उच्च रक्तदाब म्हणजे काय?

उच्च रक्तदाब म्हणजे काय?

तुमच्या घरी आजी-आजोबा, काका-मामा व कोणा ओळखीच्यांना तरी रक्तदाबाचा त्रास असणारच. बरेचदा लोक ब्लडप्रेशरचा त्रास आहे असे सांगतात. यातून रक्तदाब व ब्लडप्रेशर असणे हाच रोग आहे असे तुम्हाला वाटू शकेल! पण ते चुकीचे आहे. हृदय हे विहिरीवर बसवलेल्या पंपासारखे कार्य करते. सारखे आकुंचन-प्रसरण पावून हृदय दाबाखाली रक्त सर्व शरीरभर पोहोचवते. रक्त दाबाखाली पाठवले जाते म्हणूनच झोपल्यावर, बसल्यावर, उभे राहिल्यानंतर वा खाली डोके-वर पाय असे राहिले तरी शरीराच्या सर्व भागात ते पोहोचू शकते. या दाबालाच रक्तदाब असे म्हणतात. हा रक्तदाब मोजताना तबकडीसारख्या वा पार्‍याच्या यंत्राने मोजतात. सर्वसामान्यतः निरोगी प्रौढ माणसाचा रक्तदाब १२०-८० इतका असतो. (तो पार्‍याचे मिमी. असा सांगितला जातो) यातील १२० म्हणजे हृदय आकुंचित असतानाच दाब (सिस्टोलिक) व ८० म्हणजे हृदय प्रसरण पावलेले असतानाच (डायस्टोलिक) दाब होय. सिस्टोलिक रक्तदाब १६० च्या वर किंवा डायस्टोलिक रक्तदाब ९५ च्यावर असल्यास त्याला उच्च रक्तदाब असे म्हणतात. भारतात २० ते ६० वर्षाच्या वयोगटात शहरी भागात ७% पुरुषांना व ६% स्त्रियांना उच्च रक्तदाबाचा त्रास असतो. वाढत्या वयाबरोबर रक्तदाब हळूहळू वाढतो.

आनुवंशिकता हेही उच्च रक्तदाबामागील कारण असू शकते. लठ्ठ व्यक्ती, जास्त मीठ (दिवसाला ७ ते ८ ग्रॅमहून जास्त) खाणार्‍या व्यक्ती, आहारात जास्त तूप खाणारे, मद्यपान करणारे, व्यायाम न करणारे व मानसिक ताणतणाव असलेले अशा सर्वांना उच्च रक्तदाब होण्याची शयता इतरांहून जास्त असते. मूत्रपिंड व इतर इंद्रियाच्या आजारामुळेही उच्च रक्तदाब होऊ शकतो. सतत डोके दुखणे, हातापायाला कंप सुटणे, छातीत धडधडणे, चक्कर येणे, हातापायांची जळजळ होणे, छातीत दुखणे ही उच्च रक्तदाबाची लक्षणे असू शकतात. अशा व्यक्तींनी तात्काळ डॉटरांचा सल्ला घ्यावा. सुरुवातीला मीठ कमी करणे, मद्यपान सोडणे, आहारातील मेदपदार्थ कमी करणे व योगाद्वारे चित्तशांती या उपायांनी वा काम्पोजसारख्या गोळ्यांनी रक्तदाब आटोयात येऊ शकतो. पण रक्तदाब जास्त असेल, तर रक्तदाब कमी होण्याच्या गोळ्या घ्याव्याच लागतात.

सामान्यतः ही औषधे नंतर आयुष्यभर घ्यावी लागतात. रुग्णाने स्वतः च्या मनाने डोस कमी करू नये व गोळ्या बदलू किंवा बंद करू नयेत. अन्यथा मेंदूतील रक्तस्राव, अर्धांगवायूचा झटका अशा भयंकर परिणामांना त्याला सामोरे जावे लागते. उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारविहारात सुयोग्य बदल व तज्ज्ञांचा सल्ला घेऊन घेतलेली औषधे याखेरीज इतर कोणताही उपाय करायची गरज नसते. असे केल्यास आयुष्यभर तो नियंत्रणात राहतो. उच्च रक्तदाबाचे निदान लवकर झाल्यास तात्काळ उपचार सुरू होतात व नंतरचे दुष्परिणाम होत नाहीत. यासाठी चाळीशीत प्रवेश केलेल्या सर्वच व्यक्तींनी रक्तदाब तपासून घ्यावा. दुसरे म्हणजे रुग्णांनी स्वतः च्या रक्तदाबाच्या नोंदी व उपचाराची माहिती एका डायरीत व्यवस्थित लिहून ठेवावी, म्हणजे पुढील उपचारात त्याचा फायदा होतो.

सुविचार

चांगल्या पुस्तकांसारखा उत्तम मित्र दुसरा कोणताही नाही. : लाँगफेलो

निरोगी शरीरासाठी फायदेशीर फळे

निरोगी शरीरासाठी फळे फायदेशीर
आपल्या धावपळीच्या आयुष्यात
तुम्हाला रोजची कामे करण्यासाठी ताकद कमी
पडू लागते. तेव्हा अशा वेळेस फळे अतिशय
महत्त्वाची ठरतात. तुम्ही कितीही पौष्टिक जेवण
करा. मात्र तुम्हाला फळांमधून जे पोषण मिळते
ते इतर कशातूनच मिळू शकत नाही. सफरचंद,
केळी, द्राक्षं ही सुपरफूड म्हणून ओळखली
जातात.

पनीर वड्या

पनीर वड्या

साहित्य : अर्धा किलो साखर, अर्धा
किलो खवा, अर्धा किलो पनीर, १२५ ग्रॅम
मैदा, खाण्याचा सोडा, वेलदोडे, काजू,
बेदाणे.
कृती : मैदा तुपावर भाजा. त्यात
खवा, साखर, वेलदोड्याची पूड, काजू, बेदाणे
घाला, मिश्रण सतत हालवत रहा. घोटत
राहिलेले मिश्रण घट्टसर होऊ लागताच तूप
लावलेल्या ताटावर थापावे.
पनीर किसून वरून लावावे आणि वड्या
पाडाव्यात. या वड्या रुचकर लागतात.

नवीन गृहप्रवेशासंबंधी

नवीन गृहप्रवेशासंबंधी
नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी
वास्तुशांती करणे आवश्यक आहे. घरात होम
हवन, यज्ञ असे धार्मिक कार्य करणे आवश्यक
आहे. वास्तूशांती केल्याने घरातील नकारात्म
क ऊर्जा नष्ट होते. वास्तुशांती केल्यानंतरच
घराचा शुभ प्रभाव आपल्यावर पडतो. ज्यामुळे
आयुष्यात आनंद, सुख-समृध्दी प्राप्त होते.
वास्तुशास्त्रानुसार शुभ मुहूर्तावर वाद्याच्या
गजरात कुलदेवतेची पूजा, आलेल्या लोकांचा
सन्मान, ब्राम्हणांना प्रसन्न करून घरात प्रवेश
करावा. गृहप्रवेश करण्यापूर्वी वास्तुशांती करणे
शुभ मानले जाते.

एलसीडीची स्क्रिन साफ करताना

एलसीडीची स्क्रिन साफ करताना
कोणतेही लिनिंग सोल्यूशन सरळ स्क्रीनवर
टाकू नये, तर मुलायम कापडावर घेऊन
स्क्रीन साफ करावी.

तोंड धुण्यापूर्वीच उषःपान करावे

सकाळी उठताच लघुशंका आटोपून
तोंड धुण्यापूर्वीच उषःपान करावे. पाणी
पिण्यापूर्वी पाण्याची एखादी गुळणी केली
जाऊ शकते. ६० किलो वजन असणार्‍यांनी
एक लिटर व जास्त वजन असणार्‍यांनी सव्वा
लिटर पाणी प्यावे. बसून पाणी पिणे जास्त
चांगले. पाणी प्यायल्यानंतर पाऊण तासपर्यंत
काहीही खाऊ किंवा पिऊ नये.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

मुलगी : हिप्नोटाइज करणे म्हणजे काय रे?
मुलगा : एखाद्या व्यतीला आपल्या नियंत्रणात करुन
त्याच्याकडून पाहिजे ते काम करुन घेणे
मुलगी : चल खोटारडा कुठला…
याला तर ‘बॉयफ्रेंड’ म्हणतात.

दैनिक पंचांग गुरुवार, दि. २० जून २०२४

दक्षिणायनारंभ, शके १९४६ क्रोधीनाम
संवत्सर, ज्येष्ठ शुलपक्ष, अनुराधा १८|१०
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६
वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष : कला-क्षेत्रात एखादे महत्वपूर्ण यश मिळेल. आर्थिक प्रश्नांचे निराकरण होईल. कोणतेही कार्य घाईगर्दीत करणे टाळा. वाद टाळा. नोकरदार व्यक्तींनी कार्यात सहयोग घेऊन चालावे.

वृषभ : शिक्षण संबंधी विषयांमध्ये काळ अनुकूल ठरेल. कोणतेही आवेदन देण्यासाठी उत्तम वेळ. कामात अडचणी येतील. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील.

मिथुन : मित्रांचा पाठिंबा राहील. महत्वपूर्ण वार्ता मिळाल्याने मन प्रसन्न राहील. आपली चूक स्वीकारावी लागेल. आत्मविश्वास वाढेल. मित्रांचा सहयोग मिळेल. शुभवार्ता देखील मिळतील.

कर्क : नोकरीपेशा व्यक्तींना पाठबळ मिळेल. आरोग्य उत्तम राहील. अपत्य आणि इतर विषयांपासून आनंद प्राप्ति होईल. मोठ्यांचा आधार मिळाल्याने कार्य पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती अनुकूल राहील.

सिंह : व्यापारातील प्रतिस्पर्धेत वातावरण अनुकूल राहील. प्रेमप्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. मित्रांची मदत मिळेल. आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेली कामे पूर्ण होतील. देवाण घेवाणीत त्रास. आपला निष्काळजी दृष्टीकोन आज चांगला ठरणार नाही. घरात किंवा पैशांमध्ये वाढ झाल्याने आपणास आनंद मिळेल.

तूळ : आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील. व्यापार व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आपल्या आत्मविश्वासाचा स्तर वाढविण्याचा प्रयत्न करा. शत्रू प्रभावहीन ठरतील. अपत्य आणि इतर विषयांपासून आनंद प्राप्ति होईल.

वृश्चिक : अनिश्चिततेचे वातावरण. निराशा वाढेल. कोणतेच काम सुरळीत होणार नाही. प्रलोभनांना भुलू नका. धार्मिक भावना वाढेल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल सहकार्यांबरोबर प्रतिष्ठा वाढेल. नेहमीपेक्षा अधिक चांगले काही घडण्यासाठी आपणास आपल्या कामात एकाग्रता वाढवण्याची आवश्यकता आहे.

धनु : जास्त सहयोग मिळेल. कार्यकुशलतेचा लाभ मिळेल. पारिवारिक लाभ घ्या. नोकरीत विशेष सावधगिरी बाळगा. अधिक श्रम करावे लागतील. व्यापार-व्यवसाय व आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. शत्रू पक्षापासून सावध राहा.

मकर : आरोग्य उत्तम राहील. व्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. मानसिकतेवर लक्ष्य द्या. सामाजिक क्षेत्रांमध्ये अजून काही विशेष कार्ये होणार नाही. एखादी व्यक्ती निष्कारण आपल्याला त्रास देईल.

कुंभ : नियोजित कामात अडचणी येण्याची शयता. कामावर प्रभाव पडेल. अचानक खर्च वाढेल. शत्रू प्रभावहीन पडतील.
आजचा दिवस आपणास पैसे मिळवण्याच्या आणि व्यापाराच्या नव्या संधी देईल परंतु घाई करणे वादाला कारण ठरू शकते.

मीन : आर्थिक नुकसान संभव. मानसिक संतोष वाढेल. कामात अडचणी येतील. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढतील. आज रात्री विश्रांती घ्या. घर बदलण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

दूषित पाण्यामुळे कोणते आजार होतात?

 

दूषित पाण्यामुळे कोणते आजार होतात?

नळाचे पाणी कधी कधी खूपच खराब दिसते. गढूळ पाणी पिण्यास अयोग्य असते, हे कोणीही सांगेल; पण वरून स्वच्छ दिसणारे पाणीही पिण्यास योग्य असेलच असे नाही. साध्या डोळ्यांनी न दिसणारे असंख्य जिवाणू व विषाणू तसेच परजीवी त्यात असू शकतात. काही रासायनिक पदार्थ असल्यामुळे किंवा किरणोत्सर्गी पदार्थांमुळेही पाणी दूषित होऊ शकते. रासायनिक पदार्थ कोणता आहे, यावर रोगाची लक्षणे अवलंबून राहतील. पाण्यात जिवाणू असतील तर ते पाणी पिण्याने टायफॉईड, कॉलरा, हगवण असे रोग होऊ शकतात. विषाणूंमुळे कावीळ, पोलिओ यांसारखे रोग होतात. परजीवी जंतूंमुळे अमिबा व जिआर्डीया यांची लागण होते. गोल कृमी, अंकुश कृमी, तंतू कृमी इत्यादींची लागण त्या जंतूंची अंडी पाण्यात असतील तर होते.

पाण्यात सायलोप्स नावाचे किटक असल्यास नारू हा रोग होऊ शकेल, तर गोगलगायीमुळे शिस्टोसोमीयासीस हा रोग होईल. दूषित पाण्यामुळे असे अनेक रोग होतात. नुसते पाहून पाणी चांगले की वाईट ते कळत नाही. त्यामुळे पिण्याच्या आधी ते शुद्ध आहे याची खात्री करून घ्यावी हेच चांगले. पाण्यात तुरटी फिरवणे, गाळणे, उकळून गार करणे या उपायांनी जंतूंचा नाश होतो. लोरीनच्या गोळ्या वा द्रावण वापरून सुद्धा पाणी शुद्ध करता येते. ही पाण्याच्या शुद्धिकरणाची स्वस्त व परिणामकारक अशी पद्धत आहे. पाण्याच्या बाबतीत ‘दिसते तसे नसते, म्हणून जग त्याला फसते’ ही म्हण अगदी सार्थ ठरते. परंतु योग्य ती काळजी घेतल्यास प्रदूषित पाण्यापासून होणार्‍या रोगांना आपण सहजपणे प्रतिबंध करू शकतो.