दैनिक पंचांग बुधवार, दि. २६ जून २०२४

0
110

—, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर,
ज्येष्ठ कृष्णपक्ष, धनिष्ठा १३|०५
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६
वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष : आर्थिक क्षेत्रात संयमाने वागा. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. आहारावर विशेष लक्ष द्या. व्यापार व्यवसायात सावधगिरी बाळगा.

वृषभ : भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो.

मिथुन : पुष्कळ दिवसांपासून साचलेली कामे पूर्ण होतील. आत्मविश्वासाने काम केल्याने यशाची गुरुकिल्ली सापडेल. घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल.

कर्क : आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल. तुमच्या सार्मथ्यात वाढ. होईल. आनंदाची बातमी कळेल. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा. कामात पूर्ण समर्पणभाव ठेवा. राजकीय व्यक्तींना काळ अनुकूल आहे.

सिंह : आध्यात्मासंबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग. कौटुंबिक सुख लाभेल. मिळालेली संधीचे सोने कराल.

कन्या : निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होईल. कामात निश्चितपणे यश मिळेल.

तूळ : आवास संबंधी समस्या सुटतील. सुखद वातावरण राहील. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. नोकरदार व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे.

वृश्चिक : व्यापार क्षेत्रात लाभ. आध्यात्मिक चेतना मिळेल. मुलांकडून सुखद बातमी कळेल. अडकलेली कामे आपल्या
प्रयत्नांमुळे पूर्ण होतील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील.

धनु : आरोग्याकडे लक्ष द्या. वादांपासून लांब रहा. आनंदी वातावरण राहील. सजावटीच्या वस्तु क्रय कराल. इच्छित कार्य थोड्या उशीरा होतील. नोकरदार कामात व्यस्त राहातील.

मकर : आळस करू नये, कामे वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. आकस्मिक लाभ. प्रियजनांची भेट. मित्रांपासून, सहकार्‍यांपासून लाभ मिळेल.

कुंभ : आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता येईल. आय-व्ययमध्ये संतुलन राहील. अडकलेली कामे पूर्ण होतील. भावनेच्या भरात वाहून नुकसान होण्याची शयता आहे.

मीन : घरात किंवा कुटुंबात शुभप्रसंग घडतील. व्यापार-व्यवसाया अनुकूल वातावरण राहिल. लांबचे प्रवास टाळा. अपेक्षेनुसार कार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर