दैनिक पंचांग मंगळवार, दि. २५ जून २०२४

0
26

अंगारक चतुर्थी, शके १९४६ क्रोधीनाम
संवत्सर, ज्येष्ठ कृष्णपक्ष, श्रवण १४|३३
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६
वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष : आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. आजची संध्याकाळ मित्रांबरोबर व्यतित कराल. अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. भाग्यवर्धक यश.

वृषभ : मानसिक सुखशांती मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रसन्न वातावरण राहील. कुटुंबाकडून सहयोग मिळेल. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितित बचत आणि निवेशाचे योग येतील. विषयावर वाद संभव आहे. सामाजिक कामात सक्रिय भागीदारी.

मिथुन : प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व वरिष्ठांशी संपर्क आपल्यासाठी आनंद देणारा ठरेल. मनोरंजनासाठी वायफळ खर्च होईल. लाभदायी करार होतील. मानसिक शांति मिळेल. आर्थिक स्थितित सुधारणा. स्वजनांशी भेट घडेल.

कर्क : व्यस्त रहाल. मनोरंजनासाठी काही प्लॅन कराल. व्यापार-व्यवसायिकांना दिवस संमिश्र. शत्रूंपासून दूर राहा. आर्थिक
आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. आर्थिक स्थिति सुदृढ राहील. यश वाढेल.

सिंह : काळ अनुकूल आहे कामे सहज होतील. राजकारणी लोकांचा पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. कर्मक्षेत्रात गूढ
अनुसंधाना संबंधी विशेष योग. आर्थिक क्षेत्रात अनुसंधान संबंधी योग.

कन्या : वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. काही प्रश्नांची सोडवणूक सर्वांना एकत्र आणून करावी लागेल. व्यापारात नवीन लाभदायी करार होतील.

तूळ : कामाचा भार अधिक राहील. जोखमीची कामे टाळा. महत्वाचे काम टाळा. कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा. तब्बेत सांभाळा. आर्थिक लाभ. शब्दाने शब्द वाढवू नका.

वृश्चिक : एखाद्याच्या सहयोगाने कार्ये पूर्ण होतील. जोडीदाराबरोबर घालवलेली वेळ सुखद राहील. देवाण-घेवाण टाळा. मित्रांचा सहयोग मिळेल. गुंतवणूक विचारपूर्वक करा. मित्रांबरोबर वेळ जाईल. नवे संबंध बनतील.

धनु : आज आपणास जास्त खर्च करावा लागू शकतो. इतरांना सहकार्य केल्याने वाद उद्भवू शकतात. आर्थिक उन्नति होईल. परिस्थिति शांतपणे हाताळा. आर्थिक प्रकरणात विशेष अनुसंधान योग. घरात मंगल कार्य होतील.

मकर : एखादे नवे नाते आपल्यावर प्रभाव पाडेल. प्रवासाचे योग संभवतात. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते. राहत्या जागेसंबंधी अडचण राहू शकते. मिळकतीतून लाभ प्राप्ति योग. शासकीय स्त्रोतांकडून धन प्राप्तिचा योग. पैश्यासंबंधी वाद सोडविण्यासाठी भाग्यवर्धक यश प्राप्ति योग.

कुंभ : प्रवासाचे योग संभवतात. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. घरात मंगल कार्याचा योग. दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल. आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे.

मीन : आरोग्याची व खाण्या-पिण्याची काळजी घ्या. आर्थिक नुकसानाची शयता आहे. कामांची गती मंदावेल. शांत रहा.
लाभदायक बातमी कळेल. धनलाभ होईल. विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.