घरातील देवघराला कळस


घरातील देवघराला कळस,
गोमुखासारखा आकार किंवा झेंडा लावलेला
नसावा.
संकलक ः अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

हसा आणि शतायुषी व्हा!

चंप्या : बाबा, मला गाडी घेऊन द्या.
वडील : देवानं दोन पाय कशाला दिलेत!
चंप्या : एक किक् मारायला,
न् एक गिअर बदलायला.

दैनिक पंचांग रविवार, दि. २३ जून २०२४

—, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर,
ज्येष्ठ कृष्णपक्ष, पू.षा.१७|०४
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६
वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष : जोडीदारा बरोबर तणाव ठेऊ नका. मतभेदांपासून लांब रहा. व्यापार चांगला राहील. घरात शुभ मांगलिक कार्ये. आजची संध्याकाळ मित्रांबरोबर व्यतित कराल.

वृषभ : व्यापारिक भागीदारीसाठी उत्तम वेळ. अधिकारांचा योग्य वापर करा. स्पर्धा, पैजा जिंकू शकाल. लाभ होईल.आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. मानसिक सुखशांती मिळेल.

मिथुन : अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. मनावरील दडपण दूर. अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग. कुटुंबाकडून सहयोग मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रसन्न वातावरण राहील.

कर्क : धर्म, आध्यात्मात रूचि वाढेल. अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहील. कार्यक्षेत्राचा विकास आणि विस्तार होईल. व्यस्त रहाल. मनोरंजनासाठी काही प्लॅन कराल.

सिंह : कार्यक्षमता वाढल्याने उत्साह वाढेल. अभीष्टसिद्धी होईल. फायदा होईल. विरोधक करार करतील. व्यापार व्यवसायिकांना दिवस संमिश्र. शत्रूंपासून दूर राहा.

कन्या : व्यापारात बुद्धिमत्ता, दूरदर्शितेची प्रशंसा होईल. अत्यधिक प्रयत्नांचा अल्प लाभ मिळेल. तणाव अडचणी राहतील. आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे.

तूळ : अध्ययनात रूचि वाढेल. कामांची प्रशंसा होईल. भागीदारी पक्षात होऊ शकते. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. राजकारणी लोकांचा पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल.

वृश्चिक : अध्ययनात छान यश. अर्थप्राप्तीचा योग. परिश्रमाने कामाचे शुम परिणाम येतील. कसूर नको. काळ अनुकूल आहे कामे सहज होतील. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील.

धनु : उपजीविकेच्या स्त्रोतांमुळे लाभ प्राप्ति. भागीदारीतून विशेष लाभ. उपजीविकेच्या स्त्रोतातून लाभ होईल. वेळ मनोरंजनात व्यतीत होईल. व्यापारात नवीन लाभदायी करार होतील. महत्वाचे काम टाळा. कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा.

मकर : काळजीपूर्वक काम करा. कोणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. काही प्रश्नांची सोडवणूक सर्वांना एकत्र आणून करावी लागेल.

कुंभ : रोग, ऋण संबंधी कार्यात विशेष लाभ. उत्तम वाहन सुख. तब्बेतीत सुधारणा. धार्मिक कार्यात वेळ जाईल. कामाचा भार अधिक राहील. जोखमीची कामे टाळा. तब्बेत सांभाळा. आर्थिक लाभ.

मीन : पाठबळ मिळेल. मनाला प्रसन्नता वाटेल. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. मित्रांकडून आर्थिक लाभ होईल. आनंदाची
बातमी मिळेल. शांत रहाल. लाभदायक बातमी कळेल.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

लहान व मोठा मेंदू यात काय फरक असतो?

लहान व मोठा मेंदू यात काय फरक असतो?

लहान व मोठा मेंदू हे मानवाच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेचे महत्त्वाचे भाग आहेत. लहान व मोठा ही विशेषणे त्यांच्या आकारावरून पडली असती, तरी त्यांच्या कार्यामध्येही फरक आहे. मेंदू हा मानवी शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. शरीरावर संपूर्ण नियंत्रण ठेवणारा हा ‘बॉस’ आहे. मेंदूच्या आज्ञेवाचून हालचालीच काय, कोणतीच क्रिया होत नाही. मोठा मेंदू हा स्मरणशक्ती, प्रवृत्ती, हालचाली, बोलणे, शिकणे, स्वरक्षण करणे, शरीराचे व्यवहार सुरळीत चालवणे यासाठी कार्यरत असतो. डोयाच्या पुढच्या भागात हा मेंदू असतो. शरीराचा तोल सांभाळणे, हे लहान मेंदूचे काम. याखेरीज सूक्ष्म अशा हालचालींसाठी याच मेंदूचे नियंत्रण आवश्यक असते.

लहान मेंदू डोयाच्या मागच्या भागात असतो. मोठा मेंदू रोगग्रस्त झाल्यास स्मरणशक्ती जाणे, अर्धांगवायु होणे इत्यादी गोष्टी होऊ शकतात. याउलट लहान मेंदू रोगग्रस्त झाला तर स्नायूंच्या हालचालीत सुसूत्रता राहत नाही. बोलण्यात विकृती निर्माण होते, हात थरथरतात व चाल बदलते. आपल्या लक्षात आले असेल की, लाखो पेशींचे बनलेले मेंदूचे हे भाग आपले कार्य चोखपणे बजावतात, म्हणूनच व्यक्ती संपूर्णपणे निरोगी राहू शकते.

आरोग्यवर्धक गाजर

आरोग्यवर्धक गाजर
गाजर हे चांगले पोषण करणारे, उष्ण व
मधुर रसात्मक आहे. त्यात ‘अ’ जीवनसत्त्वही
उत्तम प्रमाणात आहे. त्यामुळे हिवाळ्यात गाजर
कोशिंबिरीच्या स्वरूपात किंवा तसेच कच्चे खाता
येईल. गाजराचा घरी रस काढून घेता येईल.
गाजराचा हलवा हा तर अनेकांच्या आवडीचाच
पदार्थ असतो. हिवाळ्यात मूळव्याधीची प्रवृत्ती
वाढते. त्याला प्रतिबंध करण्यासाठी गाजर
आहारात असलेले चांगले.
गाजरात तंतुमय पदार्थ भरपूर असतात.
गाजर अग्निदीपन करणारे म्हणजेच भूक
वाढवणारे असून, ते पोटात तयार होणारी
आम्लताही कमी करते. ज्या लहान मुलांचे
वजन कमी आहे, त्यांना गाजर दुधाबरोबर
शिजवून केलेला हलवा जरूर द्यावा, त्याने
वजन वाढायला मदत होते.

तिळगुळाचे मऊ लाडू

तिळगुळाचे मऊ लाडू

साहित्य : १ किलो पॉलिश न केलेले
तीळ, पाऊण किलो केमिकल विरहीत गूळ
किसून, १-२ टीस्पून जायफळ.
कृती : तीळ कढईत घालून मध्यम
आचेवर खमंग भाजून घ्या. तीळ चांगले
तडतडायला लागले आणि खमंग वास यायला
लागला की तीळ भाजले गेले असं समजा.
तीळ लाल झाले पाहिजेत पण काळे होता
कामा नयेत. तीळ थंड करायला ताटात काढून
ठेवून द्या. तीळ कोमट झाले की मिसरमध्ये
जाडसर कूट करून घ्या. नंतर हे जाडसर
कूट आणि किसलेला गूळ तसंच जायफळ पूड
हाताने चांगले एकजीव करा. हे मिश्रण परत
थोडे-थोडे मिसरमध्ये फिरवून घ्या. अगदी
लगदा करू नका, थोडंसं जाडसरच ठेवा.
नंतर परत हातानं चांगलं एकत्र करा आणि
आपल्याला हवे तसे लहान-मोठ्या आकारात
लाडू वळा.

असे झोपावे

असे झोपावे
आपले बेड असे ठेवा की आपले डोके
दक्षिणेकडे वा पूर्वेकडे राहील. पश्चिमेकडे
डोके करून झोपणे टाळा.

भाज्यांची पौष्टीकता

शिजवताना जास्त तेल घातल्यास
व जास्त वेळ जाळावर ठेवल्यास भाज्यांची
पौष्टीकता नष्ट होते.

उजळ त्वेचेसाठी

* दूध आणि मध एकत्र करून त्वचेवर
चोळल्याने ती मऊ व उजळ होते.
* बदाम, गुलाबाची फुले, चारोळी
व उगाळलेले जायफळ रात्री दुधात भिजवा.
सकाळी वाटून त्याचे उटणे बनवा. यामुळे
चेहर्‍यावरील डाग नाहीसे होऊन त्वचा तेजस्वी
होते.
* लिंबाचा रस आणि खोबरेल तेल
केसांना लावण्याने कोंड्यापासून आराम
मिळतो.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

बायको : कुठे आहात?
नवरा : ऑफिसमध्ये आहे. का गं काय झालं?
बायको : काही नाही हो,
आपली शेजारची बाई पळून गेली
म्हणून विचारले…

बंड्या : पप्पा विजेच्या तारा एवढ्या वर का असतात.
वडील : कारण, बायकांनी तारांवर कपडे वाळत घालू नये म्हणून.