तिळगुळाचे मऊ लाडू

0
61

तिळगुळाचे मऊ लाडू

साहित्य : १ किलो पॉलिश न केलेले
तीळ, पाऊण किलो केमिकल विरहीत गूळ
किसून, १-२ टीस्पून जायफळ.
कृती : तीळ कढईत घालून मध्यम
आचेवर खमंग भाजून घ्या. तीळ चांगले
तडतडायला लागले आणि खमंग वास यायला
लागला की तीळ भाजले गेले असं समजा.
तीळ लाल झाले पाहिजेत पण काळे होता
कामा नयेत. तीळ थंड करायला ताटात काढून
ठेवून द्या. तीळ कोमट झाले की मिसरमध्ये
जाडसर कूट करून घ्या. नंतर हे जाडसर
कूट आणि किसलेला गूळ तसंच जायफळ पूड
हाताने चांगले एकजीव करा. हे मिश्रण परत
थोडे-थोडे मिसरमध्ये फिरवून घ्या. अगदी
लगदा करू नका, थोडंसं जाडसरच ठेवा.
नंतर परत हातानं चांगलं एकत्र करा आणि
आपल्याला हवे तसे लहान-मोठ्या आकारात
लाडू वळा.