डोळ्यांची निगा

डोळ्यांची निगा
* डोळ्यांची आग थांबण्यासाठी
काकडीच्या फोडी डोळ्यांवर ठेवाव्यात.
* टोमॅटोची आंबट-गोड चटणी
तयार केल्यानंतर त्यात सायट्रिक अ‍ॅसिड
मिसळल्यास ती आठवडाभर टिकू शकते.
* फ्लॉवर वाळवायचा असेल, तर
त्याची फुले तोडून माळेत ओवून उन्हात
वाळवावीत.

मानेवरील डाग घालविण्यासाठी

मानेवरील डाग घालविण्यासाठी
काकडीची पेस्ट बनवून घ्यावी. त्यात
थोडे दही मिसळून मानेवर लावल्याने डाग
दूर होतात.

घराच्या मुख्य दरवाजावर

घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक
किंवा पिरॅमिड लावावे.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

हसा आणि शतायुषी व्हा!

शाळेत परीक्षेच्या वेळी एका विद्यार्थ्याने
आपल्यापुढे बसलेल्या विद्यार्थ्याला
१० रु. दिले आणि त्याचा पेपर
पाहून तो आपला पेपर लिहू लागला. शिक्षकांनी त्याला
पकडले व रागावून ते म्हणाले,
‘अशी लाचलुचपत आणि लबाडी करणार्‍या मुलांचे पुढे काय
होतं ते माहीत आहे ना?’
‘होय सर पुढे ते पुढारी होतात.’ विद्यार्थी म्हणाला.

दैनिक पंचांग बुधवार, दि. २६ जून २०२४

—, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर,
ज्येष्ठ कृष्णपक्ष, धनिष्ठा १३|०५
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६
वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष : आर्थिक क्षेत्रात संयमाने वागा. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. आहारावर विशेष लक्ष द्या. व्यापार व्यवसायात सावधगिरी बाळगा.

वृषभ : भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो.

मिथुन : पुष्कळ दिवसांपासून साचलेली कामे पूर्ण होतील. आत्मविश्वासाने काम केल्याने यशाची गुरुकिल्ली सापडेल. घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल.

कर्क : आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल. तुमच्या सार्मथ्यात वाढ. होईल. आनंदाची बातमी कळेल. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा. कामात पूर्ण समर्पणभाव ठेवा. राजकीय व्यक्तींना काळ अनुकूल आहे.

सिंह : आध्यात्मासंबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग. कौटुंबिक सुख लाभेल. मिळालेली संधीचे सोने कराल.

कन्या : निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होईल. कामात निश्चितपणे यश मिळेल.

तूळ : आवास संबंधी समस्या सुटतील. सुखद वातावरण राहील. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. नोकरदार व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे.

वृश्चिक : व्यापार क्षेत्रात लाभ. आध्यात्मिक चेतना मिळेल. मुलांकडून सुखद बातमी कळेल. अडकलेली कामे आपल्या
प्रयत्नांमुळे पूर्ण होतील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील.

धनु : आरोग्याकडे लक्ष द्या. वादांपासून लांब रहा. आनंदी वातावरण राहील. सजावटीच्या वस्तु क्रय कराल. इच्छित कार्य थोड्या उशीरा होतील. नोकरदार कामात व्यस्त राहातील.

मकर : आळस करू नये, कामे वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. आकस्मिक लाभ. प्रियजनांची भेट. मित्रांपासून, सहकार्‍यांपासून लाभ मिळेल.

कुंभ : आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता येईल. आय-व्ययमध्ये संतुलन राहील. अडकलेली कामे पूर्ण होतील. भावनेच्या भरात वाहून नुकसान होण्याची शयता आहे.

मीन : घरात किंवा कुटुंबात शुभप्रसंग घडतील. व्यापार-व्यवसाया अनुकूल वातावरण राहिल. लांबचे प्रवास टाळा. अपेक्षेनुसार कार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

ताप का येतो?

ताप का येतो?

शरीराचे तापमान ९८.७० फॅरनहाईट वा ३६ ते ३७.५० सेल्सीयस इतके असते. मानव उष्ण रक्ताचा प्राणी आहे. सभोवतालीचे तापमान- १५० सेल्सीयस (जसे लडाख, श्रीनगरमध्ये असू शकते) ते ४७० सेल्सीयस (जसे राजस्थान, विदर्भात असू शकते) पर्यंत बदलत राहिले, तरी आपले शरीर स्वतःचे तापमान ९८.७० फॅरनहाईट इतकेच ठेवते. हे कसे होते याचा विचार केल्यास लक्षात येते की, मेंदूमध्ये तापमान नियंत्रणाचे केंद्र असते. या केंद्राच्या कार्यामुळेच तापमान नियंत्रणाखाली राहते. दिवसभरात तापमानामध्ये १.५० सेल्सीयस एवढा बदल सामान्यपणे होऊ शकतो. यापेक्षा जास्त बदल झाला तर मात्र आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. शरीरात चयापचयामुळे ऊर्जा निर्माण होते तसेच पर्यावरणातूनही शरीर ऊर्जा मिळवते. शरीरातील ऊर्जा थंड पदार्थापर्यंत संवहित होते, तसेच पर्यावरणाचे तापमान कमी असेल तर पर्यावरणातही संवहित होते.

घामाद्वारे शरीर ऊर्जा बाहेर टाकते, कारण अशावेळी घामाच्या बाष्पीभवनात ती वापरली जाऊन शरीर थंड होते. याउलट थंडीच्या काळात शरीर उष्णता साठवून ठेवते. जंतूच्या संसर्गावर प्रतिकार म्हणूनही शरीर तापाच्या रूपाने प्रतिसाद देते. या वाढलेल्या तापमानामुळे शरीरात शिरलेल्या जंतूंची वाढ थोपवली जाते. जंतूच्या प्रभावामुळे काही रासायनिक पदार्थ बाहेर पडतात, ज्यांच्यामुळे मेंदूतील तापमान नियंत्रण केंद्राचे काम बिघडते व ताप येतो. हिवतापासारख्या रोगात म्हणूनच ताप येतो. अशा तापात येणार्‍या हुडहुडीमुळे शरीर उष्णता बाहेर टाकायच्या ऐवजी शरीरात अधिक उष्णता निर्माण करते, कारण तापमान नियंत्रण केंद्रात बिघाड निर्माण झालेला असतो. क्रोसीनसारख्या गोळीने ताप उतरतो; पण नुसता पाय उतरवण्यापेक्षा ज्या कारणाने ताप आला आहे, त्या कारणाचा समूळ नायनाट करणे आवश्यक असते. ताप जास्त असल्यास शरीर गार पाण्याने पुसणे, कपाळावर गार पाण्याच्या, पट्ट्या ठेवणे या उपायांनीही ताप उतरतो.

सुविचार

ग्रंथालय हे साहित्य वस्त्रालंकारांचे भांडार आहे.

गुळ खाण्याचे बहुविध फायदे

गुळ खाण्याचे बहुविध फायदे
गुळाचे सेवन केल्याने संसर्गजन्य
आजारांपासून मुक्ती मिळते. गुळाचा चहा
प्यायल्याने घसा तसेच फुप्फुसामध्ये झालेला
संसर्ग दूर होतो.
थकवा कमी होण्यास मदत – गुळामध्ये
साखरेपेक्षा जास्त जीवनसत्व व पोषक घटक
असतात. त्यामुळे थकवा दूर होतो. गुळाचा
चहा प्यायल्याने एनर्जी वाढते. अशा प्रकारे
गुळाचा चहा प्यायल्याने वरील फायदे मिळतात.
भविष्यात मधुमेहाच्या आजारापासून सुटका
करायची असेल, तर आतापासून गुळाच्या
चहाचे सेवन करणं फायदेशीर ठरतं. तुम्हीही
साखरेचा चहा पीत असाल, तर वेळीच सावध
व्हा!

तिळाची बर्फी

तिळाची बर्फी

साहित्य : २०० ग्रॅम तीळ, २००
ग्रॅम काजूचे तुकडे, ४०० ग्रॅम साखर, १
१/२ वाटी सायीसहदूध, १/२ चमचा रोझ
इसेन्स, वर्खचा कागद
कृती : सर्वप्रथम तीळ साफ करून
घेणे त्यानंतर चुलीवर मंद आंचेवर भाजावेत
थोडे कमीच भजावे अगदी लालसर होता कामा
नये नंतर मिसरला लावून त्यांची पूड करावी
सोबत काजुचीही पूड करावी. एका पातेल्यात
साखरेत सायीसकट दूध घालून पाक तयार
करून घेणे. पाक तयार झाल्यानंतर त्यात
इसेन्स, काजूची व तिळाची पूड घालून
ढवळावे मिश्रण एकजीव करून घेऊन लगेच
तूप लावलेल्या पातेल्यात ओतून घेणे गरम
मिश्रण असतानाच त्यावर वर्खाचा कागद
थापावा लगेच बर्फी करण्यास सुरवात करावी
बर्फी झाल्यावर सर्व्ह करून ५-१० मिनिटांनी
थंड झाल्यानंतर त्याचे सेवन करावे.

देवघरासंबंधी

देवघरासंबंधी
* देवघर कधीही अस्वच्छ, धुळीने
माखलेले राहू देऊ नये.
* पूर्व-आग्नेय किंवा दक्षिण-आग्नेय
दिशेच्या जिन्यामुळे किरकोळ अपघात
होतात, दुखापत होते, कलह, भांडणे होतात,
आजारपण वाढते.
* देवघर बाथरुम किंवा शौचालयाच्या
बरोबर समोर नसावे.