भाजकी चाट
साहित्य : दोन अननस, दोन
सफरचंद, रताळी उकडून, सोलून, किंचित
तळून उकडलेले दोन मोठे, ताशपत्री दोन,
मशरुम दोन, सिमला मिरची (लाल, पिवळी,
हिरवी) २, पेरु २, अनारदाना पावडर १०
ग्रॅम, साखर १० गॅ्रम, बल्सामिक व्हिनेगर १०
मि.ली., शुद्ध व्हिनेगर १०. मि.ली., आमचूर
पावडर २ ग्रॅम, मिरपूड २ गॅ्रम, चाट मसाला
पावडर पाच ग्रॅम, रिफाइंड तेल, भाजकी ओवा
पावडर २ ग्रॅम, दही २० मि.ली., मीठ व काळे
मीठ चवीनुसार
कृती : अनारदाना पावडरमध्ये साखर
मिसळा. त्यामध्ये दही मिसळून फेटून घ्या
आणि सर्व प्रकारचे मसाले मिसळून बाजूला
ठेवा. यानंतर सर्व फळे व भाज्या या मिश्रणात
मिसळून वीस मिनिटे ठेवा. तंदूरमध्ये हे मिश्रण
शिजवून सर्व्ह करा.