केसांसाठी उपयुत कढीपत्त्याचा पाला
कढीपत्त्याचा एक गुच्छा घेऊन त्याला स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे आणि सूर्य प्रकाशात
त्या पानांना वाळवून घ्यावे, जेव्हा हे पान वाळून तयार होतील मग याची पूड करून घ्यावी.
आता २०० एम.एल. नारळाचे किंवा ऑलिव्ह ऑईलमध्ये किमान ४ ते ५ चमचे कढी पानांची
पूड मिस करून उकळत ठेवावे. दोन मिनिटांनंतर गॅस बंद करावा. तेलाला गाळून एखाद्या
एअर टाइट बाटलीत भरून ठेवा. झोपण्याअगोदर रोज रात्री हे तेल लावायला पाहिजे. जर हे
तेल थोडे गरम करून लावले तर त्याचे परिणाम लवकरच दिसून येतील. दुसर्या दिवशी सकाळी
डोयाला फक्त नॅचरल ऑपू लावून धुवावे. या ट्रीटमेंटला तुम्ही रोज किंवा एक दिवसाआड करू
शकता. तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल.