शाळेत परीक्षेच्या वेळी एका विद्यार्थ्याने
आपल्यापुढे बसलेल्या विद्यार्थ्याला
१० रु. दिले आणि त्याचा पेपर
पाहून तो आपला पेपर लिहू लागला. शिक्षकांनी त्याला
पकडले व रागावून ते म्हणाले,
‘अशी लाचलुचपत आणि लबाडी करणार्या मुलांचे पुढे काय
होतं ते माहीत आहे ना?’
‘होय सर पुढे ते पुढारी होतात.’ विद्यार्थी म्हणाला.