रक्ताचा रंग लाल का असतो?
रक्तामध्ये प्लाझ्मा हा द्रवपदार्थ व पेशी असतात. प्लाझ्मामध्ये मुख्यतः त्यात पाणी, विरघळलेले क्षार, प्रथिने असे अनेक घटक असतात. या प्लाझ्मात तरंगणार्या पांढर्या, लाल व रक्तबिंबीका अशा तीन प्रकारच्या पेशी असतात. यातील लाल रक्त पेशींमध्ये हिमोग्लोबीन नावाचा पदार्थ असतो. हिमोग्लोबीनच्या लालसर रंगामुळेच रक्ताचा रंग लाल दिसतो. साहजिकच अॅनेमियामध्ये जेव्हा रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होते, तेव्हा व्यक्ती पांढुरकी दिसते. विशेषतः त्याचे तळहात, जीभ, डोळ्यांतील श्लेष्मल आवरण, नखे फिकट दिसतात. यांवरून अॅनिमियाचे निदान करता येते. हिमोग्लोबीन ऑसीजन व कार्बन डायऑसाइड यांच्याशी परिणामकारकपणे संयोग पावते. या द्रव्याचा उपयोग शरीरभर तयार होणारा कार्बन डायऑसाइड फुफ्फुसापर्यंत पोहोचवणे व फुफ्फुसातील ऑसिजन शरीरभर पोहोचवण्यासाठी वहन म्हणून होतो. वहन करण्यासाठी हिमोग्लोबीनचे रूपांतर ऑसी हिमोग्लोबीन व कार्बोसी हिमोग्लोबीनमध्ये होते. हिमोग्लोबीन या पदार्थामुळेच रक्ताला लाल रंग असतो.