आरोग्यवर्धक गाजर

0
66

आरोग्यवर्धक गाजर
गाजर हे चांगले पोषण करणारे, उष्ण व
मधुर रसात्मक आहे. त्यात ‘अ’ जीवनसत्त्वही
उत्तम प्रमाणात आहे. त्यामुळे हिवाळ्यात गाजर
कोशिंबिरीच्या स्वरूपात किंवा तसेच कच्चे खाता
येईल. गाजराचा घरी रस काढून घेता येईल.
गाजराचा हलवा हा तर अनेकांच्या आवडीचाच
पदार्थ असतो. हिवाळ्यात मूळव्याधीची प्रवृत्ती
वाढते. त्याला प्रतिबंध करण्यासाठी गाजर
आहारात असलेले चांगले.
गाजरात तंतुमय पदार्थ भरपूर असतात.
गाजर अग्निदीपन करणारे म्हणजेच भूक
वाढवणारे असून, ते पोटात तयार होणारी
आम्लताही कमी करते. ज्या लहान मुलांचे
वजन कमी आहे, त्यांना गाजर दुधाबरोबर
शिजवून केलेला हलवा जरूर द्यावा, त्याने
वजन वाढायला मदत होते.