वास्तू

दुकानाच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर
व त्याच्याबरोबर मागच्या बाजूला दोन्ही
ठिकाणी गणपतीची मूर्ती ठेवावी. काही
दुकानदारांच्या दुकानात केवळ बाहेरच्या
बाजूला गणपतीची मूर्ती ठेवलेली असते. या
मूर्तीमुळे दुकानात येणार्‍या-जाणार्‍या बाहेरच्या
व्यक्तींना लक्ष्मीचा लाभ होतो. दुकानदाराला
नव्हे. कारण गणपतीची मूर्ती हे अमृताचे,
तर पाठ हे दारिद्य्राचे प्रतीक समजले जाते.
दुकानाच्या बाहेरील बाजूला गणपतीची मूर्ती
लावल्यामुळे गणपतीची पाठ दुकानाकडे होते.
त्यामुळेच लक्ष्मी येण्याच्या वाटेत अडथळे
निर्माण होतात. हे टाळण्यासाठी दुकानाच्या
बाहेरील बाजूच्या मूर्तीबरोबरच मागे आतील
बाजूसही गणपतीचीमूर्ती असावी.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

स्थळ पाहायला मुलीकडचे मुलाकडे आलेले असतात
मुलीकडचे : आपण काय शिकला आहात?
मुलगा : ‘MF IAS’
मुलाकडच्यांनी आपल्याला अशिक्षीत समजू नये म्हणून
मुलीकडच्यांनी मुद्दामच डिग्रीच्या बाबतीत काही विचारले नाही.
लग्न झाल्यावर…मुलीने मुलाला विचारले,
ही ‘MF IAS’ ही डिग्री कशाची आहे.
मुलगा : Matric Fail in All Subject’s

दैनिक पंचांग रविवार, दि. २ जून २०२४

अपरा (स्मार्त) एकादशी, शके १९४६
क्रोधीनामसंवत्सर, वैशाख कृष्णपक्ष, रेवती
२५|४०
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६
वा. ३२ मि.

राशिभविष्य

मेष : आर्थिक नुकसान संभव. कामात गुप्तता राखा. सहयोग मिळेल. संबंध बिघडतील. नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये. शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. व्यर्थ ताण जाणवेल. पारिवारिक वाद वाढतील. खर्च होईल.

वृषभ : आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त ठेवा. मानसिक संतोष वाढेल. कामात अडचणी येतील. योजनेचे क्रियान्वयन आवश्यक. निश्चितेने काम कराल. मन रमणार नाही. विश्वास कमी राहील. अडकलेल्या कामात सुधारणा होईल.

मिथुन : अव्यवहारिक कामांपासून लांब रहा. पारिवारिक वाद विकोपास जातील. मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. पळापळ अधिक राहील. शेयरच्या विषयामध्ये सावधगिरी बाळगताल.

कर्क : वैचारिक असंतोष राहील. कामात मन रमणार नाही. तब्बेतीची काळजी घ्या. पारिवारिक वैचारिक मतभेद वाढतील. कायदेशीर कामात आत्मविश्वास कमी राहील.

सिंह : व्यावसायिक प्रकरणात अडचणी येतील. आर्थिक जबाबदार्‍या वाढतील. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढतील. आपल्या पावलांच्या खुणा दुसर्‍यांना मार्गदर्शक ठरण्याचा संभव आहे.

कन्या : आत्मविश्वास वाढेल. कामात अडचणी येतील. आपली चूक स्वीकारावी लागेल. अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्यांरसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. महत्वाकांक्षा पूर्ण झाल्यामुळे आनंद वाटेल. मनोरंजनावर खर्च होईल. आरोग्य उत्तम राहील.

तूळ : आपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिकदृष्टया वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल. आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानि होऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने दिवस उत्तम व्यतीत होईल.

वृश्चिक : अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता वाटेल. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. गुंतवणूकीतून लाभ होण्याची शयता. आपल्या प्रयत्नाने उन्नति कराल. धनलाभ होईल. वेळ सत्कारणी लागेल.

धनु : अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. खर्चाची चिंता राहील. सांगण्यावर विश्वास ठेवू नका. वरिष्ठांची मर्जी राहील. आपल्या प्रयत्नांमुळे व्यापारात वृद्धि होईल. नवीन कामांना चालना मिळेल. आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील.

मकर : खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील. आपल्या यशाचा मूळ मंत्र कोणत्याच कामाला अशय न समजणे आहे. आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी. आपण कार्याच्या विषयी गुप्त धोरणे राखून यश मिळवू शकाल. नियंत्रण ठेवा. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील.

कुंभ : नोकरीत नुकसानी संभव. कामात पारदर्शकता हवी. वैचारिक धारणेत राहू नका. कामे अपुरी राहतील. नवीन ओळखी संभवतात. आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शयता. अनपेक्षित फायदा करून देणार्यू काही घटना घडतील. सामाजिक यश.

मीन : अडचणी येतील. सतत परिश्रमाने आर्थिक लाभ होतील. कामाला वाव मिळेल. आपले निर्णय, विचार दुसर्यांयवर थोपू नका. वेळेच महत्व समजावून घ्याल. विरोधकांपासून दूर रहा. यश मिळणार नाही. आनंदाची बातमी मिळण्याची शयता आहे. आरोग्य उत्तम राहील.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

किमान तापमान किती असू शकतं?

किमान तापमान किती असू शकतं?

तापमान हे उष्णता मोजण्याचे एक साधन आहे. जेवढी उष्णता जास्त तितके तापमान जास्त असे त्याचे सर्वसाधारण नाते सांगता येईल. पण कोणत्याही पदार्थाची उष्णता ही वास्तविक त्याच्या ठायी असलेल्या गतिज उर्जेवर अवलंबून असते. आता एखादा पदार्थ एका जागी स्थिर असला तर त्याच्या ठायी असलेली गतिज उर्जा किमान असेल, असे आपण म्हणू. तेव्हा अशा स्थिर असलेल्या पदार्थाचे तापमान किमान असायला हवे असे म्हणता येईल. ते तसे खरे असले तरी अर्धसत्य आहे. कारण तो पदार्थ गतिमान नसला तरी तो ज्या अणूंचा बनलेला असतो ते काही एका जागी निपचित पडून राहिलेले नसतात. स्वस्थ नसतात. त्यांच्या अंतर्गत खळबळ चालूच असते. त्यांची आंदोलने चालूच असतात. या आंदोलनापायी त्यांच्या ठायी काही उर्जा असते. या उर्जेचेच मोजमाप त्या पदार्थांच्या तापमानात केले जाते. त्यामुळे एखादा पदार्थ त्याच्या आसपास असलेल्या वातावरणाइतकंच तापमान धारण करून असतो तेव्हा तो स्थिर आहे, असे आपण म्हणतो. कारण त्याच्या अणूंच्या आंदोलनापायी त्याच्या ठायी असलेली ऊर्जा तेवढीच असते; पण जर ती ऊर्जा वाढली, म्हणजेच त्याचे अणू जास्त धसमुसळेपणाने आपली आंदोलने करू लागले तर त्याच्या ठायी असलेली गतिज ऊर्जा वाढते. साहजिकच त्याचे तापमान चढते. ही वाढीव आंदोलने त्या पदार्थाला बाहेरून पुरवलेल्या उष्णतेपायी होणारी असू शकतात.

म्हणून मग तो पदार्थ तापवला, की त्याचे तापमान चढत जाते. उलट दिशेला जर ही आंदोलने कमी होतील, त्यांच्यावर काही निर्बंध येतील अशी परिस्थिती निर्माण केली तर त्याच्या ठायीची अंतर्गत गतिज ऊर्जा कमी होते म्हणजेच त्याचे तापमान घटते. त्याच्या ठायी असलेली ऊर्जा काढून घेण्याची व्यवस्था केली तर त्याचे तापमान कमी होत जाईल. साधारणपणे पदार्थ गोठला की त्याचे तापमान किमान व्हायला हवे, असे आपण म्हणू; पण ते बरोबर नाही. कारण पदार्थ गोठला म्हणजे घन झाला तरी त्याच्या अंतरंगातील अणूंमधली आंदोलनेे पूर्णपणे थांबत नाहीत. ती जेव्हा पूर्णपणे थांबतील तेव्हाच त्याच्या ठायीची गतिज ऊर्जा शून्यवत होईल. त्या वेळीच मग त्याचे तापमान किमान पातळीला पोहोचेल. लॉर्ड केल्विन या वैज्ञानिकाने हे सिद्ध केले होते, की उणे २७३ या तापमानाला अणूंच्या अंतरंगातली आंदोलने संपूर्णपणे थांबतात. त्यांच्या ठायीची अंतर्गत गतिज ऊर्जा शून्यवत होते. त्यामुळे या विश्वातले ते किमान तापमान आहे. त्यालाच शून्य केल्विन किंवा अ‍ॅब्सोल्यूट झीरो असे म्हटले जाते.

सुविचार

फुले म्हणजे हृदयाची मूक वाणी होय. : कवी कालिदास

पोटातील उष्णता कमी करण्यासाठी

पोटातील उष्णता कमी करण्यासाठी
रात्रभर वाळलेले गुलाबाचे फुल पाण्यात भिजवून ठेवावे. सकाळी चुरगळून पाणी गाळून
घ्यावे. यात दोन चमचे साखर मिसळून पिऊन घ्यावे. याने पोटातील उष्णता कमी होते आणि
आराम मिळतो.

कोबी वडा

कोबी वडा

साहित्य : कोबीची ८ पाने, ४
उकडलेले बटाटे, अर्धा कप उकडलेले मटार,
१ लहान चमचा चाट मसाला, १ कप बेसन,
१ चमचा मिरची पूड, अर्धा चमचा सोडा,
१-२ हिरव्या मिरच्या, मीठ चवीनुसार,
तळण्यासाठी तेल.
कृति : कोबीची पाने गरम पाण्यात
उकळून घ्यावीत. बेसनामध्ये मीठ, सोडा,
मिरची पूड टाकून मिश्रण बनवून घ्यावे.
बटाटे कुस्करून त्यात मटार, चाटमसाला,
हिरव्या मिरच्या बारीक चिरून व मीठ टाकावे.
हे मिश्रण उकडलेल्या कोबीच्या पानात टाकून
रोल बनवावेत. हे रोल बेसनात बुडवून गरम
तेलात सोनेरी रंगावर तळावेत.

सौंदर्यलिंबाच्या पावडरचा फेसवॉश

सौंदर्यलिंबाच्या पावडरचा फेसवॉश
* लिंबूच्या सालीत व्हिटॅमिन सी
भरपूर प्रमाणात आढळले जाते. त्याच्या साली
सुकवून त्याची पावडर बनवा. एक चिमूटभर
पावडर फेसपॅकमध्ये घालून ती लावल्यास
त्वचा उजळली जाते.
* केळीच्या गरामध्ये मधाचे काही थेंब
टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांना
लावल्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवून घ्या.
केस चमकदार होतील.

जुन्या कपड्यांची बटने काढताना

जुन्या कपड्यांची बटने काढताना
बटनाखाली कंगवा लावावा व कात्रीने धागे
कापावेत यामुळे कापड फाटणार नाही.

वास्तू

घरात देवांच्या शांत मुद्रेच्या मूर्ती
वा तसबिरीच ठेवाव्यात. देवांचे रागावलेले,
राक्षसांचा वध करतानाचे वा महाभारतातील
युद्धाचे फोटो घरात लावू नयेत.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.