बाजरी भात

बाजरी भात

साहित्य : २ वाटी बाजरी, २ मोठे
चमचे साजूक तूप, जिरे, हिंग, ओवा आणि
मीठ.
कृति : बाजरी धुवून ३० मिनिटे
पाण्यात भिजत ठेवावी. कुकरमध्ये तूप
तापवून त्यात हिंग, जिरे आणि ओवा टाकावा.
बाजरी पाण्यातून काढून कुकरमध्ये टाकून
चांगली खमंग परतावी. नंतर त्यात मीठ आणि
साडेतीन वाटी गरम पाणी टाकावे. कुकर
बंद करून वाफ येऊ द्यावी. दोन शिट्ट्या
घेऊन गॅस बंद करावा. कुकरमधली वाफ
संपूर्ण जिरल्यावरच कुकर उघडावा. वरून
बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ही खिचडी
दह्याबरोबर खाण्यास द्यावी.

वास्तू

मुख्य दरवाजासाठी
* मुख्य दरवाजानुसार विजेचा
किंवा सिमेंटचा खांब असणेही अशुभ आहे.
मुख्य दरवाजासमोर तुळस लावावी. मुख्य
दरवाजासमोर दररोज स्वस्तिकची रांगोळी
काढावी.
* दरवाजाच्या वाटेमध्ये अवजड वस्तू
वा अडथळा असू नये. दरवाजाची वाट
मोकळी असावी. दरवाजाशी टाकाऊ वस्तूंचे
ढीग किंवा कचर्‍याचे डबे किंवा कचरा असू
नये.

फ्रिजमध्ये कणीक मळून ठेवली असेल तर

जर फ्रिजमध्ये अगोदरच कणीक मळून
ठेवली असेल तर ती चपात्या करण्याच्या दहा
पंधरा मिनिटे अगोदरच बाहेर काढून ठेवावी.

मुरुम पुटकुळ्या

दूध, साय व मध एकत्र करून रात्री
झोपताना त्याचा लेप चेहर्‍यावर लावावा.
दुसर्‍या दिवशी सकाळी कोमट पाण्याने चेहरा
धुतला की, त्वचा नरम पडते. आर्द्रता वाढते.
रखरखीतपणा नाहीसा होतो. यामुळे मुरुम
पुटकुळ्याही नष्ट होतात.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

हसा आणि शतायुषी व्हा!

बंता : काल मला १० जणांनी खूप मारला
संता : मग तू काय केलस?
बंता : मी म्हटलं, साल्यांनो दम असेल तर एक एक जण या
संता : मग?
बंता : मग काय, साल्यांनी एकेकाने येवून परत मारलं

दैनिक पंचांग गुरुवार, दि. ६ जून २०२४

दर्श-भावुका अमावास्या, शनैश्वर
जयंती, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर, वैशाख
कृष्णपक्ष, रोहिणी २०|१७
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६
वा. ३२ मि.

राशिभविष्य

मेष : आजचा दिवस आपल्यासाठी नवी सुरुवात करण्यास किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय ठरावण्यास साहाय्यक ठरेल.

वृषभ : आपण जीवनात हव्या असलेल्या वस्तूंवर लक्ष द्या व पूर्ण विश्वासाने त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न कराल.

मिथुन : आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळताल.

कर्क : आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोन असेल. आजचा दिवस व्यापार क्षेत्रातील चांगली बातमी आणेल.

सिंह : प्रेमीजनांसाठी आजचा दिवस आनंदाने परिपूर्ण असेल. कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा.

कन्या : इतर लोकांबरोबर काही विषयांवर संमती द्यावी लागू शकते. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील.

तूळ : नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. दिवास्वप्न खरी ठरतील.

वृश्चिक : पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल. इतर लोकांना आपल्या स्वतःची गरज व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ असेल. कलाक्षेत्रातील लोकांना अनुकूल परिस्थिती मिळेल.

धनु : आपल्या जुन्या लोकांना किंवा आधार देणार्‍या मित्रांना जोडणे या वेळी आपल्यासाठी फलदायी आहे. मनातल्या इच्छा पूर्ण होतील.

मकर : आपल्या सहकार्यांबरोबर झालेल्या मतभेदांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा. लोकांमध्ये मतभेद आणि अनोळखी लोकांचा विरोध आपणास अस्वस्थ करू शकते.

कुंभ : आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रू पराभूत होतील. नवे वाहन मिळण्याची शयता आहे.

मीन : व्यापार व्यवसायात वेळ साधारण राहील. देवाण-घेवाण टाळा. मित्रांचा लाभ मिळेल. मानसन्मान होईल.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

चव कशी समजते?

चव कशी समजते?

एखादा पदार्थ जिभेवर ठेवला रे ठेवला की तात्काळ त्याची चव आपल्याला समजते. पण आपण ज्याला चव म्हणतो त्यात चवीची जाणीव मेंदूपर्यंत पोहोचवणार्‍या स्वादांकुरात उष्णता, स्पर्श व वासाचे ज्ञान या सर्वांचा समावेश होतो. लोरोफॉर्मचा गोडसर वास हा प्रामुख्याने स्वादांकुर उत्तेजित झाल्यामुळेच येतो. सर्दी झाल्यावर अन्न बेचव लागते. वासाचे ज्ञान होत नसल्यामुळेच नाक दाबल्यास उकडलेला कांदा व सफरचंद यांची चव जवळपास सारखीच लागते. चवीमध्ये आपल्याला जाणवणारे सूक्ष्म फरक हे बर्‍याचदा या गोष्टींच्या वेगळ्या अशा वासामुळे असतात. अशी ही चव आपल्याला मुख्यतः जिभेवरील स्वादांकुरामुळे कळते. माणसाच्या जिभेवर सुमारे १०,००० स्वादांकुर असतात. गोड, आंबट, खारट व कडू या चाल मूळ चवी आहेत. जिभेच्या टोकाला गोड चव, पाठीमागे कडू, तर दोन्ही कडांना आंबट चव जास्त प्रमाणात जाणवते.

खारट चव सर्व ठिकाणी समप्रमाणात, पण जिभेच्या टोकाला सर्वाधिक जाणवते. चव कळण्यासाठी पदार्थ लाळेत विरघळावा लागतो. विरघळलेले रेणू स्वादांकुरात शिरल्यावरच चव समजते. काच, स्टेनलेस स्टील, चांदी, सोने यांची चव ते विरघळत नसल्याने आपणास कळत नाही ते त्यामुळेच! तसेच ‘तिखट’ ही चव नाही! तर तिखट वस्तूंमधील आम्लामुळे होणारा तो एक ‘दाह’ म्हणता येईल. चवीच्या संदेशाचे वहन स्वादांकुरातून चेतातंतूंमार्फत मेंदूतील चवीच्या केंद्रापर्यंत होते तेव्हा चव समजते.

सुविचार

फुलांना सुंदर व मधुर बनवण्यात विधाता इतका तल्लीन होऊन गेला की, तो फुलांना वाचा देण्याचेच विसरून गेला. : एच. बीयर

औषधी कढीपत्ता

औषधी कढीपत्ता
भारतीय स्वयंपाकामध्ये कढीपत्त्याचे
स्थान महत्त्वाचे आहे. आपल्या आहारातील एक
अविभाज्य भाग असलेला कढीपत्ता औषधीही
आहे. आहाराची चव वाढविणार्‍या कढीपत्त्याचे
दुहेरी उपयोग आहेत. आहारात विशिष्ट
चवीसाठी कढीपत्ता वापरला जातो. प्रत्यक्षात
त्यामधील तेलामुळे जिभेवरील चवीची संवेदना
वाढते. कढीपत्ता पचनालाही चांगली मदत
करतो. जेवल्यावर अस्वस्थ वाटत असल्यास,
पोटात वायू होत असल्यास कढीपत्याची दहा
पाने चटणी करून त्यामध्ये सैंधव मीठ घालून
खावे. कढीपत्ता जुलाबावरही उपयुक्त आहे.
काढीपत्याच्या ताज्या पानांचा अर्धा कप रस
नियमित घेतल्यास पोटातील वेदना, जुलाब
कमी होतात. कढीपत्ता तारुण्य टिकविणारा
आहे. नियमित कढीपत्ता खाल्ल्यास वृद्धत्व
लांबते. मधुमेही रुग्णांसाठीही कढीपत्ता अत्यंत
उपयुक्त आहे. मधुमेहींनी कढीपत्त्याची दहा
बारा कच्ची पाने दिवसातून तीन वेळा चावून
खावीत. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण
नियंत्रित राहण्यास मदत होते. सर्दी, खोकला
होत असल्यास अनाशापोटी कढीपत्याची १५
पाने चावून खावीत. यकृताच्या आजारातही
कढीपत्ता उपयोगी आहे. कोणत्याही प्रकारच्या
काविळीवर कढीपत्त्याचे सेवन फायदेशीर
ठरते.

मोडाच्या मुगाचा पुलाव

मोडाच्या मुगाचा पुलाव

साहित्य : १ कप बिगर पॉलीश
तांदूळ, दोन तमालपत्र, अर्धा-चमचा जिरे,
एक तुकडा दालचिनी, दोन लवंगा, एक चमचा
तेल, चवीनुसार मीठ, दीड कप मोड आलेले
मूग, एक कांदा (चिरून), दोन कप पालक
(चिरून), एक हिरवी मिरची (चिरून), एक
चमचा तेल, मीठ चवीनुसार.
कृती : भातासाठी तेल तापवून
त्यामध्ये तमालपत्र, जिरे, दालचिनी व लवंग
थोडा वेळ गरम करा. धुतलेले तांदूळ व मीठ
मिसळून २-३ मिनिटे फ्राय करा.
दोन कप पाणी टाकून झाकून शिजवा.
मुगासाठी तेल तापवून त्यामध्ये कांदा व
हिरव्या मिरच्या दोन मिनिटे परता. मूग मिसळून
२-३ मिनिटे शिजवा नंतर पालक मिसळून
एक मिनिटे शिजवा. त्यामध्ये शिजलेला भात
मिसळून व्यवस्थित मिसळा व गरमागरम सर्व्ह
करा.