चेहरा स्वच्छ करण्याचा उत्तम उपाय

* आपण फळे खात असाल, तर ती
कुस्करून चेहर्‍यावर लावा. त्वचा उजळेल.
* आपण आपल्या घरीही फेसपॅक बनवू
शकतो. अगदी आपल्या दररोजच्यावारातील
वस्तुंपासूनही तो तयार हातो. त्यासाठी मसूर
डाळ, मुलतानी माती, चंदन पावडर, चिमूटभर
जायफळ एकत्र वाटून ते गुलाब पाण्यात मि
सळा व चेहर्‍यावर लावा. वाळल्यानंतर धुवून
टाका. हे फेस स्क्रबचे काम करील. चेहरा
स्वच्छ करण्याचा उत्तम उपाय आहे.

ब्रेडच्या कडा

* ब्रेडच्या कडा वेगळ्या काढून त्याचे
चौकोने तुकडे करून तळावेत. टोमॅटो सूप
केल्यावर त्यात घालता येतात.
* आदल्या दिवशीचे साधे वरण
असल्यास त्यात थोडीथोडी सर्व पिठे
घालावीत. ओवा, जिरे, हिंग, हळद, लसूण,
मिरची, कांदा बारीक चिरून घालावा.
थालिपीठ लावावे.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

गण्या : काय रे तुझे आणि वहिनीचे भांडण मिटले का???
मन्या : हो, गुडघ्यावर रांगत रांगत आली होती माझ्याकडे
गण्या : हो का? मग काय म्हणाल्या रे वहिनी…!
मन्या : कॉटच्या खाली लपु नका,
या बाहेर…मारणार नाही मी

दैनिक पंचांग मंगळवार, दि. २५ जून २०२४

अंगारक चतुर्थी, शके १९४६ क्रोधीनाम
संवत्सर, ज्येष्ठ कृष्णपक्ष, श्रवण १४|३३
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६
वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष : आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. आजची संध्याकाळ मित्रांबरोबर व्यतित कराल. अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. भाग्यवर्धक यश.

वृषभ : मानसिक सुखशांती मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रसन्न वातावरण राहील. कुटुंबाकडून सहयोग मिळेल. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील. विषयावर वाद संभव आहे. सामाजिक कामात सक्रिय भागीदारी.

मिथुन : प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व वरिष्ठांशी संपर्क आपल्यासाठी आनंद देणारा ठरेल. मनोरंजनासाठी वायफळ खर्च होईल. लाभदायी करार होतील. मानसिक शांति मिळेल. आर्थिक स्थितित सुधारणा. स्वजनांशी भेट घडेल.

कर्क : व्यस्त रहाल. मनोरंजनासाठी काही प्लॅन कराल. व्यापार-व्यवसायिकांना दिवस संमिश्र. शत्रूंपासून दूर राहा. आर्थिक
आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. आर्थिक स्थिति सुदृढ राहील. यश वाढेल.

सिंह : काळ अनुकूल आहे कामे सहज होतील. राजकारणी लोकांचा पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. कर्मक्षेत्रात गूढ
अनुसंधाना संबंधी विशेष योग. आर्थिक क्षेत्रात अनुसंधान संबंधी योग.

कन्या : वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. काही प्रश्नांची सोडवणूक सर्वांना एकत्र आणून करावी लागेल. व्यापारात नवीन लाभदायी करार होतील.

तूळ : कामाचा भार अधिक राहील. जोखमीची कामे टाळा. महत्वाचे काम टाळा. कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा. तब्बेत सांभाळा. आर्थिक लाभ. शब्दाने शब्द वाढवू नका.

वृश्चिक : एखाद्याच्या सहयोगाने कार्ये पूर्ण होतील. जोडीदाराबरोबर घालवलेली वेळ सुखद राहील. देवाण-घेवाण टाळा. मित्रांचा सहयोग मिळेल. गुंतवणूक विचारपूर्वक करा. मित्रांबरोबर वेळ जाईल. नवे संबंध बनतील.

धनु : आज आपणास जास्त खर्च करावा लागू शकतो. इतरांना सहकार्य केल्याने वाद उद्भवू शकतात. आर्थिक उन्नति होईल. परिस्थिति शांतपणे हाताळा. आर्थिक प्रकरणात विशेष अनुसंधान योग. घरात मंगल कार्य होतील.

मकर : एखादे नवे नाते आपल्यावर प्रभाव पाडेल. प्रवासाचे योग संभवतात. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते. राहत्या जागेसंबंधी अडचण राहू शकते. मिळकतीतून लाभ प्राप्ति योग. शासकीय स्त्रोतांकडून धन प्राप्तिचा योग. पैश्यासंबंधी वाद सोडविण्यासाठी भाग्यवर्धक यश प्राप्ति योग.

कुंभ : प्रवासाचे योग संभवतात. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. घरात मंगल कार्याचा योग. दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल. आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे.

मीन : आरोग्याची व खाण्या-पिण्याची काळजी घ्या. आर्थिक नुकसानाची शयता आहे. कामांची गती मंदावेल. शांत रहा.
लाभदायक बातमी कळेल. धनलाभ होईल. विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

पृथ्वीचा परीघ किती आहे?

पृथ्वीचा परीघ किती आहे?

या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी आपल्याला आपली पृथ्वी एखाद्या चेंडूसारखी गोल, गरगरीत, वेटोळी आहे हे गृहीत धरायला हवं. वास्तवात ती तशी नाही. दोन्ही ध्रुवांच्या इथं ती जराशी दबल्यासारखी आहे. उलट विषुववृत्ताच्या ठिकाणी ती जराशी फुगल्यासारखी आहे. स्वतःभोवती सतत ती गरगर फिरत असते, त्यामुळे तिच्या आकारात हा फरक झालेला आहे. तरीही तिचा परीघ किती आहे हे समजून घेण्यासाठी आपण, ती गोल गरगरीत आहे, असं समजल्यास फारसा फरक पडणार नाही. आता परीघ म्हणजे कोणत्याही एका ठिकाणाहून आपण पृथ्वीच्या पृष्ठभागाला धरून सरळ प्रवास करत निघालो तर परत त्याच ठिकाणावर पोहोचेपर्यंत आपण किती मजल मारली असेल, याचं गणित आहे. तेव्हा अशा प्रवासासाठी असलेल्या साधनांवरूनच आपण या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू शकतो. पूर्वीच्या काळी समुद्रावर प्रवास करणार्‍या नावाड्यांना आपण कुठं आहोत, कुठं चाललो आहोत हे समजण्यासाठी फारशी साधनं नव्हती. त्यामुळे आकाशातल्या ग्रहगोलांनाच विचारत त्यांची वाटचाल होत असे.

उत्तर गोलार्धात धु्रव तारा उत्तर दिशा दाखवत असे. त्याच्यानुसार मग इतर दिशा ओळखल्या जात. तसंच आपण किती मजल मारली आहे, हे समजण्यासाठीही अशाच गणिताची मदत घेतली जात असे. त्यातूनच नॉटिकल माईल म्हणजेच ‘नौकानयनातला मैल’ ही संकल्पना पुढं आली. याचंच संक्षिप्तीकरण होऊन ‘नॉट’ हे एकक रूढ झालं आहे. त्यामुळे जहाजांचा वेग हा दर ताशी अमुक इतके नॉट असा मोजला जातो. जमिनीवरून प्रवास करत असतानाही आपण मैल हे अंतर मोजण्याचे एक एकक पाळतो; पण नॉटिकल माईल आणि आपल्या नेहमीच्या ओळखीचा मैल यांच्यात फरक आहे, कारण त्या एककांची व्याख्याच वेगळी आहे. पृथ्वी गोलाकार असल्यामुळे त्या गोलाचे ३६० अंश संभवतात. या वर्तुळापैकी एक मिनिटाची आर्क म्हणजे एक नॉटिकल माईल अशी त्याची व्याख्या केली गेली आहे. म्हणजेच या वर्तुळाच्या एक अंशाच्या एक-साठांश इतया भागाचा प्रवास केल्यास एक नॉटिकल माईल अंतर कापले जाते. तेव्हा संपूर्ण ३६० अंशांचा प्रवास करायचा झाल्यास ६०ु३६० म्हणजेच २१६०० नॉटिकल माईल इतके अंतर होते; पण एक नॉटिकल मैल हा आपल्या जमिनीवरच्या मैलापेक्षा मोठा असल्यामुळे हेच अंतर २४८५७ मैल किंवा ४०००३ किलोमीटर इतकं भरते.

 

सुविचार

पुस्तके म्हणजे समयरूपी सागरात उभे केलेले दीपस्तंभ होत.

गुडघेदुखीमध्ये तिळाचे तेल लाभदायक

गुडघेदुखीमध्ये तिळाचे तेल लाभदायक
तुमचे गुडघे दुखत असल्यास तिळाचे
तेल सकाळ-संध्याकाळ थोडे थोडे प्या. त्यावर
कोमट पाणी प्या. १५ दिवसांत गुडघेदुखी
थांबण्यास मदत होईल.
हे सर्व उपाय घरगुती जरी असले तरी
तुम्हाला काही शरीरासंबंधी त्रास किंवा आजार
असेल तर सर्वात आधी डॉटरांचा सल्ला
घ्या.

तिळाची पापडी

तिळाची पापडी
साहित्य : तीळ एक कप, साखर एक
कप, तुप एकटेबल-स्पून.
कृती : सर्वप्रथम तीळ मंद आचेवर
भाजून घ्यावे. कढईत साखर वितळेपर्यंत
हलवत राहावे.
पाक तयार झाल्यानंतर त्यात थंड
झालेली तीळ घालून घ्यावी. ताटाला
तूप लावून तयार मिश्रण ताटात ओतून
लाटण्याच्या साहाय्याने पातळ पापडी लाटून
घ्यावी. कुकीज कटर साह्याने गोलाकार पापडी
कट करा. अशाप्रकारे तयार ति

सुंदर केसांसाठी

सुंदर केसांसाठी
* कडुलिंबाची पाने व बोरांची पाने
वाटून केसांना लावा. काही दिवसात केस
लांब व सुंदर होतील.
* तेलकट त्वचेवरील डाग
घालवण्यासाठी चंदनाचे चूर्ण गुलाबपाण्यात
मिसळून लावा. हा प्रयोग उन्हाळ्यात जास्त
उपयुक्त असतो.
* पपईचा गर चेहर्‍यासाठी ‘फेस
पॅक’ करून वापरा. चेहरा विलक्षण आकर्षक
होतो.
* गरोदरपणात स्ट्रेचमार्स तराय
होतात. त्यावर ऑलिव्ह आईल लावावे.

मटकीची उसळ उरल्यास

मटकीची उसळ उरल्यास दुसर्‍या दिवशी
ती मिसरमधून बारीक करून घ्यावी. लसूण,
मिरची, जिरे, ओवा आणि थोडेसे ज्वारीचे पीठ
घालावे. उकडलेला बटाटा घालावा. कोथिंबीर
घालून सर्व गोळा चांगला मळून घ्यावा. कटलेट
तयार करून भाजणीवर किंवा ब्रेडच्या चुर्‍यावर
घोळवून तव्यावर दोन्ही बाजूंनी तेल सोडून बदामी
रंगावर फ्राय करावीत.