वास्तू


शुभ प्लॉट
पश्चिम दिशा उंच व ईशान्य-पूर्व खोल
असेल किंवा आग्नेय दिशा उंच व नैऋत्य
उत्तर दिशेला उतार असेल तर असा प्लॉट
शुभ असतो.

खोकला येत असल्यास

खोकला येत असल्यास मिरी, सुंठ,
पिंपळी यांचे चूर्ण मधातून द्यावे.

चेहर्‍यावरील डाग

* बदाम, गुलाबाची फुले, चारोळी
व उगाळलेले जायफळ रात्री दुधात भिजवा.
सकाळी वाटून त्याचे उटणे बनवा. यामुळे
चेहर्‍यावरील डाग नाहीसे होतील.
* डोयावरील सर्व केस पुढे पाडून
विंचरा, डोके डावीकडे झुकवून केस डावीकडे
पाडून व उजवीकडे डोके करून केस
उजवीकडे पाडून विंचरावेत. यामुळे केसांची
मुळे बळकट होऊन केस चमकदार व निकोप
होतात.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

धर्मगुरू आपल्या श्रोत्यांना
‘पापापासून दूर रहा’ या विषयावर व्याख्यान देत होते.
‘तुम्ही पाप केलेत तर तुमच्यावर देवाचा कोप होईल. इतक्या
यातना होतील की दात एकमेकांवर घट्ट आवळून धरावे
लागतील. यावर कुणाला काही विचारायचं आहे?’
श्रोत्यातील एक स्त्री उभी राहिली आणि म्हणाली,
‘पण गुरुमहाराज मला तर अजिबात दात नाहीत.’
‘त्यावेळी तुम्हाला कवळी देण्यात येईल.’ धर्मगुरु म्हणाले.

दैनिक पंचांग शुक्रवार, दि. १४ जून २०२४

दुर्गाष्टमी, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर,
ज्येष्ठ शुलपक्ष, उत्तरा अहोरात्र
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६
वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष : काही विशेष करण्याचा प्रयत्न करा. आपणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल. संततीसौख्य लाभेल. मनोरंजनासाठी काही
प्लॅन कराल. व्यापार-व्यवसायिकांना दिवस संमिश्र.

वृषभ : पळापळ देखील अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. धनाचा व्यय होईल. मागील बाकी व उधारी वसुल होईल. मनाला प्रसन्नता वाटेल. वैवाहिक जीवनात सुख मिळेल.

मिथुन : कार्यात अडचणी येण्याची शयता आहे. आरोग्याची काळजी घ्या. जुन्या मित्रांची भेट होईल. कार्यक्षेत्राचा विकास आणि विस्तार होईल. पाठबळ मिळेल. वित्तीय कामात अनुसंधान योग.

कर्क : सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर सन्मान वाढेल. आपणास समाधानकारक स्थिती मिळेल. अधिकारांचा योग्य वापर करा. स्पर्धा, पैजा जिंकू शकाल. लाभ होईल.

सिंह : आरोग्याच्या दृष्टीने ही वेळ उत्तम आहे. इच्छित कार्य पूर्ण होतील. उधारी उसनवारी मिळेल. व्यापार उत्तम चालेल. मुलांच्या तब्बेतीची काळजी दूर होईल.

कन्या : जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू हळू सुधार होईल. मागील उधारी उसनवारी मिळेल. मित्रांच्या सहाय्याने अनुकूलता वाढेल एवं दिवस उत्तम जाईल.

तूळ : परिस्थिती अनुकूल राहील याची काळजी घ्या. आरोग्य उत्तम राहिल. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. जुनी कामे झाल्यामुळे उत्साह आणि प्रसन्नता वाटेल. महत्वपूर्ण कार्यांवर व्यय होईल. आर्थिक लाभ मिळू शकेल.

वृश्चिक : चांगले प्रदर्शन करण्यास अडचणी येतील. निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष देऊ नका. मनस्थिती उत्तम राहिल. निवेश प्रत्याशित. मांगलिक, धार्मिक कामात अडथळा.

धनु : कौटुंबिक जीवन उत्तम असेल आणि घरातील मंडळी फारच आनंदात राहणार आहे. मागील येणी वसुल होईल. लाभ प्राप्तिचा योग. व्यापारातील आर्थिक त्रासाला संयमाने सोडवण्याचा प्रयत्न करा. कर्जा पासून मुक्ति मिळेल. व्यापारिक लाभ आणि सुख-समृद्धि वाढेल.

मकर : भावनांच्या भरात वाहून नुकसान होण्याची शयता आहे. आर्थिक विषयांमध्ये स्थिती सहयोगात्मक राहील. बिघडलेले संबंध सुधारतील. मुलांची उन्नति प्रसन्नता देईल. आधी केलेल्या कामाचे फळ मिळेल.

कुंभ : सहकार्‍यांशी होणारे वैचारिक मतभेद टाळा. आपणास नवीन संधी मिळण्याची शयता आहे. आपली मनमेळाऊ आणि धैर्याची प्रकृतिने समाजात व परिवारात आदर मिळेल. सामाजिक मान-सन्मान वाढेल.

मीन : ग्रहदशेत एक महत्त्वपूर्ण बदल झाल्याने स्त्री पक्षाकडून लाभ मिळेल. प्रगतिवर्धक बातम्या मिळतील. सामाजिक कामात सक्रिय सहयोग मिळेल. मुलांचा भाग्योदय होईल.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

‘तोंड येते’ म्हणजे काय?

‘तोंड येते’ म्हणजे काय?

बर्‍याचदा आपण अनुभवले असेल की, एखाद्या आजारानंतर (जसे ताप येणे, पोटांचे आजार, हगवण, आमांश इ.) तोंड येते. यावेळेस जीभ लाल होते, कधीकधी फोड येतात. जिभेस, तोंडाच्या आतील त्वचेला तिखट लागू देत नाही. कधी कधी तर कुठलाही स्पर्श या फोडांना सहन होत नाही. हे तोंड येणे म्हणजे जिभेचा दाह होणे होय. जीभ किंवा तोंडाच्या आतील त्वचेचे बळ कमी झाल्याने त्या त्वचेला दाह होतो. याचे मुख्य कारण म्हणजे ‘ब’ जीवनसत्त्वाचा अभाव होय. एखाद्या आजारपणानंतर जीवनसत्त्वाचा अभाव होऊन तोंड येते. तसेच सतत चहा पिणे; तंबाखू, पानमसाला, विडी, सिगारेट यांचे अतिसेवन; पानमसाला, तंबाखू, सुपारी तोंडात ठेवून चघळत राहणे; यांमुळेही तोंड येते. आमांश, जंत, आतड्यांच्या आजारात आतड्यातून अन्नाचे शोषण योग्य न झाल्याने देखील ‘ब’ जीवनसत्त्वाचा अभाव निर्माण होऊन तोंड येते.

बद्धकोष्ठाचा त्रास असणार्‍या व्यक्तींमध्येही वारंवार तोंड येते. तोंडात, जिभेवर असे वारंवार फोड येणे; पांढरे चट्टे पडणे, हे पांढरे चट्टे तसेच राहणे, अशी लक्षणे असतील तर त्या ठिकाणी पुढे कॅन्सर होण्याची शयता असते. पान, तंबाखू, सुपारी चघळणार्‍या व्यक्तींमध्ये विशेषतः असे होण्याची शयता असते. वरील अनेक कारणांपैकी कुठल्या कारणांमुळे तोंड येते आहे ते पाहून उपाययोजना करतात. या चिकित्सेमध्ये ‘ब’ जीवनसत्त्वाच्या गोळ्या; जंत, आमांश यावर उपचार आणि तंबाखू, सुपारी चघळणे, अतिशय तिखट-मसालेदार अन्न या घातक सवयींपासून दूर राहणे अशा गोष्टींचा उपायांमध्ये समावेश होतो. आयुर्वेदामध्ये तोंड आल्यावर जाईची पाने चघळणे असा एक उपाय सांगितला आहे. ही पाने स्वच्छ धुऊन थोडीथोडी चावत, चघळावीत व याचा रस जीभ, गालाच्या आतील भागात लागेल असे चघळावे. हा रस गिळला तरी चालते.

सुविचार

विधाता मोठमोठ्या साम्राज्यांपासून विन्मुख होऊ शकतो; पण इवल्याशा फुलांपासून त्याला विन्मुख होता येत नाही.

गुडघेदुखीवर घरगुती उपाय

गुडघेदुखीवर घरगुती उपाय
जवस : रोज जेवण झाल्यावर
बडीशेपऐवजी जवस खा. जवस खाल्ल्याने
शरीरात नवऊर्जा निर्माण होते आणि
गुडघेदुखीचा त्रासही काही प्रमाणात कमी
होतो.
पांढरे तीळ : पांढरे तीळ खाल्ल्याने
हाडे मजबूत होतात. त्यामुळे आपल्याला
कंबरदुखी, गुडघेदुखीचा त्रास कमी होतो.

खव्याच्या मिठाईचे आईस्क्रीम

खव्याच्या मिठाईचे आईस्क्रीम

साहित्य – उरलेली खव्याची मिठाई
अर्धा किलो, दूध एक लिटर, साखर चवीनुसार,
२ वेलदोड्यांची पूड.
कृति – दूध तापवत ठेवा. ते जेव्हा
कोमटसर तापेल तेव्हा त्यातून एक वाटी
दूध काढून घ्या. काढलेल्या दुधात मिठाई व
वेलची पूड मिसळून मिसरमध्ये व्यवस्थित
फेटून घ्या. हे मिश्रण उरलेल्या दुधात टाकून
एक उकळी द्या.
नंतर त्यात साखर मिसळून ती
विरघळू द्या. थंड झाल्यानंतर साच्यात ओतून
फ्रिजरमध्ये गोठण्यासाठी ठेवा. व्यवस्थित
गोठल्यानंतर बाहेर काढा. स्वादिष्ट आईस्क्रीम
तयार असेल.

मानेच्या स्वच्छतेसाठी

मानेच्या स्वच्छतेसाठी
मानेचा मागचा भाग हा काळा पडतो.
तो काळेपणा घालविण्यासाठी स्नान करताना
आंबट दही चोळावे. काही दिवसातच काळेपणा
कमी होईल.