—, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर,
ज्येष्ठ शुलपक्ष, पूर्वा २९|०९
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६
वा. २८ मि.
राशिभविष्य
मेष : मैदानी खेळात सहभागी व्हाल. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. अचानक जुने मित्र भेटतील. कुटुंबातील सदस्यांबरोबर किंवा मित्रांबरोबर आनंदाचे क्षण अनुभवाल. आज आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील.
वृषभ : स्पर्धात्मक परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा.
मिथुन : जोडीदाराला समजावून घ्याल. तुमचे व्यक्तिमत्त्व आज बहरेल. सहनशीलतेने कार्यरत राहाल. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. प्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे.
कर्क : मानसिक ताण शय. कठोर बोलणे वा सहकार्यांशी गैरवर्तणूक महागात पडेल. आरोग्य नरम-गरम राहील. प्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील.
सिंह : प्रिय व्यक्तीविषयी शंका घेऊ नका. आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील. शत्रू पराभूत होतील. संभाषणात सावधगिरी बाळगा.
कन्या : आर्थिक गुंतवणुकीतून योग्य तो मोबदला मिळेल. नात्यामध्ये कटुता टाळा. स्थावर मालमत्तेत गुंतवणूक कराल. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल. व्यापार व्यवसायात अनुकूल वातावरण राहील.
तूळ : वाहने व उपकरणे जपून वापरावीत. जोडीदाराबरोबर रोमँटिक क्षण अनुभवाल. वैवाहिक आयुष्य बहरेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेली कामे पूर्ण होतील.
वृश्चिक : कार्यालयाच्या ठिकाणी रागावर नियंत्रण ठेवा. सहकार्यांशी आपुलकीने वागा. अति खाणे टाळा. आरोग्य उत्तम राहील. कोणत्याही प्रकारचे जोखिम टाळा.
धनु : शारीरिक व्यायाम अथवा योगाचे महत्त्व लक्षात घ्या. घरातील ज्येष्ठांशी प्रेमाने बोला. अति प्रमाणात प्रवास करावा लागेल. व्यापार-व्यवसायात परिस्थिती मध्यम राहील.
मकर : आरोग्य उत्तम राहील. सकारात्म क ऊर्जेने कार्यरत राहाल. आर्थिक स्थितीमध्ये बदल घडतील. आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील.
कुंभ : अनावश्यक गोष्टींचा विचार करू नका. मानसिक बळ वाढेल. नोकरीत अनुकूल स्थिती राहील. उत्तरार्धात आर्थिक आवक वाढेल.
मीन : कर्जाऊ रक्कम देणे टाळावे. व्यवसायात भागीदारी तूर्तास नको. वैवाहिक आयुष्यात थोडे निवांत क्षण अनुभवाल. जीवनात नव्या सुरुवातीसाठी उत्तम वेळ आहे. वाहनसुख मिळेल.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर