मटकीची उसळ उरल्यास दुसर्या दिवशी
ती मिसरमधून बारीक करून घ्यावी. लसूण,
मिरची, जिरे, ओवा आणि थोडेसे ज्वारीचे पीठ
घालावे. उकडलेला बटाटा घालावा. कोथिंबीर
घालून सर्व गोळा चांगला मळून घ्यावा. कटलेट
तयार करून भाजणीवर किंवा ब्रेडच्या चुर्यावर
घोळवून तव्यावर दोन्ही बाजूंनी तेल सोडून बदामी
रंगावर फ्राय करावीत.