुकूल राहील. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. काही नवीन संधी मिळतील. मनात नवीन कल्पना सुचतील. आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल.

सिंह : वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न कराल. वाहने काळजीपूर्वक चालवा. भावनाशील असल्यामुळे नुकसान होणे शय आहे. शांत राहाण्याचा प्रयत्न करा.

कन्या : मनावर नियंत्रण ठेवाल. पैशाच्या बाबतीत आपली नड भागेल. एखाद्या विशिष्ट योजनेला हातावेगळे करण्यात वेळ
जाईल. नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा.

तूळ : कार्यक्षेत्रात वेगाने कार्य करा पण घाई करू नका. बेपर्वाईने कार्य करू नका. वेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती
होईल. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. कामावर प्रभाव पडेल. शिक्षण संबंधी विषयांमध्ये काळ अनुकूल ठरेल.

वृश्चिक : कुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या गरजा समजण्यात मदत मिळेल. आरोग्य उत्तम राहील. जोखिम असलेल्या कार्यांमध्ये गुंतवणूक करू नये. अचानक खर्च वाढेल. आजारात खर्चाची शयता.

धनु : कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शयता आहे. आपल्या इच्छेवर आणि मनस्थितीवर संयम ठेवा. शत्रू पराभूत होतील. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. व्यापार व्यवसायात अनुकूल वातावरण राहील.

मकर : व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. आर्थिक पक्षाबाबत सावध राहा. मातृपक्षाकडून प्रसन्नता राहील. हुशारीने गुंतवलेले धन आपणास ध्येयाजवळ घेऊन जाईल. मन प्रसन्न राहील.

कुंभ : काही प्रेमपूर्ण अनुभव आज येऊ शकतात. हा वेळ आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू शकता. घरातील वातावरण आनंददायी राहील. कौटुंबिक सदस्यांचा सहयोग मिळेल. मित्रांचा पाठिंबा राहील. कोणतेही आवेदन देण्यासाठी उत्तम वेळ.

मीन : आपल्या सर्जनशील व कलात्मक वैशिष्ट्यांना प्रेरणा मिळेल. अधिकार क्षेत्रात वाढ होईल. आरोग्य मध्यम राहील. राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील. व्यापार व प्रणयाच्या क्षेत्रात यश मिळेल. खाणे-पीणे काळजीपूर्वक करा.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

एक सेकंद म्हणजे किती काळ आहे?

एक सेकंद म्हणजे किती काळ आहे?

काळ ही मोठी अजब चीज आहे. ती एक अमूर्त कल्पना आहे. तरीही आपण तिचं मोजमाप करत असतो. वास्तविक, दोन निरनिराळया घटनामध्ये काही अवधी जावा लागतो आणि हा नेहमीच एकसारखा नसतो, हे ध्यानात आल्यानंतर त्या अवधीचं मोजमाप करण्याचं काहीतरी साधन असावं, असं वाटायला लागलं. त्यातूनच काळ या संकल्पनेचा उदय झाला. आपण मोजतो तो दोन नैसर्गिक घटनांमधला अवधी. त्या मोजमापाला काळ म्हणतो. म्हणजे मोजमाप होतं ते त्या अवधीचं, काळाचं नाही. तरीही काळ नावाची एक मोजपट्टी अमलात आणल्यानंतर त्याचं प्रमाणीकरण करणं आवश्यक झालं. दोन जाणार्‍या घटनेची निवड करण्यात आली. त्या दोन आवर्तनातील अवधीला काळाचं एकक मानण्यात आलं. त्यातून मग सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या अवधीला एक दिवस मानण्यात येऊ लागलं. एकदा पूर्णचंद्र दिसल्यानंतर परत त्याचं दर्शन होईपर्यंत असे कितीतरी दिवस जावे लागतात, हे समजल्यानंतर त्या दिवसांचा एक महिना मानण्यात आला. त्याच सूत्राचं बोट धरत वर्ष या एककाची मात्रा ठरवण्यात आली. नंतर असं दिसून आलं, की आपल्या नेहमीच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात, की त्यांच्यामधल्या अवधीचं मोजमाप करण्यासाठी दिवस हे एकक फार मोठं होतं. त्यापेक्षा लहान एककाची त्यासाठी गरज आहे. मग दिवसाचे लहान लहान भाग करुन त्यांची एककं करण्याची कल्पना पुढे आली. त्यातूनच मग घटिका, तास, पळं किंवा तास, मिनिटं आणि सेकंद वगैरे एककाची निश्चिती करण्यात आली. तरीही एक तास म्हणजे नेमका किती अवधी किंवा एक सेकंद म्हणजे नेमका किती काळ, हे प्रमाणित करणं गरजेचं होतंच. तसं करायचं तर मग वरचेवर चक्राकार रीतीनं होणार्‍या घटनेचा शोध घ्यायला हवा होता. दिवसाचं प्रमाण ठरवताना पृथ्वीचं स्वतःभोवती होणारं चक्राकार परिभ्रमण विचारात घेण्यात आलं होतं. अशीच काही दिवसांत किती तरी वेळा होणारी आवर्तन आहेत काय, यांचा शोध सुरु झाला. अणूंच्या आंतरंगातल्या रचनेचा उलगडा झाल्यानंतर त्यांची रचनाही सौरमालिकेसारखी असल्यांच स्पष्ट झालं. अणुकेंद्राभोवती इलेट्रॉन प्रदक्षिणा घालत असतात, हे दिसून आलं. त्यामुळे मग अणूंमधील आवर्तनांचा विचार होऊ लागला. त्यातूनच हे दिसून आलं, की काही अणू आपल्या निरनिरळ्या ऊर्जापातळींमध्ये सतत वर-खाली जात असतात. एखाद्या नटखट मुलानं एक पायरी चढावं मग एक पायरी उतरावं, परत एक पायी चढावं असा खेळ खेळावा तसे हे अणू एका ऊर्जापातळीतून वरच्या पातळीत उडी घेतात आणि परत खालच्या पातळीत येतात. त्यांची ही आवर्तन अविरत चालू असतात. त्या आवर्तनांवर थंडीवार्‍याचा, हवेच्या दाबाचा कशाचाही परिणाम होत नाही. त्यामुळे मग त्यांचाच आधार सेकंदाचं प्रमाणीकरण करण्यासाठी घेण्यात आला. सीझियम या मूलद्रव्याचे अणू एका सेकंदात ९ अब्ज आवर्तन पुरी करतात आणि त्यात काहीही बदल होत नाही, हे दिसून आल्यानंतर सेकंदाची व्याख्या त्या संदर्भातच करण्यात आली. अचूकपणे बोलायचं तर, सीझियमच्या अणूची ९,१९२,६३१,७७० आवर्तनं पूर्ण होण्यासाठी लागणारा काळ म्हणजे एक सेकंद, हे आता जगभर मान्य झालं आहे.

सुविचार

सौंदर्याचे नाशवंत स्वरूप समजावण्यासाठी विधात्याने जणू फुले निर्माण केली आहेत. : विल्बर फोर्स

प्रेग्नन्सीमध्ये उपयुत नारळपाणी

प्रेग्नन्सीमध्ये उपयुत नारळपाणी
सौंदर्याच्या दृष्टीकोनातून नारळाचे तेल फार उपयुक्त आहे. नारळाचा खोवलेला कीस,
नारळाचे पाणी, दुध, तेल इतकेच काय तर नारळाची कवटी सुद्धा सौंदर्यवृद्धीसाठी फार
महत्त्वाची आहेत. नारळामध्ये विविध प्रकारचे एन्झाइम्स असतात. यात प्रामुख्याने इन्व्हेस्टीन,
ऑसिडेज आणि कॅटॅलेज यांचा समावेश असतो. तसेच ओल्या नारळात तेल, प्रथिने आणि
इतर तत्व असतात.
नारळाच्या पाण्याची एक अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे स्त्री गर्भार राहिल्या नंतर
आठवड्यातून दोन-तीन वेळा नारळाचे पाणी नियमित पिल्यास बाळाची कांती सुधारते आणि
बाळाचा रंग उजळतो, ओले आणि सुके खोबरे शांती देणारे, कामशक्ती वाढवणारे, पोट साफ
होण्यास मदत करणारे, तसेच बद्धकोष्ठाचा नाश हि होतो. त्वचेचे आरोग्य त्यामुळे सुधारते.

डेसिकेटेड कोकोनट बर्फी

डेसिकेटेड कोकोनट बर्फी

साहित्य : पाव किलो डेसिकेटेड
कोकोनट (बाजारी खोबरा कीस), दुधाची
पावडर शंभर ग्रॅम, दीड वाटी साखर, एक
वाटी दूध, चमचाभर तूप, वेलदोडा पूड वा
व्हॅनिला इसेन्स.
कृति : साखरेत एक वाटी दूध घालून
पाक करावा. एकतारी पाक झाल्यावर त्यात
खोबरा कीस घालून ढवळावे. तूप सोडावे.
(हे सगळे नॉनस्टिक कढई किंवा पॅनमध्ये
करावे) व घट्ट होत आले की उतरवून त्यात
दुधाची पावडर घालून खूप घोटावे व तूप
लावलेल्या थाळ्यात ओतून वड्या थापाव्या.
थंड झाल्यावर कापाव्या.

ग्लिसरीनचा वापर

ग्लिसरीनचा वापर
* हाताच्या कोपर्‍यांचा व गुडघ्याचा
काळेपणा दूर करण्यासाठी त्या भागावर
ग्लीसरीन लावावे. कोमट पाण्यात जाडसर
कपडा भिजवून त्याने रगडावे.
* एक टेबलस्पून गुलाबपाणी, दूध
आणि २-३ थेंब लिंबूरस मिस करून
चेहर्‍यावर लावा. चेहरा उजळतो.

वास्तू

घरात सुखशांतीसाठी, बेडरुममध्ये
देवाचे, तसेच धार्मिक चित्र लावू नये. तसेच
स्वयंपाक घरात देवघर नसावे.

हृदयविषयक समस्या

हिरव्या वाटाण्याच्या नियमित सेवनाने
हृदयविषयक समस्या दूर होतात.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

डॉटर : टूथ ब्रश किती दिवसांनी रिटायर केला जातो?
चायनीज व्यती : १ आठवडा
ब्रिटीश व्यती : १ महिना
अमेरिकन व्यती : ३ महिने
भारतीय व्यती : टूथ ब्रश तर कधीच रिटायर होत नाही.
सर्वात आघी दात घासण्यासाठी मग हेअर
कलर करण्यासाठी जेव्हा त्याचे केस
गळतात तेव्हा बरमुड्याला लेस बांधण्याच्या
कामी येतो.

दैनिक पंचांग गुरुवार, दि. ३० मे २०२४

कालाष्टमी, शके १९४६ क्रोधीनाम
संवत्सर, वैशाख कृष्णपक्ष, धनिष्ठा ०७|३१
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६
वा. ३२ मि.

राशिभविष्य

मेष : मित्रांचा सहयोग मिळेल. शुभ वार्ता देखील मिळतील. एखादे कार्य झाल्यामुळे आनंदाचा अनुभव येईल. खाण्या-पिण्यात काळजी घ्या. आजारात खर्चाची शयता. मानसिक सुखशांती मिळेल. आर्थिक नुकसानाची शयता आहे.व्यस्त रहाल.

वृषभ : कामात अडचणी येण्याची शयता आहे. काळजीपूर्वक कार्य करा. मोठ्यांचा आधार मिळाल्याने कार्य पूर्ण होतील. आर्थिक जबाबदार्‍या वाढतील. आत्मविश्वास वाढेल. कामात अडचणी येतील.

मिथुन : वैवाहिक जीवनात स्थिती अनुकूल राहील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मातृपक्षाकडून सहयोग मिळेल. अनिश्चितता वाटेल. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढतील.

कर्क : व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. मित्रांची मदत मिळेल. व्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल.पारिवारिक वैचारिक मतभेद वाढतील.

सिंह : देवाण घेवाणीत त्रास. नियोजित कामात अडचणी येण्याची शयता. कामावर प्रभाव पडेल. अचानक खर्च वाढेल. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता वाटेल. मनोरंजनात वेळ जाईल.

कन्या : मानसिकतेवर लक्ष्य द्या. जास्त सहयोग मिळेल. कार्यकुशलतेचा लाभ मिळेल. प्रलोभनांना भुलू नका. सांगण्यावर विश्वास ठेवू नका. खर्चाची चिंता राहील. अडचणी राहतील. शत्रूंपासून दूर राहा. कसूर नको.

तूळ : पारिवारिक लाभ घ्या. नोकरीत विशेष सावधगिरी बाळगा. विश्वासात राहू नये. अनिश्चिततेचे वातावरण. निराशा वाढेल. कोणतेच काम सुरळीत होणार नाही. वेळ मनोरंजनात व्यतीत होईल.

वृश्चिक : आर्थिक नुकसान संभव. कामात गुप्तता राखा. सहयोग मिळेल. संबंध बिघडतील. अव्यवहारिक कामांपासून लांब
रहा. उत्साह, आत्मविश्वास वाढेल.

धनु : आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त ठेवा. मानसिक संतोष वाढेल. कामात अडचणी येतील. पारिवारिक वाद विकोपास जातील. अडचणी राहतील.

मकर : वैचारिक असंतोष राहील. कामात मन रमणार नाही. तब्बेतीची काळजी घ्या. व्यावसायिक प्रकरणात अडचणी येतील. पारिवारिक वैचारिक मतभेद वाढतील.

कुंभ : आपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिकदृष्टया वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल. नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये. अडचणी येतील.

मीन : सतत परिश्रमाने आर्थिक लाभ होतील. योजनेचे क्रियान्वयन आवश्यक. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर