औषधी कढीपत्ता

0
36

औषधी कढीपत्ता
भारतीय स्वयंपाकामध्ये कढीपत्त्याचे
स्थान महत्त्वाचे आहे. आपल्या आहारातील एक
अविभाज्य भाग असलेला कढीपत्ता औषधीही
आहे. आहाराची चव वाढविणार्‍या कढीपत्त्याचे
दुहेरी उपयोग आहेत. आहारात विशिष्ट
चवीसाठी कढीपत्ता वापरला जातो. प्रत्यक्षात
त्यामधील तेलामुळे जिभेवरील चवीची संवेदना
वाढते. कढीपत्ता पचनालाही चांगली मदत
करतो. जेवल्यावर अस्वस्थ वाटत असल्यास,
पोटात वायू होत असल्यास कढीपत्याची दहा
पाने चटणी करून त्यामध्ये सैंधव मीठ घालून
खावे. कढीपत्ता जुलाबावरही उपयुक्त आहे.
काढीपत्याच्या ताज्या पानांचा अर्धा कप रस
नियमित घेतल्यास पोटातील वेदना, जुलाब
कमी होतात. कढीपत्ता तारुण्य टिकविणारा
आहे. नियमित कढीपत्ता खाल्ल्यास वृद्धत्व
लांबते. मधुमेही रुग्णांसाठीही कढीपत्ता अत्यंत
उपयुक्त आहे. मधुमेहींनी कढीपत्त्याची दहा
बारा कच्ची पाने दिवसातून तीन वेळा चावून
खावीत. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण
नियंत्रित राहण्यास मदत होते. सर्दी, खोकला
होत असल्यास अनाशापोटी कढीपत्याची १५
पाने चावून खावीत. यकृताच्या आजारातही
कढीपत्ता उपयोगी आहे. कोणत्याही प्रकारच्या
काविळीवर कढीपत्त्याचे सेवन फायदेशीर
ठरते.