बटाट्याच्या भाजीत रस्सा जास्त झाला तर

बटाट्याच्या भाजीत रस्सा जास्त झाला
असेल तर ती भाजी अधिक घट्ट बनवण्यासाठी
त्यात उकडलेला बटाटा कुस्करुन टाका व
वरुन थोडेसे मीठ मिसळा. चवीसाठी चाट
मसालाही मिसळू शकता.

वास्तू

दागिन्यांच्या दुकानासाठी गुलाबी,
पांढरा, क्रीम, पिवळा रंग शुभ आहे.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

हसा आणि शतायुषी व्हा!

तंबाखू मळण्याच्या घर्षणातून जर
विजनिर्मिती करता आली असती
तर…
आपला देश…विज निर्मितीत
एक नंबर झाला असता

दैनिक पंचांग मंगळवार, दि. ४ जून २०२४

भौमप्रदोष, शिवरात्रि, शके १९४६
क्रोधीनामसंवत्सर, वैशाख कृष्णपक्ष, भरणी
२२|३५
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६
वा. ३२ मि.

राशिभविष्य

मेष : अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. इतरांवर चुकीचा प्रभाव पडू शकतो.

वृषभ : कौटुंबिक विषयांमध्ये आपणास समर्थन मिळेल पण एखाद्याला जामीन देणे टाळा. महत्वपूर्ण कार्यात यश मिळेल. पोरकटपणा करणे टाळा.

मिथुन : आर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवा.
आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील.

कर्क : व्यवसायात प्रगती कराल. स्थिती अनुकूल राहील. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. काही नवीन संधी मिळतील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंना मात द्याल.

सिंह : वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न कराल. वाहने काळजीपूर्वक चालवा. भावनाशील असल्यामुळे नुकसान होणे शय आहे. शांत राहाण्याचा प्रयत्न करा.

कन्या : मनावर नियंत्रण ठेवाल. पैशाच्या बाबतीत आपली नड भागेल. एखाद्या विशिष्ट योजनेला हातावेगळे करण्यात वेळ जाईल. नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा.

तूळ : कार्यक्षेत्रात वेगाने कार्य करा पण घाई करू नका. बेपर्वाईने कार्य करू नका. वेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आपले धाडस वाढेल. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील.

वृश्चिक : कुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या गरजा समजण्यात मदत मिळेल. आरोग्य उत्तम राहील. जोखिम असलेल्या कार्यांमध्ये गुंतवणूक करू नये. आपली प्रसिद्धी वाढण्याची शयता आहे.

धनु : कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शयता आहे. आपल्या इच्छेवर आणि मनस्थितीवर संयम ठेवा. शत्रू पराभूत होतील. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल.

मकर : व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. आर्थिक पक्षाबाबत सावध राहा. मातृपक्षाकडून प्रसन्नता राहील. हुशारीने
गुंतवलेले धन आपणास ध्येयाजवळ घेऊन जाईल.

कुंभ : काही प्रेमपूर्ण अनुभव आज येऊ शकतात. हा वेळ आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू शकता. घरातील वातावरण आनंददायी राहील. कौटुंबिक सदस्यांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि मित्रांकडून पाठबळ मिळेल.

मीन : आपल्या सर्जनशील व कलात्मक वैशिष्ट्यांना प्रेरणा मिळेल. अधिकार क्षेत्रात वाढ होईल. आरोग्य मध्यम राहील. राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील. व्यापार व प्रणयाच्या क्षेत्रात यश मिळेल.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

पहिला चष्मा कुठं वापरला गेला?

पहिला चष्मा कुठं वापरला गेला?

जगरहाटी आमूलाग्र बदलून टाकणारा शोध कोणता असा प्रश्न विचारला गेला, तर आपल्याला अग्नि, चाक, मुद्रणयंत्र आणि अर्थातच पर्सनल कॉम्प्युटर किंवा सेलफोन यांची आठवण होईल. ती तशी चुकीचीही असणार नाही. पण अतिपरिचयादवज्ञा म्हणतात त्याची प्रचिती म्हणूनच की काय आपल्याला साध्यासुध्या चष्म्यांची आठवण येणार नाही. पण विचार करा चष्म्याचा शोध लागला नसता तर किती जणांची आयुष्यं उद्ध्वस्त झाली असती. मोटार किंवा असंच दुसरं कोणतंही वाहतुकीचं साधन चालवणं तर सोडाच पण साधं रस्त्यावरून चालणंही मुश्कील झालं असतं. कशाचंही वाचन करणं अशय होऊन बसलं असतं आणि ते सर्व सोडून नुसता टीव्ही बघायला म्हटलं तरी तेही साध्य झालं नसतं. तरीही या अतिशय उपयुक्त साधनाचा शोध कुठं आणि कधी लागला, याविषयी छातीठोकपणे काहीही सांगता येणे शय नाही. तसा काचेचा शोध चार हजार वर्षांपूर्वीच लागला होता. पण त्या काचेपासून घासून घासून भिंग बनवता येतात याचा पत्ता मानवाला लागला नव्हता. तो लागला तेव्हाही त्यातून वस्तूची प्रतिमा वृद्धिंगत करणार्‍या मॅग्निफाइंग ग्लास तयार केल्या गेल्या. त्यांनाच मग वेगवेगळ्या मखरांमध्ये बसवून त्याच्यापासून हातात धरून वस्तू पाहण्यासाठीची साधनं बनवली गेली. पण त्यांना चष्मा म्हणता येणार नाही. कारण एक तर ते साधन हातात धरून एखादी वस्तू न्याहाळता येत असे. पण ते सतत डोळ्यांसमोर धरून वाटेवरून चालणं किंवा वाचन करणं शय नव्हतं.

पुढं क्वार्ट्झ  या निसर्गात मिळणार्‍या पदार्थापासून भिंग तयार करता येतात याचा शोध लागल्यावर चष्मा बनवायला सुरुवात झाली. असे पहिले इटलीमध्ये १२६८ ते १२८९ या काळात तयार केल्याचा पुरावा मिळाला आहे. डॉमिनिकन धर्मगुरू जोर्दानो द पिस्का याने २३ फेब्रुवारी १३०६ या दिवशी दिलेल्या प्रवचनामध्ये आपली दृष्टी सुधारणार्‍या या चष्म्याचा वापर सुरू होऊन वीस वर्षही उलटली नाहीत, असं स्पष्टपणे म्हटलं होतं. ही भिंगं जनावरांची हाडं, कातडी किंवा धातू यापासून तयार केलेल्या फ्रेममध्ये बसवली जात. अशा प्रकारचे चष्मे अर्थात नाकावर एका घट्ट बसणार्‍या चापानं बसवले जात. हे सोईचं नव्हतं आणि काही वेळ गेल्यानंतर नाकाचा तो भाग दुखायला लागे. पण त्या फ्रेमला काड्या जोडून त्या कानांवर ठेवल्या तर चष्मा कोणतीही वेदना न जाणवता दीर्घ काळ वापरता येऊ शकतो, याचा शोध लागायला आणखी चारशे वर्षं लोटावी लागली. आज वापरले जातात तशा प्रकारचे चष्मेही युरोपातच, इटली व फ्रान्स इथं प्रथम तयार केले गेले. यापुढचं महत्त्वाचं पाऊल उचललं गेलं ते अमेरिकेत. तिथं बेन्जामिन फ्रॅन्कलिन याला दूरवरचं पाहण्यासाठी आणि वाचण्यासाठी अशा दोन चष्म्यांचा वापर करावा लागत असे. वारंवार त्यांची अदलाबदल करायला तो कंटाळला. तेव्हा त्यानं त्या दोन्ही चष्म्यांच्या काचा अर्ध्यावर कापून एकमेकींना जोडून टाकल्या. अशा रीतीनं पहिला बायफोकल चष्मा अस्तित्त्वात आला.

सुविचार

फुले म्हणजे देवाचा मुकुट आहे. : मिल्टन

सकाळी उठून पाणी पिणे लाभदायी

सकाळी उठून पाणी पिणे लाभदायी
सकाळी उठून पाणी प्यायल्याने शरीरातील टॉसिन्स निघतात. रोज ६-८ ग्लास पाणी
घेणे किडनी आणि स्किनसाठी चांगले असते. त्याचप्रमाणे शयतो गरम पाणी पिल्यास पोटातील
जंतूंचा नायनाट होतो. पोट साफ राहते.

पनीरचे गुलाबजाम

पनीरचे गुलाबजाम

साहित्य : शंभर ग्रॅम पनीर (दोन कप
दुधात अर्धा लिंबू पिळून शंभर ग्रॅम पनीर
होतं) दोनशे ग्रॅम खवा, एक वाटी मैदा, अर्धा
चमचा खायचा सोडा, दोन चमचे बारीक रवा,
चमचाभर तूप, पाच चमचे (पाव वाटीपेक्षाही
थोडी जास्त) पिठीसाखर, तळायला रिफाईंड
तेल.
पाकासाठी – तीन वाट्या साखर, दीड
वाटी पाणी, अर्धा चमचा वेलदोडा पूड.
कृति : पनीर व खवा किसून घ्यावा.
त्यातच तूप, सोडा, पिठीसाखर, मैदा हे सर्व
घालावं. खूप मळून मऊ करावं. मग लहान
लहान गोळे करून मंद आचेवर तळावे.
पाक – साखरेत पाणी घालून उकळी
येऊ द्यावी. उकळी आल्यावर गॅस बारीक
करून पाच मिनिटं पाक उकळू द्यावा व मग
त्यात वेलदोडा पूड घालून त्यात गुलाबजाम
सोडावे व मुरू द्यावे.

मृदू त्वचेसाठी

मृदू त्वचेसाठी

अर्धा चिरलेल्या लिंबाच्या फोडीत थोडी
पिठीसाखर पसरा. हाताचे कोपरे, गुडघ्यांच्या
वाट्या व घोट्याच्या उंचवट्यावर घासा. खांदे
आणि मान यांनाही हे मिश्रण लावा. यामुळे
तेथील निब्बर त्वचा मृदू होईल.

भात शिजवताना

* तांदूळ शिजवताना पाण्यात थोडा
लिंबाचा रस आणि मीठ घालावे. यामुळे भात
पांढराशुभ्र होतो आणि चवीलाही चांगला
लागतो.
* चायनीज फ्राइड राईस वगैरेसाठी
भात शिजवताना तुपाऐवजी रिफाईन्ड तेल
वापरावं.