एव्हील कशासाठी वापरतात?

0
92

एव्हील कशासाठी वापरतात?

एव्हील ही मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी गोळी आहे. सर्दी-पडशाने त्रस्त माणसाला औषध दुकानदार एव्हीलची गोळी सामान्यतः देताना आढळतात. एव्हीलमध्ये फेमिरॅमिन मॅलिएट नावाचे औषध २५ मि.गॅ्र इतके असते. या औषधाचा शरीरातील स्वयंचलित मज्जासंस्थेवर परिणाम होतो व त्यामुळे विविध ग्रंथीतून निर्माण होणार्‍या स्त्रावांच्या प्रमाणात घट होते. याचाच परिणाम म्हणून गळणारे नाक थांबते. पण त्याचबरोबर त्वचा कोरडी होते. तोंड कोरडे पडणे अशा गोष्टीही होतात. दिवसातून तीन गोळ्यांच्यापेक्षा जास्त गोळ्या कधीही घेऊ नयेत. तसेच लहान मुलांना किती प्रमाणात औषध द्यायचे ते डॉटरच ठरवू शकतात. त्यामुळे आपण निर्णय न घेतलेलाच बरा. विषाणूंमुळे वा अ‍ॅलर्जीमुळे होणार्‍या सर्दीसाठी एव्हील हे परिणामकारक औषध आहे; पण या औषधाचे दुष्परिणामही आहेत.

एव्हील गोळी घेतल्याने व्यक्तीला झोप येते. त्यामुळे एव्हील घेऊन वाहन चालवणे धोयाचे ठरू शकते. दुसरे म्हणजे एव्हीलचा परिणाम असतो. परिणाम संपल्यानंतर परत जास्त सर्दी होते. सर्दीसाठी खरे पाहता औषध घ्यायची गरज नसते. सर्दी हा आपोआप बरा होणारा रोग होय. नाक गळणे थांबण्यासाठी पाण्यात मीठ टाकून त्या द्रावणाचे दोन-चार थेंब नाकपुड्यांत टाकावेत. तसेच पाणी उकळवून त्याची वाफ घ्यावी. या उपायांमुळे बराच फायदा होतो व मुख्य म्हणजे औषधांचे दुष्परिणामही टाळता येतात.