दैनिक पंचांग शनिवार, दि. २२ जून २०२४

—, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर,
ज्येष्ठ शुलपक्ष, मूळ १७|५४
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६
वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष : नोकरीत नुकसानी संभव. कामात पारदर्शकता हवी. वैचारिक धारणेत राहू नका. शत्रुपक्ष हावी राहील. वातावरण उत्साहवर्धक राहील.

वृषभ : एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. मन रमणार नाही. विश्वास कमी राहील. व्यर्थ ताण जाणवेल. सामाजिक मान-सन्मान वाढेल.

मिथुन : पारिवारिक वाद वाढतील. खर्च होईल. अडकलेल्या कामात सुधारणा होईल. मार्ग प्रशस्त होईल. व्यापारिक लाभ आणि सुख-समृद्धि वाढेल.

कर्क : अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. सामाजिक यश. नवीन कार्य सुरू करू नका.

सिंह : कायदेशीर कामात आत्मविश्वास कमी राहील. आपल्या पावलांच्या खुणा दुसर्‍यांना मार्गदर्शक ठरण्याचा संभव आहे.

कन्या : अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्‍यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील.

तूळ : आपल्या विवेकबुद्धिच्या उलट काम झाल्याने हानि होऊ शकते. नियंत्रण ठेवा. आपल्या प्रयत्नाने उन्नति कराल. विरोधकांपासून दूर रहा.

वृश्चिक : वरिष्ठांची मर्जी राहील. आपल्या प्रयत्नांमुळे व्यापारात वृद्धि होईल. नवीन कामांना चालना मिळेल. अनपेक्षित फायदा करून देणार्‍या काही घटना घडतील.

धनु : आपल्या यशाचा मूळ मंत्र कोणत्याच कामाला अशय न समजणे असा राहिल. आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. धनलाभ होईल.

मकर : लाभाच्या संधी. नवीन ओळखी संभवतात. आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शयता. आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील. चांगल्या घटना घडतील.

कुंभ : कामाला वाव मिळेल. आपले निर्णय, विचार दुसर्‍यांवर थोपू नका. वेळेच महत्व समजा. लांबलेल्या प्रकरणात यश. स्वप्ने पूर्ण होतील.

मीन : संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग. मनात नवीन कल्पना सुचतील. आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव. यश मिळणार नाही.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

पृथ्वीचा परीघ किती आहे?

पृथ्वीचा परीघ किती आहे?

या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी आपल्याला आपली पृथ्वी एखाद्या चेंडूसारखी गोल, गरगरीत, वेटोळी आहे हे गृहीत धरायला हवं. वास्तवात ती तशी नाही. दोन्ही ध्रुवांच्या इथं ती जराशी दबल्यासारखी आहे. उलट विषुववृत्ताच्या ठिकाणी ती जराशी फुगल्यासारखी आहे. स्वतःभोवती सतत ती गरगर फिरत असते, त्यामुळे तिच्या आकारात हा फरक झालेला आहे. तरीही तिचा परीघ किती आहे हे समजून घेण्यासाठी आपण, ती गोल गरगरीत आहे, असं समजल्यास फारसा फरक पडणार नाही. आता परीघ म्हणजे कोणत्याही एका ठिकाणाहून आपण पृथ्वीच्या पृष्ठभागाला धरून सरळ प्रवास करत निघालो तर परत त्याच ठिकाणावर पोहोचेपर्यंत आपण किती मजल मारली असेल, याचं गणित आहे. तेव्हा अशा प्रवासासाठी असलेल्या साधनांवरूनच आपण या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू शकतो.

पूर्वीच्या काळी समुद्रावर प्रवास करणार्‍या नावाड्यांना आपण कुठं आहोत, कुठं चाललो आहोत हे समजण्यासाठी फारशी साधनं नव्हती. त्यामुळे आकाशातल्या ग्रहगोलांनाच विचारत त्यांची वाटचाल होत असे. उत्तर गोलार्धात धु्रव तारा उत्तर दिशा दाखवत असे. त्याच्यानुसार मग इतर दिशा ओळखल्या जात. तसंच आपण किती मजल मारली आहे, हे समजण्यासाठीही अशाच गणिताची मदत घेतली जात असे. त्यातूनच नॉटिकल माईल म्हणजेच ‘नौकानयनातला मैल’ ही संकल्पना पुढं आली. याचंच संक्षिप्तीकरण होऊन ‘नॉट’ हे एकक रूढ झालं आहे. त्यामुळे जहाजांचा वेग हा दर ताशी अमुक इतके नॉट असा मोजला जातो. जमिनीवरून प्रवास करत असतानाही आपण मैल हे अंतर मोजण्याचे एक एकक पाळतो; पण नॉटिकल माईल आणि आपल्या नेहमीच्या ओळखीचा मैल यांच्यात फरक आहे, कारण त्या एककांची व्याख्याच वेगळी आहे.

पृथ्वी गोलाकार असल्यामुळे त्या गोलाचे ३६० अंश संभवतात. या वर्तुळापैकी एक मिनिटाची आर्क म्हणजे एक नॉटिकल माईल अशी त्याची व्याख्या केली गेली आहे. म्हणजेच या वर्तुळाच्या एक अंशाच्या एक-साठांश इतया भागाचा प्रवास केल्यास एक नॉटिकल माईल अंतर कापले जाते. तेव्हा संपूर्ण ३६० अंशांचा प्रवास करायचा झाल्यास ६०ु३६० म्हणजेच २१६०० नॉटिकल माईल इतके अंतर होते; पण एक नॉटिकल मैल हा आपल्या जमिनीवरच्या मैलापेक्षा मोठा असल्यामुळे हेच अंतर २४८५७ मैल किंवा ४०००३ किलोमीटर इतकं भरते.

सुविचार

अश्लील पुस्तके वाचणे हे विष प्यायल्यासारखे असते. : टॉलस्टॉय

थंडीमध्ये जव खाणे फायदेशीर

थंडीमध्ये जव खाणे फायदेशीर
बार्ली/जव – बार्ली वा जवाला
‘धान्यराज’ किंवा संस्कृतमध्ये ‘यव’ असेही
संबोधले जाते. उत्तर भारतात थंडी खूप असते
आणि तिथे हे धान्यही पुष्कळ प्रमाणात खातात,
पण आपल्याकडे ते फारसे खाल्ले जात नाही.
फार तर ‘बार्ली वॉटर’ किंवा ‘पफ बार्ली’
आपल्याला माहिती असते. जव हे बलकारी,
पचायला जड (गुरू) व मधुर रसात्मक आहे.
थंडीत ज्यांना सारखा सर्दी-खोकला होतो,
नाक वाहते अशांना आजारांना प्रतिबंध
करण्यासाठी आहारात जवाचा समावेश करता
येईल. थंडीत शरीर व स्नायू आखडण्याचा
त्रासही अनेकांना होतो. त्यावरही जव आहारात
असण्याचा प्रतिबंधक म्हणून उपयोग होतो.
जवात ‘ब’ जीवनसत्त्व व आवश्यक अमिनो
आम्ले भरपूर असून, ते पौष्टिक आहे.

लाल भोपळा – आंबा बर्फी

लाल भोपळा – आंबा बर्फी

साहित्य : लाल भोपाळा किसून दीड
कप, हापूस आंब्याचा रस दीड कप, साखर
दोन कप, पिठी साखर पाव कप, तूप दोन
चमचे, खवा पाव कप, सायट्रीक अ‍ॅसीड पाव
चमचा, वेलदोडे पूड एक चमचा.
कृती : तूपात मंद विस्तवावर
भोपळ्याचा कीस झाकण घालून शिजवावा.
करपू नये म्हणून हलवावा. झाकणावर पाणी
घालावे. शिजल्यावर त्यात साखर, घुसळलेला
आमरस, खवा व सायट्रीक अ‍ॅसीड घालून
मोठ्या विस्तवावर शिजत ठेवून सारखे हलवावे.
नाही तर खाली लागतो. मिश्रण चिकट होवून
सुटू लागले की उतरवून पिठीसाखर घालून
चांगले घोटावे. ताटाला तूपाचा हात लावून
त्यावर मिश्रण पसरावे. कोमट असतानाच
वड्या कापून काढाव्यात.

मृतांना सद्गतीसाठी

मृतांना सद्गतीसाठी
देव व मृत व्यक्ती यांचे समान पातळीत
पूजन करू नये. देवतांच्या फोटोच्या बरोबरीने
आपल्या घरातील मृत झालेल्या व्यक्तीचे
फोटो लावू नये. मृत व्यक्ती सद्गतीपासून
वंचित होते व परिणामी ती शाप देते.

पोटातील कृमी

कारली पोटातील कृमी नष्ट करतात. रक्त
शुद्ध करतात. पित्ताशय सक्रिय बनवतात.

डोळ्याखाली डार्क सर्कल आले असल्यास

* डोळ्याखाली डार्क सर्कल आले
असल्यास बटाटा लेव्हेंडर तेल व पाण्यात
शिजवून त्याचे काप डोळ्यांवर ठेवा. १०
मिनिटे राहू द्या. हा प्रयोग किमान महिनाभर
करावा. त्याने नक्कीच फरक पडेल.
* डोळ्याखाली डार्क सर्कल आले
असल्यास बटाटा लेव्हेंडर तेल व पाण्यात
शिजवून त्याचे काप डोळ्यांवर ठेवा. १०
मिनिटे राहू द्या. हा प्रयोग किमान महिनाभर
करावा. त्याने नक्कीच फरक पडेल.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

मुलगा : बाबा १ ग्लास पाणी द्या ना ?
बाप : स्वतः उठुन घे…?
मुलगा : प्लीज द्या ना बाबा..
बाप : आता थोबाडित मारीन तुझ्या!
मुलगा : थोबाडीत मारायला याल
तेव्हा येताना पाणी आणा.

दैनिक पंचांग शुक्रवार, दि. २१ जून २०२४

वटपौर्णिमा, शके १९४६ क्रोधीनाम
संवत्सर, ज्येष्ठ शुलपक्ष, ज्येष्ठा १८|१९
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६
वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष : सुखद यात्रा योग. विद्यार्थिनी चांगला अभ्यास करतील. घरात शांतता राहील. मान-सन्मान व यश प्राप्त होईल. कामात गुप्तता राखा.

वृषभ : मित्रांचा सहयोग मिळणार नाही. व्यापार मध्यम राहील. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शयता. संबंध
बिघडतील. खर्चाची चिंता राहील. वैचारिक असंतोष राहील.

मिथुन : घरातील वातावरण निराशाजनक असल्याने उत्साहात कमी होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. कामे अपुरी राहतील. अव्यवहारिक कामांपासून लांब रहा. निश्चितेने काम करा. बातमी मिळेल.

कर्क : प्रिय व्यक्तिची भेट घडेल. कामात उन्नति होईल. स्फूर्ति राहील. धार्मिक गोष्टीत रस घ्याल. व्यक्तिगत अडचण राहू
शकते. पारिवारिक वाद विकोपास जातील. सांगण्यावर विश्वास ठेवू नका.

सिंह : एखादे कार्य घाईत पूर्ण करण्याची आपली इच्छा प्रश्न उभे करू शकते. जबाबदारीची कामे पडतील. खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल.

कन्या : नोकरीपेशा व्यक्ती वायफळ खर्च टाळा. आनंदाची बातमी मिळण्याची शयता आहे. सहयोग मिळेल. आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त ठेवा.

तूळ : पर्याप्त लाभ मिळणे कठीण. व्यापारिक करार व व्यवहारात सावधगिरी बाळगा. कामात मन रमणार नाही. तब्बेतीची काळजी घ्या. सांगण्यावर विश्वास ठेवू नका. आत्मविश्वास वाढेल. व्यावसायिक प्रकरणात अडचणी येतील.

वृश्चिक : महत्वाकांक्षा पूर्ण झाल्यामुळे आनंद वाटेल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस उत्तम व्यतीत होईल. गुंतवणूकीतून लाभ होण्याची शयता. वेळ सत्कारणी लागेल. योजनेचे क्रियान्वयन आवश्यक.

धनु : पळापळ अधिक राहील. शेयरच्या विषयामध्ये सावधगिरी बाळगा. आपण कार्याच्या विषयी गुप्त धोरणे राखून यश मिळवू शकाल. अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल.

मकर : वाहनसुख मिळेल. मनोरंजनावर खर्च होईल. आरोग्य उत्तम राहील. लेखन कार्यास प्रगति होईल. अनिश्चितता वाटेल. पारिवारिक वैचारिक मतभेद वाढतील. सतत परिश्रमाने आर्थिक लाभ होतील.

कुंभ : जीवनात नव्या सुरुवातीसाठी उत्तम वेळ आहे. कोणतेही कार्य पूर्ण करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. कामाचा ताण जाणवेल. नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये. अडचणी येतील. आर्थिक जबाबदार्‍या वाढतील.

मीन : आज व्यापार-व्यवसायात स्थिती मध्यम राहील. आरोग्य नरम-गरम राहील. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. पारिवारिकदृष्ट्या वेळ सामान्य. आपली स्थिति, वास्तविकता वाढेल.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर