हस्त १९|१५, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर, आषाढ शुलपक्ष,
सूर्योदय ०६ वा. २७ मि. सूर्यास्त ०६ वा. ३० मि.
मेष : जर आपणास आपले निवासस्थान बदलण्याची इच्छा असेल तर आजचा दिवस उत्तम आहे.
वृषभ : आपण आपल्या घरासाठी मोठी खरेदी करू शकता. कार्य योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी कठोर श्रम कराल. लेखन कार्यातील अडचणी दूर होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.
मिथुन : व्यापार्यांसाठी परिस्थिती साधारण. जोडीदाराशी वादविवाद टाळा. यथायोग्य विचार करून कार्य करा अडचणी येण्याची शयता आहे.
कर्क : आपल्या कार्यातील अडचणी दूर होतील. अधिकार्यांकडून कामे करवू शकाल. अपत्यांचा सहयोग मिळेल. कलाक्षेत्रातील व्यक्तींच्या कामात स्थिती सुखद राहील.
सिंह : व्यापार-व्यवसायासाठी आज दिवस उत्तम राहील. एखाद्या मित्राचे प्रशंसनीय सहकार्य मिळेल. राजकीय कार्ये पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.
कन्या : दिवस अनुकूल व महत्वाचा असेल. आपले अडकलेले कार्ये पूर्ण होतील. आनंदाची बातमी मिळेल. नोकरदार व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील.
तूळ : महत्वपूर्ण व्यक्तींशी संपर्क फायद्याचे राहतील. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखदायक राहील.
संपत्तीच्या खरेदी-विक्रीसाठीही उत्तम दिवस. नवीन करार होतील.
वृश्चिक : आरोग्य उत्तम राहील. नोकरदार व्यक्तींसाठी वातावरण अनुकूल राहील. आरोग्य उत्तम राहील. सर्जनशील व्यक्तींना वाव मिळेल.
धनु : कौटुंबिक सहयोग मिळेल. शत्रूवर्ग निष्प्रभावी राहील. श्रम अधिक झाल्यामुळे दमल्यासारखे वाटेल. मनोरंजनावर खर्च होईल.
मकर : एखादे काम न झाल्यामुळे अप्रसन्न राहाल. विशिष्ट कार्य पूर्ण होतील. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. दिवस आनंदात व्यतीत होईल.
कुंभ : आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायक राहील. आरोग्याच्या दृष्टीने उत्तम वेळ आहे.
मीन : कुटुंबात वेळ चांगला जाईल. वरिष्ठ लोकांचे कामात सहकार्य मिळेल. मनोरंजनावर खर्च होईल. आरोग्य उत्तम राहील.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.