तिळाची बर्फी

0
30

तिळाची बर्फी

साहित्य : २०० ग्रॅम तीळ, २००
ग्रॅम काजूचे तुकडे, ४०० ग्रॅम साखर, १
१/२ वाटी सायीसहदूध, १/२ चमचा रोझ
इसेन्स, वर्खचा कागद
कृती : सर्वप्रथम तीळ साफ करून
घेणे त्यानंतर चुलीवर मंद आंचेवर भाजावेत
थोडे कमीच भजावे अगदी लालसर होता कामा
नये नंतर मिसरला लावून त्यांची पूड करावी
सोबत काजुचीही पूड करावी. एका पातेल्यात
साखरेत सायीसकट दूध घालून पाक तयार
करून घेणे. पाक तयार झाल्यानंतर त्यात
इसेन्स, काजूची व तिळाची पूड घालून
ढवळावे मिश्रण एकजीव करून घेऊन लगेच
तूप लावलेल्या पातेल्यात ओतून घेणे गरम
मिश्रण असतानाच त्यावर वर्खाचा कागद
थापावा लगेच बर्फी करण्यास सुरवात करावी
बर्फी झाल्यावर सर्व्ह करून ५-१० मिनिटांनी
थंड झाल्यानंतर त्याचे सेवन करावे.