शुभ प्लॉट
* पश्चिम दिशा उंच व ईशान्य-पूर्व
खोल असेल किंवा आग्नेय दिशा उंच व
नैऋत्य-उत्तर दिशेला उतार असेल तर असा
प्लॉट शुभ असतो.
* एखादी श्रीमंत व्यक्ती काही
कारणास्तव स्वतःचे घर विकून दुसरीकडे
चालली असेल, तर राहण्यासाठी किंवा
कारखान्यासाठी असे घर कधीही विकत
घेऊ नये.
हसा आणि शतायुषी व्हा!
भगवानरावांना कडक शब्दात इन्कमटॅस ऑफिसची ‘दुसरी नोटीस’ आली. तीत
ताबडतोब टॅक्स भरायला सांगितला होता. धावपळ करीत भगवानरावांनी ऑफिसम
ध्ये जाऊन टॅक्स भरला आणि ते अधिकार्याला म्हणाले, “माफ करा हं! पहिल्या
नोटीशीकडे माझं दुर्लक्ष झालं.”
अधिकारी : (‘ओ’ ते अधिकारी हसून) आम्ही पहिली अशी नोटीस पाठवतच नाही.
दुसरी नोटीस म्हणून आम्ही नोटीसा काढतो. त्याच जास्त परिणामकारक ठरतात.
दैनिक पंचांग बुधवार, दि. ५ जून २०२४
—, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर,
वैशाख कृष्णपक्ष, कृत्तिका १९|१६
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६
वा. ३२ मि.
मेष : आपल्या कार्यक्षेत्रातील किंवा आपल्या व्यापारातील इतर लोकांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. मानसिक
अस्थिरता जाणवेल. वैवाहिक जीवनात अडचणी येण्याची शयता. खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या.
वृषभ : अधिक श्रम करावे लागतील. पळापळ देखील अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. महत्त्वाचे निर्णय घेताना विचार करावा लागेल. वातावरण अनुकूल राहील. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील. नोकरीत नुकसानी संभव.
मिथुन : एखाद्या मित्राशी झालेली भेट दिलासा देईल. आर्थिक पक्षाबाबत सावध राहा. व्यवसायातील अनेक कामे मार्गी लावू
शकाल. महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. कामात पारदर्शकता हवी. वैचारिक धारणेत राहू नका.
कर्क : कौटुंबिक पाठिंबा देखील मिळणार नाही. वाहने अधिक काळजीपूर्वक चालवा. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल.
आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. मानसिक ताण तणाव जाणवेल.
सिंह : आपणास वरिष्ठ अधिकार्यांकडून समर्थन मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. वाहनखर्च होण्याची शयता आहे. कामे अपुरी राहतील. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढतील.
कन्या : आज आपणास कठोर श्रम करावे लागेल. धार्मिक कार्यांमध्ये खर्च होण्याची शयता आहे. वैवाहिक सौख्य लाभेल. प्रकृतीत सुधारणा होईल पण विशेष लक्ष द्या. आपली चूक स्वीकारावी लागेल. महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील.
तूळ : आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा चांगला नसेल. मानसिक स्थिती आल्हाददायक राहील. प्रतिकूलता जाणवेल. नातेवाईकांपासून सावध रहा. प्रवासाचे योग संभवतात. शत्रू पराजित होईल. व्यापार व्यवसाय सुरळीत राहाणार नाही. आपल्या शत्रूंवर आपला प्रबळ प्रभाव राहील.
वृश्चिक : आरोग्याची काळजी घ्या. व्यस्त राहाल. कौटुंबिक विषयांमध्ये पैसा खर्च होईल. आरोग्य उत्तम राहील. आजचा दिवस हा विशेष कामासाठी अनुकूल असेल. आनंदाची बातमी मिळेल. निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा.
धनु : साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. मानसन्मानाचे योग येतील. व्यापार-व्यवसायात अडचणी येण्याची शयता. विरोधक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक विषयांमध्ये सावध रहा.
मकर : चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. मानसिक स्थिती आनंददायक राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. मानसिक सुख मिळेल. वाद-विवाद शयतो टाळा. आज आपणास अनुकूल वार्ता मिळतील. आरोग्य चांगले राहील.
कुंभ : काळजीपूर्वक कार्य करा. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रगतीकडे वाटचाल कराल. कामामध्ये मन रमणार नाही. आपल्या व्यवसायात काहीतरी चांगले घडून येणार आहे.
मीन : हातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. खर्च अधिक होईल. मनोबल व आत्मविश्वास वाढवणारी एखादी घटना घडेल. तब्येत बिघडू शकते त्याकडे विशेष लक्ष द्या. पैशासंबंधी येणार्या व अडचणी दूर होतील.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर
रक्ताचा रंग लाल का असतो?
रक्ताचा रंग लाल का असतो?
रक्तामध्ये प्लाझ्मा हा द्रवपदार्थ व पेशी असतात. प्लाझ्मामध्ये मुख्यतः त्यात पाणी, विरघळलेले क्षार, प्रथिने असे अनेक घटक असतात. या प्लाझ्मात तरंगणार्या पांढर्या, लाल व रक्तबिंबीका अशा तीन प्रकारच्या पेशी असतात. यातील लाल रक्त पेशींमध्ये हिमोग्लोबीन नावाचा पदार्थ असतो. हिमोग्लोबीनच्या लालसर रंगामुळेच रक्ताचा रंग लाल दिसतो. साहजिकच अॅनेमियामध्ये जेव्हा रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होते, तेव्हा व्यक्ती पांढुरकी दिसते. विशेषतः त्याचे तळहात, जीभ, डोळ्यांतील श्लेष्मल आवरण, नखे फिकट दिसतात. यांवरून अॅनिमियाचे निदान करता येते. हिमोग्लोबीन ऑसीजन व कार्बन डायऑसाइड यांच्याशी परिणामकारकपणे संयोग पावते. या द्रव्याचा उपयोग शरीरभर तयार होणारा कार्बन डायऑसाइड फुफ्फुसापर्यंत पोहोचवणे व फुफ्फुसातील ऑसिजन शरीरभर पोहोचवण्यासाठी वहन म्हणून होतो. वहन करण्यासाठी हिमोग्लोबीनचे रूपांतर ऑसी हिमोग्लोबीन व कार्बोसी हिमोग्लोबीनमध्ये होते. हिमोग्लोबीन या पदार्थामुळेच रक्ताला लाल रंग असतो.
भाजकी चाट
भाजकी चाट
साहित्य : दोन अननस, दोन
सफरचंद, रताळी उकडून, सोलून, किंचित
तळून उकडलेले दोन मोठे, ताशपत्री दोन,
मशरुम दोन, सिमला मिरची (लाल, पिवळी,
हिरवी) २, पेरु २, अनारदाना पावडर १०
ग्रॅम, साखर १० गॅ्रम, बल्सामिक व्हिनेगर १०
मि.ली., शुद्ध व्हिनेगर १०. मि.ली., आमचूर
पावडर २ ग्रॅम, मिरपूड २ गॅ्रम, चाट मसाला
पावडर पाच ग्रॅम, रिफाइंड तेल, भाजकी ओवा
पावडर २ ग्रॅम, दही २० मि.ली., मीठ व काळे
मीठ चवीनुसार
कृती : अनारदाना पावडरमध्ये साखर
मिसळा. त्यामध्ये दही मिसळून फेटून घ्या
आणि सर्व प्रकारचे मसाले मिसळून बाजूला
ठेवा. यानंतर सर्व फळे व भाज्या या मिश्रणात
मिसळून वीस मिनिटे ठेवा. तंदूरमध्ये हे मिश्रण
शिजवून सर्व्ह करा.
होममेड फेसपॅक
होममेड फेसपॅक
मुलतानी माती पावडर, चंदन पावडर,
संत्र्याच्या सालीची पावडर, लिंबांच्या सालीची
पावडर व लिंबू रस समप्रमाणात मिसळून हे
द्रावण एका बाटलीत भरुन ठेवा. जेव्हा याचा
फेसपॅक म्हणून उपयोग करायचा असेल तेव्हा
या बाटलीतील थोडे द्रावण घ्या व त्यात कच्चे
दूध, गुलाबपाणी मिसळून चेहर्यावर लावा.
झाला तुमचा घरगुती फेसपॅक तयार!







